Skip to main content

पुरुष :- एक नामशेष होऊ घातलेली जमात

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 06/09/2014 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच वर्तमान पत्रात बातमी वाचली की "आता प्रजनन करण्या साठी पुरुषांची गरज लागणार नाही. क्लोनिंगच्या सहाय्याने आता पुनरुत्पादन करणे शक्य आहे." आणि माझ्या पोटात एक मोठा गोळा आला. कारण पुरुषजातीचे अंध:कारमय भविष्य मला स्पष्ट पणे दिसू लागले. इतके दिवस माझ्या मनात जो संशय होता त्याला या बातमीमुळे बळकटीच मिळाली होती. स्त्रीजातीचे अनेक वर्षांपासून सुरु असलेले कारस्थान यशस्वी होण्याची वेळ अगदी जवळ आली आहे या बद्द्ल माझ्या मनात कोणताही संशय उरला नाही. आता पुरुषजात नष्ट होण्यास आता फारसा अवधी उरला नाही. पुरुषांचे दिवस आता संपले आहेत.

वांग्याचे काप

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 06/09/2014 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीत गोड खाउन कंटाळलात ना? मग जरा ही चमचमीत रेसीपी पहा.

मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकांची माहिती हवी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 05/09/2014 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीच्या वर्गातील मूलांना शिक्षकाची भूमीका वठवण्याची संधी मिळत असते पण यात नाट्यापेक्षा प्रात्यक्षीक अधीक असत, त्या आधी अगदीच लहानपणी डॉक्टर डॉक्टर हा खेळ खेळला जाताना दिसतो, तसा टिचर टिचर हा खेळही काही वेळा रंगलेला दिसतो. सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील नाटक, टिव्ही सिरीयल्स चित्रपट इत्यादी माध्यमातून शिक्षकांच्या भूमिका विवीध कलाकारांनी केलेल्या आढळून येतात. ५ सप्टेंबर भारतात शि़क्षक दिन म्हणून पाळला जातो तर ५ ऑक्टोबर जागतीक शिक्षक दिन म्हणून पाळला जातो.

मलई!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 05/09/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
.........................आत्मूज जिल्बी भांडार......................... जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =)) (*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या ग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..) सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे.

तुमचे शरीर अपचन कसे हाताळते?

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 05/09/2014 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मिपावर एक प्रशन विचारायचा म्हणतोय, आज विचारूनच टाकूया. मला दोन प्रश्न आहेत, तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता? १. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते २. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात. ३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते. ४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते.. औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे. आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न - तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

लेखक अन्नू यांनी शुक्रवार, 05/09/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो! फेसबुक. म्हणजेच थोडक्यात आपलं- FB ! –यात एक गोष्ट मात्र मला जास्त इंटरेस्टींग वाटते, ती म्हणजे फोटो अपलोडींग आणि टॅगिंग. इथे प्रत्येकजण आपल्या भावना जास्तकरुन वेगवेगळ्या इमेजेसमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

आदि कैलास ओमपर्वत दर्शन यात्रा,पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-९

लेखक खुशि यांनी शुक्रवार, 05/09/2014 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गुंजी. व्यासभूमीचे प्रवेशद्वार. कैलास यात्रेचा बेस कॅम्प. येथे डोंगरावर व्यास मंदिर आहे, छोटे पण सुंदर. येथेच त्यांनी श्रीगणेशाच्या हस्ते १८ पुराणे लिहिवली अशी आख्यायिका आहे. गुंजी, रौकाँग, नम्पा, नाभि आणि कुट्टी ह्या पाच गावांची मिळून होते व्यासभूमी. येथील रहिवासी व्यासऋषींचे वंशज आहेत. त्यांच्याप्रमाणेच बुद्धिवान आणि शिवभक्त. दर राखीपौर्णिमेला या गावांचा गुंजीमध्ये मोठा उत्सव होतो. पारंपारिक नृत्य, पूजा, प्रसाद असा पाच दिवसांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच देश-परदेशात काम-धंद्याच्या निमित्ताने राहात असलेले सर्व नागरिक येतात.

गोजिरी

लेखक विअर्ड विक्स यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती गोजिरी, रुसुनी बसली कोपरी काही केल्या बोलेना, तिच्यापुढे आमचे काही चालेना नाक आहे छोटेसे, गुस्स्यात होते थोडे मोठेसे खळी पडते गालावर, गुस्स्यात पडे कपाळावर आकाशी उडे जसे पाखरू, तसे नाजूक आहे माझे कोकरू शिंगांनी जरी देई मार, माया आहे मनी फार -विअर्ड विक्स (चाल बडबड गीताप्रमाणे लावावी. हे बडबड गीत म्हणून सुद्धा चालू शकते. परंतु हे गीत अल्लड, निर्मळ नि कोमल मनाच्या प्रेयसीला ही सादर करू शकता...)
काव्यरस

परिघ परिक्रमा

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 05/09/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं. आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?