Skip to main content

~झालंया सगळ येगळ~

लेखक वैभवकुमारन यांनी सोमवार, 16/12/2013 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर भाकरीनभी ओळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर दुष्टाची ती चक्र रंगवुनी , पिवळ पिकलया ते ऊर पंख फुटलेकी कि पक्षी उडतुया , नग म्हनतुया घर झालंया सगळ येगळ आता ...

शरीरसंबंधांना नकार हे क्रौर्य ????

लेखक खटासि खट यांनी सोमवार, 16/12/2013 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3NLG (बातमी जुनीच आहे. कुणी तरी धागा काढेल असं वाटलं होतं म्हणून महत्वाचा असूनही मागे पडला विषय). न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करणे हा उद्देश नाही. हा निकाल कोणत्या कायद्यामुळे दिला असावा अशा काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. शरीरसंबंधांना नकार या गोष्टीकडे मानवी हक्काच्या दृष्टीने पाहता येणार नाही का ? बलात्काराच्या व्याख्येत जर मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले (लग्नाच्या जोडीदाराबरोबरही) तर तो बलात्कार ठरतो असं म्हटलय. मग या निकालामुळे ती व्याख्या चुकीची ठरतेय का असे कैक प्रश्न उभे राहतात.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 16/12/2013 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू. दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात.

डेबिट कार्डचा वाईट अनुभव

लेखक अव्यक्त यांनी सोमवार, 16/12/2013 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला डेबिट कार्डचा वाईट अनुभव…. माझे HDFC बँकेचे debit कार्ड मी emergency मध्ये june महिन्यात CANARA बँकेच्या ATM मध्ये वापरले.. काही तांत्रिक बिघाडामुळे मी काढलेल्या २० ० ० /- रुपयांपैकी १ ५ ० ० /- रुपये बाहेर आले आणि ५ ० ० /- रुपये कमी आले. मी HDFC शी email करून पिच्छा पुरवला पण त्यांनी CANARA बँकेचा report मागवून २ ० ० ० /- रुपये बाहेर आले होत्ते म्हणून मलाच खोट्यात पाडले… अशा प्रकारांची दाद कोठे मागावी ? कसा पाठपुरावा करावा ? अश्शी बॅंकेकडून होणारी फसवणूक कशी थांबवावी.? म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काल सोकावतो… मार्गदर्शन अपेक्षित आहे.

चला व्हिएतनामला ०८ : कु ची वरून परत आणि सायगाव नदीवर रात्रिची जलसफर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 15/12/2013 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

बसा की एकदा खुर्ची वरती

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 15/12/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
कसला राव विचार करता बसा की एकदा खुर्ची वरती तोडा आकाशीचे तारे पूर्वा हौस जनतेची. विजेची बिल कमी करा मुफ्त मध्ये पाणी द्या दाखविलेले स्वप्न जनतेला तोडू नका हो राव तुम्ही. पुकारते ही खुर्ची कसी होऊ नका हो वनवासी औलीयाची श्रापित वाणी करू नका हो पुन्हा खरी. औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला. तेंव्हा पासून ही म्हण प्रचलित आहे.

फुकुशिमानो तोत्तोचान

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 15/12/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं तसं उमटतं तिच्या गोबर्या गालावर हसू फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही काय होणार पुढे तिला विचार करवत नाही गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही ओजिइसान
काव्यरस

खुनी विरुद्ध खिलाडी!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 15/12/2013 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
'आम'च्या विजयाचे पडसाद पुण्यात उमटत आहेत असे वाटते. पुण्याचे सुप्रसिद्ध गुंड व खुनाचे आरोपी श्री मानकर ह्यांनी सर्वश्रेष्ठ खिलाडी श्री. कलमाडी ह्यांच्याशी पंगा घेण्याचे मनावर घेतले आहे. आता कलमाडी म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार! त्यामुळे तेही सहजासहजी हार मानत नाहीयेत. कागदोपत्री कलमाडी काँग्रेसमधून हद्दपार झाले असले तरी पुणेरी काँग्रेसजन कलमाडीजींना आदरस्थानी मानतात. खाल्ल्या मिठाला आणि मेवामिठाईला जागतायत! पण ह्या नमकहलाल काँग्रेसी अनुयायांची पंचाईत होत आहे. कलमाडीभाई आपले म्हणावेत का नाही ह्या विषयी वरून काहीच आदेश येत नाही आहे.

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 15/12/2013 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र "बळी" बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे