Skip to main content

चाहुल

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 03/09/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
चाहुल- डोळ्यांत श्रुंगार भरताना, सौभाग्याचं लेणं लेताना, भरजरी शालू सैरभर नजर हिरवा चुडा जरीचा पदर फुललेला तिथेच असेल कुठेतरी मी नि:शब्द आणि गहिवरलेला... . . उत्फुल्लं- भरत्या सागरास पाहताना, आहोटिला चंद्र वाहताना, चमचम मोती अवखळ किनारा भरली मासोळी वादळी वारा सुटलेला. तिथेच असेल कुठेतरी मी तुझ्याच प्रितीत रमलेला... . . भणंग- आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना, मागे वळून पाहताना, पहाटेचा सडा बाभळीच झाडं उजाड माळरान पाण्याचा माठ भरलेला. तिथेच असेन मी कुठेतरी, तुझ्याचसाठी हरवलेला...
काव्यरस

अवधूत (भाग-३)

लेखक मांत्रिक यांनी गुरुवार, 03/09/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २ नरकचतुर्दशीची पहाट. घरोघरी बायकांची धांदल उडालेली होती. अजूनही गाढ झोपेत असलेल्या पोरासोरांना रट्टे दिले जात होते. नवीन कपडे घालून थोडंसं मिरवायच्या मनःस्थितीत असलेल्या मुली उगाचच पुन्हा पुन्हा अंगणात येऊन परत घरात जात होत्या. बाप्ये लोक मात्र निवांत घोरत पडलेले होते. वातावरणात चांगलाच गारठा होता. काही तरूण मंडळींनी शेकोटी पेटवून गप्पांचा अड्डा जमवलेला होता.

नात्यातले लहान मोठे

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 03/09/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (३)

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 03/09/2015 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================== भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५ ================================================================ Hello family! कुठे सुरूवात करू? ५०० सीसी Royal एन्फ़ील्ड बुलेट मोटरसायकल पासून सांगतो. हिच्यावर हिमालय-दौड करणं यासारखा अप्रतिम अनुभव नाही!

बाबांचा 'सैगल'

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 02/09/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मनगट घट्ट पकडून बाबा गर्दीतून वाट काढत भरभर चालत होते. मी रेंगाळतोय असे वाटले की बाबा मला पुढे ओढायचे, त्यांच्या वेगाने मला चालता येत नव्हते, पळावे लागत होते. फोर्टचा परिसर माझ्याकरता जादुनगरीच होती, फुटपाथावरील ते स्टॉल, त्यावरील इलेक्ट्रोनिक वस्तू, कॅमेरे, रिमोटवर चालणारी गाडी,हवेत उडणारे प्लॅस्टिकचे हॅलिकोप्टर,पाण्याच्या टबमध्ये फिरणारी बोट काय बघू नि काय नको अशी माझी अवस्था झाली होती.

दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 02/09/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला बियर लेखाचे शीर्षक वाचल्यावर कदाचित मराठवाड्यातील पाणी टंचाईवर आजचा लेख असणार असे वाटण्याची शक्यता आहे. तसे नाही. मी येथे चर्चा करणार आहे ती मद्याची. अर्थात औरंगाबादमधील बियर इंडस्ट्रीची.

बेरोजगार(कथा)

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 02/09/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
अज्या तणतणतच रुमवर आला. रागारागाने शुज फेकुन देत बोलु लागला... "नाय रे योग्या, नाय होणार आपलं पुण्यात काही! च्यायला या पण कंपनीत तिसर्‍या राउंडनंतर बाहेर!" योग्या निवांत मोबाईलवर गेम खेळत होता. त्याने लक्षच दिले नाही. "ए भाड्या तुला बोलतोय!" योग्याने मोबाईल खाली ठेवला अन बोलला - "हं बोल काय झालं?" "काय व्हायचय ? तिसर्‍या राउंड्मध्ये बाहेर! च्यायला यांच्या , दिवसभर काही खाल्ल नव्हतं , सकाळी नऊ ला बोलवलं होतं, अकरा वाजता अ‍ॅप्टी घेतली, दोन वाजेपर्यंत बसवुन घेतलं, नंतर अजुन एक टेक्निकल, ती पण केली क्रॅक, चार वाजता जीडी घेतला, बारा मधुन दोनच घेतले. "सोडरे!" योग्या बोलला.

सुक्या बोंबलाचे कालवण.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 02/09/2015 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरु झाला की, गरमागरम कांदाभजी,भाजलेले कणीस, मसाल्याचा चहा,कॉफी यांचे वास दरवळू लागतात.

धर्मगंड

लेखक संदीप ताम्हनकर यांनी बुधवार, 02/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
I धर्मगंड I I धर्माच्या गायीचं काढा दुध I I वाटणारे आपणच याची असुदे शुद्ध I I द्या थोडे थोडे काहींना, पळीपळीने I I बाकी सगळ्याची पंचपात्रातून आचमने I I घेऊन जा पुन्हा एकदा पुराणात I I खात बसुदे प्रसादाचा पवित्र वांगीभात I I करू जानव्याचा इंटरनॅशनल ब्रॅन्ड I I कुरवाळत बसू धर्माचे बेंड I I ब्रम्ह गाठीत मोठी शक्ती असते पहा I I मारू मुठ्ठ्या - ओम फट्ट स्वाहा I I जाज्वल्य अस्मितेचं वगैरे एक बरं असतं I I स्वतःचं काही कर्तृत्व नसलं तरी चालतं I I जातीत जन्माला तर तुझं काय त्यात I I काढा मग जन्म-जन्मान्तरं, पुण्य आणि पाप I I वर्तमानशून्य आणि भविष्य अज्ञान्यांना I I काल्पनिक भूत काळाचाच तर आधार

बैलगाड्यावरून सुपर संगणक, एअर पोर्ट ते tifr मधे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 02/09/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
“ज्या देशात अजून बैलगाड्या व्यवहारात आहेत त्या देशात सुपर संगणकसुद्धा व्यवहारात येत आहे”. व्हॅक्युम ट्युब्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फर्स्ट जनरेशन संगणक म्हणतात.उदा.tifrac संगणक. 1942-54 ट्रान्झीस्टर्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे सेकंड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cdc-3600 संगणक.1952-64 इंटीग्रेटेड सर्किट्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे थर्ड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cyber 175 संगणक 1964-72 व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट्स (vlsi) वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फोर्थ जनरेशन संगणक म्हणतात.