Skip to main content

बाबुल मोरा

लेखक अत्रन्गि पाउस यांनी बुधवार, 25/02/2015 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें मोरा अपना बेगाना छुटो जाए आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश जे बाबुल घर आपना मैं पीया के देश |धृ | कुंदनलाल सैगल जगजीत सिंग पुरुषांना माहेर नाही आणि म्हणून त्यांना त्या हळव्या जखमेचे फार कौतुक नाही असे कुणीसे म्हटले आहे कि नै माहित नै पण असतेच तर बाबुल मोरा हे त्याला दिलेले आर्त उत्तर आहे ... लखनौतून परागंदा होत असतांना वाजीद अलींनी लिहिलेली हि आर्त रचना भैरवीत

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

लेखक किरण८८७७ यांनी बुधवार, 25/02/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 25/02/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले. तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ) १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ? २. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ? ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ? ४.

कलियुग..... एक लघूकथा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 25/02/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
कलियुग....... रस्त्याच्या पलिकडचा डोंगर बघताच सगळे खुष झाले. दाट गर्ड झाडी व आकाशात उंच उठणारे झाडांचे शेंडे, त्याच्यावर कापूस पिंजल्यासारखे ढग व त्यावर पडणारे सोनेरी किरण.....मस्तच. थोड्याच वेळात डोंगरावरुन अंधार खाली उतरला व गावात दिवे लागले. आमचा गाव म्हणजे कोकणातील निसर्गाचा व माणसांचा एक उत्कृष्ट नमुना! शहरातील गोंगाटाला कंटाळून आम्ही मित्रांनी महिनाभर गावी मुक्काम टाकण्याचा निश्च्य केला होता व पारही पाडला होता. त्याचेच फळ आम्ही आत्ता चाखत होतो. ठरलेल्या नियमानुसार सगळ्यांनी आपापले सेलफोन बंद ठेवले होते.

खुशबू (भाग ७)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 25/02/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ आज एक नवीन दिवस उजाडला,ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती वाट पाहत होती.

घर घर की काहानी

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 25/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
'Don't take me for granted'; तिने दम दिला 'अग? पण मी कुठे?' त्याने केविलवाणा प्रयत्न केला 'माहिती आहे मला तुझा स्वभाव... मला न विचारता... द्यायचा इतरांना भाव; एक गोष्ट लक्षात राहील तुझ्या... तर शपथ..' चिडून गेली ती आत तणतणत! कस सांगू हिला.. surprise आहे! तिचा वाढदिवस... माझ्या लक्षात आहे! एक गजरा... एक नाटक... नंतर long drive चा plan आहे... तिच्या आवडीच्या restorent मधे टेबलसुद्धा booked आहे... खरच आवडतेस ग मनापासून; विसरभोळा आहे घे सांभाळुन; संसार तुझ्याशिवाय अपुरा आहे... अस आपल् म्हणायच... खर तर मीच तुझ्याशिवाय अधूरा आहे.... ---------------

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला -

लेखक विदेश यांनी बुधवार, 25/02/2015 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला "चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला .. आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला .. एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला .. हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला लेउनीया साज आली कामिनी थाटात ती तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला

व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १

लेखक मधुरा देशपांडे यांनी बुधवार, 25/02/2015 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिएन्ना आणि बुडापेस्ट ही दोन्ही शहरे बऱ्याच दिवसांपासून भटकंतीच्या यादीत होती. साल्झबुर्ग आणि जवळच्या परिसरात गेलो तेव्हा ऑस्ट्रियाची छोटीशी झलक बघायला मिळाली होती. डिसेंबरच्या नाताळच्या सुट्ट्या यावेळी अशाच गेल्या आणि त्याचदरम्यान सहज म्हणून आंजावर उंडारताना व्हिएन्नाचे विमानाचे तिकीट बघितले. फेब्रुवारी हा तसा पर्यटकांच्या दृष्टीने तेवढासा योग्य नसल्याने असेल कदाचित, पण अगदीच स्वस्तात तिकिटे दिसत होती. मग थोडी अजून माहिती काढली, व्हिएन्ना पर्यंत जातो आहोत तर जवळ कुठे जाता येईल असा विचार केला तेव्हा बुडापेस्ट सोयीचे वाटले. रेल्वेने साधारण ३ तास. आधी नाल आणि मग घोडा असे काहीसे झाले.