Skip to main content

अर्रे पांडुब्बा ..

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 02/01/2015 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
वर्जीनल कवी, लाडके मिपावासी स्पा आणि उल्लेखलेल्या समस्त मिपाकरांची मापी मागून आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29893 --------------------------------------------------------------------------------- माताय, अंगातल्या टवाळकीमुळे खूप जिल्ब्यांसोबत मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. टैम्पास करून घ्या मंडळी ...

घुटे ----

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 02/01/2015 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
घुटे म्हणजे ऊडीद डाळीची आमटी. अर्धा वाटी उड़ीद डाळ थोड्याशा जरासे भाजून घेणे. मग कुकरला लावून डाळी सारखेच शिजवून घेणे. आता थोड़ी मिरची, लसुण, ओले खोबरे व जिरे मिक्सरवर बारीक़ करून घ्या. तेलात प्रथम मोहरी टाका.. ती तडतडली की हे मिरची लसुण जीरे फोडणीला घाला. थोडा हिंग, हळद घाला. त्यात आता शिजलेली उड़ीद डाळ घोटून मिसळा. पाणी घाला. चवीनुसार मीठ, कोथींबीर घाला. हे घुटे जरा पातळसर असावे. गरम गरम खावे..प्यावे..भुरके मारावेत... भाताबरोबर(वरुन साजुक तुप) छान लागते. ह आता फोटु मागाल तर फोटु काढेपर्यंत शिल्लकच नाही राहिले हो...

अगा पांडुरंगा ..

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/01/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. गोड मानून घ्या मंडळी ...
काव्यरस

(सहज..)

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 01/01/2015 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मुदांची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887 ------------------------------------------------------------------------ adagal कोळ्यांनी विणले जाळे वाळवीने करामत केली. मी कचरा केला नाही अन्,तरीही अडगळ झाली. विटलेला रंग कचर्याचा गंध ना घुशींना प्रतिबंध. कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा लाभला उंदरांस स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कबुतरांना शी न व्हावी! वैतागून संध्

१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 01/01/2015 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818) ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे. पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा. मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा. ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत. मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता.

मनीभायच्या अड्यावर- स्टॉक स्प्लिट

लेखक जेपी यांनी गुरुवार, 01/01/2015 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार मनीभाय!" "राम राम ! पक्या, आज हिकड कस्स काय आलास?" "काय नाय मनीभाय सहजच आलतो." "तु काय सहज येणार न्हाईस. बोल काय काम काढल." "मनीभाय एक शंका विचारायची होती." "हां आता आलास ना लाईनीवर...ईचार काय शंका हाय तुला?" "मनीभाय,स्टॉक स्प्लिट म्हणंजे काय?" "कसला ष्टॉक!!! ड्राय डे च ईचरतोस काय?" "नाही.स्टॉक म्हंणजे.कंपनीचा स्टॉक..शेअर..समभाग." "अर आस बोल की,आता शेअर स्प्लिट मंजे बघ...हां ...हा माझा खंबाच घे की उदाहरण म्हनुन." "मनीभाय,खंबा नको..दारुच उदात्तीकरण होईल." "आता काय तुझ्यासाठी काय येगळी भाषा शोधु का मी?

नव्या वर्षाचे संकल्प

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 01/01/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मिपाकरांना २०१५ च्या पहिल्या दिवशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आमचे नवे वर्ष गुडीपाडव्याला सुरु होते किंवा दिवाळीला सुरु होते इ. इ. चर्चा नको. :) तर सांगण्याचा मुद्दा असा की दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी तुम्ही नवीन वर्षाचे तडीस (न) जाणारे संकल्प केले असतीलच. मागच्या वर्षी एखादा संकल्प केला आणि तो पुर्ण केला असेही काही घडले असेल. तर मंडळी येउद्या तुमचे अपडेटस. मी अजून काही संकल्प केला नाही. हजारो संकल्प ऐसे की हर संकल्प पे दम निकले. पण बघूया, मिपाकरांच्या सुचनेतून काही आवडले तर नक्कीच अनुकरण केले (मिपाच्या भाषेत केल्या जाईल) जाईल.

सहज..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 01/01/2015 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
https://lh4.googleusercontent.com/-SlYwf_I5qkM/VKKOxOhFBGI/AAAAAAAAGoo/bWGXNKJWhdU/w326-h580-no/https%253A%252F%252Flh6.googleusercontent.com%252F3Il92l88Ww_O5tbjFoNYzLAkiCz4u-_2HvN22m-XOe0%253Ds0-d जाळ्यावर विणले जाळे शब्दांनी कसंरतं केली. मी काहि केले नाही अन्,सहजी कविता झाली. ना शब्द रंग रस गंध ना प्रतिकांचे प्रतिबंध. तालातून जुळता सांधा
काव्यरस

आर्ट ऑफ द स्टेट

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 01/01/2015 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती. मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो. एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ - व्यक्तिचित्रण

लेखक एस यांनी गुरुवार, 01/01/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो. मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
ह्या स्पर्धेचा विषय श्री. स्वॅप्स हेच सुचवणार असून स्पर्धेसाठी उपलब्ध प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवडही तेच करणार आहेत.