Skip to main content

झुळुक वादळी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 22/12/2013 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
युगे जाहली जळून पण अंगारा अजून दाही कलेवरे उरली स्वप्नांची डोळा भरून कांही काजळ वाटा धूळ फ़ुफ़ाटा दिशा व्यापल्या दाही सुकलेला पाचोळा भिरभिर उडवत वारा वाही अंध मोहरे काळे गहिरे पोत मानवत नाही वठलेल्या रेषांचे व्रण अवशेष वाहती भोई पराधीन मायामय जीवन झुळुक वादळे तीही ओहटीत कवने वचनांची जगणे लाट सदाही उलगडणे वाळूसम काठावर लोटांगण घेई खोल तळातिल दडलेले सागर पृष्ठावर येई फेस दुधी विरघळे उफाळे फुटे अंगभर लाही श्वासांचे दळणे आदळणे चिर अंदोलत राही …………………. अज्ञात
काव्यरस

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 22/12/2013 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज मागील भागावरून पुढे चालू ... आपल्या रोजच्या ओळखीचे परंपरागत ऊर्जेचे काही प्रकार आपण पहिल्या भागात पाहिले. पण आपल्याला यांच्याबद्दल कितीशी माहिती असते? आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे 'वदनि कवळ घेता ..

२१ डिसेंबर, मॉस्को

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 21/12/2013 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
२१ जूनला आपण उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाची मॉस्को सफर केली. आज २१ डिसेंबर सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र. आजचा दिवस उगवणार होता सकाळी ९.५० ला (सूर्योदय) आणि सूर्यास्त संध्याकाळी ५.२० वाजता. पहिल्या भागात आज सकाळी फेरफटका मारतांनाची काही छायाचित्रे. सकाळी ९.१० ते १०.०० या वेळेत ही छायाचित्रे काढली आहेत. सकाळी फोटो काढण्यासाठी मुद्दाम थोडा उशीराच निघालो. खरंतर मॉस्कोला या वेळेपर्यंत चांगलाच हिमवर्षाव सुरू झालेला असतो. सर्वत्र पांढ-या रंगाचे अधिराज्य असते या वर्षी मात्र अगदीच तुरळक हिमवर्षाव आतापर्यंत झाला आहे. आज मात्र बाहेर हलका हिमवर्षाव सुरु होता.

कवडसे

लेखक उपटसुंभ यांनी शनिवार, 21/12/2013 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊल माझे चालले रस्ता जिथे जाई तसे शोधायला येऊ नका माझ्या इराद्यांचे ठसे नाही दिली जन्मात या कोणासही मी सावली आयुष्यभर जपलेत मी माझ्या उन्हाचे वारसे विश्वास या दुनियेवरी ठेवायचा कोणी कसा एकाच खाणीच्या उरी यावे हिरे अन् कोळसे वाटेवरी माझ्या जिथे अंधार होता दाटला पेरीत मी गेलो तिथे माझ्या विजांचे कवडसे आयुष्य येथे भेटते प्रत्येक वळणावर नवे ताजी पुन्हा होते गझल धरते नव्याने बाळसे -- उपटसुंभ
काव्यरस

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 21/12/2013 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
"या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमोनमः।।" असे देवीच्या प्रार्थनेतल्या एका श्लोकात म्हंटले आहे. "सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने निवास करणा-या देवीला नमस्कार." असा या श्लोकाचा अर्थ होतो. 'शक्ती' या मराठी शब्दाचा रूढ अर्थ बराच मोघम आणि व्यापक आहे. मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, दैवी शक्ती, इच्छाशक्ती वगैरेंचासुद्धा त्यात समावेश होतो. 'शक्ती' या शब्दाचा उपयोग 'सामर्थ्य' या आणखी एका मोघम अर्थाने सुद्धा केला जातो. पण हा लेख विज्ञानासंबंधी असल्यामुळे 'तशा' प्रकारच्या शक्तींना यात स्थान नाही.

आंबोशीचे (सुखांबाचे) लोणचे

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 21/12/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः एक वाटी सुकवलेल्या कैरीच्या फोडी, एक वाटी गूळ, पाव वाटी मोहरी, एक चमचा मेथी, मीठ चवीनुसार, तिखट दोन चमचे, पाणी, तेल पाव वाटी, हिंग, मोहरी, हळद फोडणीसाठी. कृती: प्रथम दोन-तीन वाट्या पाणी उकळावे. गॅस बंद करून या पाण्यात कैरीच्या फोडी घालून दहा मिनिटे झाकून ठेवावे.दहा मिनिटांनी फोडी पाण्यातून काढून चाळणीवर टाकाव्या. गूळ एका पातेल्यात घेऊन पाऊण वाटी पाणी घालून पाक करावा. गूळ विरघळला की गॅस बंद करावा. मोहरी पाणी घालून मिक्सरवर फेसून घ्यावी. मेथी तळून पावडर करावी. पाव वाटी तेलाची मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. फोडणीत अर्धा चमचा तिखट घालावे, त्यामुळे छान रंग येतो.

अर्थक्षेत्र भाग - ३ - (ट्रेडिंगपद्धतीची ओळख.)

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 21/12/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================================== अर्थक्षेत्र भाग - १ - (शेअर मार्केटमधला पहिला लॉस ) अर्थक्षेत्र भाग - २ - (पहिल्या लॉस नंतरची सुरुवात ) =================================================================================== ट्रेडर म्हणजे जो ट्रेड करतो तो आणि ट्रेड म्हणजे "खरेदी आणि विक्री." खरेदी केलेली वस्तू जो पर्यंत तुम्ही विकत नाही तो पर्यंत ट्रेड कम्प्लीट झाला असे म्हणता येणार नाही.

प्रामाणिक मत

लेखक इंद्रधनुष्य यांनी शनिवार, 21/12/2013 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात. याउलट तितकारा, तिरस्कार, घृणा , मत्सर हवा हे शब्द उच्चारतानाच जिभेची सुद्धा घालमेलच होते ना. मग प्रत्यक्षातल्या अनुभवांचे काय. एखाद्याचा तिटकारा, तिरस्कार करणे, घृणा वाटणे, मत्सर किंवा हेवा करणे या सर्व भावनिक व्याधींच्या आधीन आपण का व्हावे? हां तर प्रत्यक्षात स्वत:चाच आजार.

रात भी है कुछ भीगी भीगी

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 20/12/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=KXic0pmpKcw मान्य कि सुनिल दत्त म्हणजे राज कपूर किंवा दिलिपकुमार नाही. मात्र त्याची अभिनयाची स्वतःची एक शैली आहे. विशेषतः डाकूच्या वेषात त्याच्याइतके चपखल ते दोघेही दिसणार नाहीत असे मला वाटते. तो फेटा, तो टिळा उंच्यापुर्‍या सुनिलदत्तला शोभुन दिसतात. “मुझे जीने दो” मधल्या “रात भी है कुछ भीगी भीगी” मध्ये सुनिलदत्तने वहिदाला पाहुन अंतर्बाह्य पेटलेला डाकू मस्त दाखवला आहे. वहिदाच्या नृत्यकौशल्याबद्दल वादच नाही. मात्र त्याबरोबरच अभिनयही अविस्मरणिय. या गाण्यात ती नजरेनेच बोलते.