मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२१ डिसेंबर, मॉस्को

लाल टोपी · · भटकंती
२१ जूनला आपण उत्तर गोलार्धातील सर्वात मोठ्या दिवसाची मॉस्को सफर केली. आज २१ डिसेंबर सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र. आजचा दिवस उगवणार होता सकाळी ९.५० ला (सूर्योदय) आणि सूर्यास्त संध्याकाळी ५.२० वाजता. पहिल्या भागात आज सकाळी फेरफटका मारतांनाची काही छायाचित्रे. सकाळी ९.१० ते १०.०० या वेळेत ही छायाचित्रे काढली आहेत. सकाळी फोटो काढण्यासाठी मुद्दाम थोडा उशीराच निघालो. खरंतर मॉस्कोला या वेळेपर्यंत चांगलाच हिमवर्षाव सुरू झालेला असतो. सर्वत्र पांढ-या रंगाचे अधिराज्य असते या वर्षी मात्र अगदीच तुरळक हिमवर्षाव आतापर्यंत झाला आहे. आज मात्र बाहेर हलका हिमवर्षाव सुरु होता. जवळ जवळ सर्वच चित्रांत हलका हिमवर्षाव सुरु असलेला दिसून येईल. १. 1 काही दिवसावर आलेल्या नाताळच्या स्वागताची तयारी रस्त्यावर दिसून येत आहे. २. 2 रात्रभराच्या हिमवर्षावामुळे जमिनीवर बर्फाचा सफेद थर जमा झाला होता. अजूनही तेवत असलेल्या रस्त्यावरील दिव्यांच्या सोनेरी प्रकाशात जादुई वातावरण तयार झाले होते. (सकाळी ९.१५) ३. 3 ४. 3 ५. 4 मॉस्कोतील रशियन महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा. आजूबाजूच्या निवासी इमारती. ६. 6 आता पर्यंत ९.३० होऊन गेले आहेत तरी देखील अंधाराचे साम्राज्य दाखवणारी ही काही क्षणचित्रे. ७. 7 ८. 8 ९. 10 रस्त्यावर जमा होणारे बर्फ सात दूर केले जाते तेच काम करणारे कर्मचारी. १०. 9 ११. 11 रस्त्यावरील घड्याळात ९.३५ झाले आहेत..... सकाळचे!! 12 आता हळू हळू अंधार दूर होऊ लागला आणि मॉस्कोच्या रस्त्यांवर पहाट अवतरू लागली ती ९.४५ नंतर. १२. 11 १३. 13 १४. 72 १५. 13

वाचने 5368 वाचनखूण प्रतिक्रिया 13

पैसा 21/12/2013 - 23:37
सगळे फोटो मस्तच आहेत! सकाळी ९ नंतर इतका काळोख बघून अजब वाटत होतं!

प्यारे१ 22/12/2013 - 02:44
मस्तच! मध्ये नॉर्वेमध्ये असलेल्या मित्रानं दुपारी तीनला लक्ख काळोख असलेले फोटो चेपुवर टाकलेले. आमच्याकडे पण सध्या सकाळी ७.१५ ला पहाटेचे ५.३० नि संध्याकाळी ५.३० म्हणजे रात्र असा प्रकार झालाय. बोअर वाटतंय पण! :(

बॅटमॅन 22/12/2013 - 11:26
मस्तच!!!! रशिया हा मिपावर अनएक्प्लोर्ड आहे, मागे तुम्ही अशाच पद्धतीचा एखादा लेख लिहिल्यागत वाटतेय, जमल्यास रशिया सफरीबद्दलही असाच लेख लिहावा अशी विनंती. :)

विजुभाऊ 22/12/2013 - 12:44
अरे भौ. इकडे साउथ अफ्रिकेत एकदम कडक उन्हाळा आहे. दिवस तर इतका मोठा आहे. सकाळी साडे चार वाजता उजाडते. सात आठ पर्यन्त सूर्य एकदम कड्डक तलपत असतो. संध्याकाळी साडे सात वाजेर्यन्त तो तसाच असतो

लाल टोपी 23/12/2013 - 12:14
मनःपूर्वक आभार.. @ बॅटमन, अतिवासताई : हो या आधी २१ जून वर असाच लेख लिहीला होता. रशियावर एक लेख मालिका लिहायला सुरुवात केली आहे पूर्ण लिहूनच पोस्ट करायचा विचार आहे. @ विजूभाउ: खरच दोन ध्रुवावरील आपण एकमेकांशी गप्पा मारतो 'मिपा'ची कृपा. सध्या तिकडे मोठे दिवस असतील ना? @ अनुपजी : कॅमेरा साधाच असल्या ने आणि पूर्ण अंधारामुळे फोटो तितकेसे स्पष्ट नाहीत.

सौंदाळा 23/12/2013 - 14:14
मस्तच. जमले तर आजचे सुर्यास्ताचे फोटोसुध्दा टाका. बॅटमॅनशी सहमत. रशियाबद्दल वाचायची इच्छा आहे.