"नमस्कार मनीभाय!"
"राम राम ! पक्या, आज हिकड कस्स काय आलास?"
"काय नाय मनीभाय सहजच आलतो."
"तु काय सहज येणार न्हाईस. बोल काय काम काढल."
"मनीभाय एक शंका विचारायची होती."
"हां आता आलास ना लाईनीवर...ईचार काय शंका हाय तुला?"
"मनीभाय,स्टॉक स्प्लिट म्हणंजे काय?"
"कसला ष्टॉक!!! ड्राय डे च ईचरतोस काय?"
"नाही.स्टॉक म्हंणजे.कंपनीचा स्टॉक..शेअर..समभाग."
"अर आस बोल की,आता शेअर स्प्लिट मंजे बघ...हां ...हा माझा खंबाच घे की उदाहरण म्हनुन."
"मनीभाय,खंबा नको..दारुच उदात्तीकरण होईल."
"आता काय तुझ्यासाठी काय येगळी भाषा शोधु का मी? पटल तर आईक नायतर निघ."
"चिडु नको मनीभाय,सांग तुझ्याच भाषेत."
"तर आईक..हा माझा खंबा..तुला एकदाच विकत घेण जमणार हाय का ?"
"नाही.ते माझ्या खिशाला नाय परवडत."
"तर,तुझ्या सारख्या लोंकासाठी,या खंब्याचे समान भाग करायचे.आणी विकायचे.त्यामुळे काय होत..तुझ्या सारख्या लोंकाची सोय होते.आन माझा खंबा पण विकला जातो.पण यामुळे खंब्याची किमंत आणी साईज आज्याबात कमी होत नाय.
कळतय का मी काय सांगतो ते.
"कळाल मनीभाय,किरकोळ गुंतवणुकदाराला आर्कषीत करण्यासाठी कंपनीचा समभाग लहान रुपात विभागला जातो.यामुळे
कंपनीची किंमत कमी होत नाही आणी प्रत्येक समभागा मागील मिळकत ही कमी होत नाही."
"शाब्बास पक्या !! कळाल तुला..आता एक सल्ला,दारु आणी शेअर घ्यायचा सल्ला कुणाला द्याचा नाय."
"मनीभात ते कळत आपल्याला...शेअर आणी दारु..सगळ्यालाच पचत नाही.त्यामुळे कुणाला सल्ला द्यायचा नाही.
पचल नायतर आपल्याला शिव्या घालताय."
"आर..त्याच्यामारी! हुशार हाईस की....ये नंद्या दोन ग्लास आन..सोबत चखणा बी आन,हा खंबा फोडु आज."
.
.
.
(काहि दिवसापुर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया चा शेअर १:१० या प्रमाणात विभागला गेला..सकाळी ३००० च्या आसपास असलेला शेअर संध्याकाळी ३०० च्या आसपास बंद झाला (किमंती अचुक नाहीत).त्या दिवशी नेमक काय घडल हे जाणुन
घेण्यासाठी बराच वेळ फोन वाजत राहीला.समजावुन सांगताना,तोंडाला फेस आला.नंतर पंजाब नॅशनल बँकेचा समभाग विभागला गेला.एक हि फोन आला नाही आणी पुर्वीची बडबड व्यर्थ गेली नाही हे कळाल.)
लेख वाचा आणी सोडुन द्या.चर्चा अपेक्षीत नाही.
याद्या
3771
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
इतकेही न समजणारे लोक असु
In reply to . by hitesh
नाही हो खरंच आहेत.
In reply to . by hitesh
ICICI
मनोरंजक!
मस्त
मस्त!
समजलं सगळ च्या सगळ.
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats up.
नाय वो...जयप्रकाश नारायण
In reply to . by hitesh
अरे वा ? तुम्ही कसं वळंकलंत ?
In reply to . by hitesh
प्रत्येक समभागा मागील मिळकत
चर्चा अपेक्षीत नाही तरी
In reply to प्रत्येक समभागा मागील मिळकत by अनुप ढेरे