अखेर चुलत बहीण सापडली.
NASA’s Kepler Mission Discovers Bigger, Older Cousin to Earth.
स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!
मी जिथे काम करतो तेथील प्रसंग. इतके दिवस जुनाट कपाटं, कागद, वाळलेल्या पापडासारखी पोस्टर्स, निवांत सरकारी कामं, एका बाईचा तार सप्तकातला इरिटेटिंग स्वर अस एकंदर स्वरूप.
परवा अचानक गडबड झाली, खडबडून जाग आली म्हणा ना...सगळी पोस्टर्स पुसून घ्यायला लावली...कुणाला?? संशोधकांना...आम्हाला देण्यात येणाऱ्या पगारात हे ही समाविष्ट असत वाटत. नवीनच कळलं. १ महिना रखडलेल्या पोस्टरच काम १ तासात उरकलं गेलं अन ते प्रिंट करायला धाडण्यात आलं. जुनी कपाटं नवीन दिसण्याचे दुबळे प्रयत्न करून झाले. कार्पेट नवीन, पायपुसणी नवीन एवढच काय तर चहाचे कपदेखील नवीन.
शष्पचिंतन
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी !
आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे ||
भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ?
धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि ||
जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे |
पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?
भारतरत्न अब्दुल कलाम
महाभारतातली माधवी
सुर्याची लेकरे मधील एका प्रतिक्रियेत श्री स्वॅप्स यांनी माधवीचा उल्लेख केला. महाभारतातील अनुकंपनीय पात्रांमध्ये त्यांनी माधवीचा उल्लेख केला. त्या अनुषंगाने आलेल्या उत्सुक प्रतिक्रियांमुळे ही जिलबी पाडायची इच्छा झाली. त्यामुळे याचा दोष पुर्णपणे स्वॅप्स यांना द्यावा ;).
‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो
दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले.....
काव्यरस
स्वतंत्र
अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत
मुंगीपासून-देव माश्यापर्यंत
सगळेच बद्ध -
कुणी भौतिक
तर कुणी
निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या
आपापल्या कक्षेत.
एकटा माणूसच
या सगळ्याला अपवाद -
आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून
ऊन-सावल्यांतून
भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या
नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा
हेच आहे त्याचं ओझं
हीच आहे त्याची व्यथा
हाच आहे त्याचा गौरव
हीच आहे त्याची महत्ता
काव्यरस
मिसळ < आणि > पाव : शतशब्दकथा स्पर्धा
जवळजवळ दोन वर्षांपूर्वी आतिवास यांनी एक नवाच वाङ्मयप्रकार मिपावर आणला. (शीर्षक सोडून) शंभर शब्दांत कथा. मिपाकरांना हा प्रकार बेहद्द आवडला. इतकंच कशाला, "शतशब्दकथा" हे नावदेखील मिपाकर चिगो यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक मिपाकरांनी उत्तमोत्तम शतशब्दकथा लिहिल्या, लिहीत आहेत.
मिपाकरांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करत आहोत शतशब्दकथा स्पर्धा - पण खास मिसळपाव पद्धतीने - खमंग तर्री मारून!
या स्पर्धेच्या दोन फेर्या असणार आहेत.
सगळेच सुरळीत चालले आहे
भारतात यंदा सगळेच
सुरळीत चालले आहे.....
देशाच्या उज्जवल भवितव्याची
सर्वांना खात्री पटली आहे.....
सर्वत्र पुरेसा पाऊस पडतोय...
एल नीनो चा प्रभाव
अजिबात जाणवत नाहीये.
कुठेच दुष्काळाचे सावट नाही.
विदर्भातला शेतकरी
आत्महत्या करत नाहीये.
कर्णाटकाच्या शुगरबेल्टचा शेतकरी
उभ्या उसाला आग लावत त्यात
स्वतःची होळी पेटवत नाहीये,
त्यांचा ऊस वेळीच उचलला कारखान्यांनी...
मराठवाड्यात जायकवाडी तुडुंब भरले आहे,
टैंकरची गरजच भासत नाहीये कुठेही.
मोसंबीडाळिंबाच्या बागा अजिबात सुकल्या नाहीत.
जनावरे छावणीत गेली नाही बिल्कुल.
उस उत्पादकांना मनाजोगता भाव भेटतोय.
धानाची दुबार पेरणी करायची गरज नाही.
उत्तरेच्या राज्यांत
मिसळपाव