Skip to main content

विधान परिषदेचे गणित भाग २

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या विरोधी बाकांवरची हवा खात असल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुका एकत्र लढववाव्यात असा निर्णय तातडीने घेऊन टाकला. नुकतीच विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखेंच्या शासकीय निवासस्थानी अशोक चव्हाण विखे, माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजितदादा पवार व जयंत पाटील असे एकत्र बसले व त्यांनी आघाडीची घोषणा करून टाकली. मुंबई मनपामध्ये मागच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष निरनिराळे लढले होते आणि शिवसेनेची सत्ता तिथे आली होती. दीडच वर्षात पुन्हा मुंबई मनपाच्या निवडणुका येत आहेत.

विधान परिषदेचे गणित: भाग १

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गांधी भवन या काँग्रेस मुख्यालयात नारायण राणेंची जी पत्रकार परिषद झाली, त्यात अन्य प्रश्नांबरोबरच "तुम्ही परिषदेची निवडणूक मुंबईतून लढवणार का?" हा एक प्रश्न आलाच. अर्थातच राणे हे मुरलेले राजकारणी असल्याने त्यांनी त्या प्रश्नाला सहज बगल दिली. शेजारी बसलेल्या प्रवक्ता सचिन सावंतांकडे इशारा करत "यांची शिफारस करू" असे राणे म्हणाले. पण माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सातत्याने विधीमंडळात पुन्हा प्रवेश करण्याची धडपड करतच आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.

एक होती म्हातारी

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 16/10/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला. "उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली. आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला.

एक होतं गाव .....

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 16/10/2015 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
गावाचं नाव विचारू नका. पण गाव अर्थातच कोकणातलं. तिथल्या प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. तीही साधीसुधी नाही तर भुताखेताची. ही कथा सुद्धा त्यापैकीच. आता तुमचा विश्वास नसेल तर नका बापडे ठेऊ . काही सक्ती नाही . पण गोष्ट वाचायला काय जातं ? इथे पूर्वापार चालत आलेली जमीनदारीची परंपरा होती आणि त्या सोबतीनं नांदणारी गरिबी. एक प्रकारची पिळवणूकच होती ती. कदाचित काही जण सन्माननीय अपवाद असतीलही. पण ते खरोखर अपवादापुरते. जवळपासच्या पंधरा वीस गावांची देखभाल(?) करण्याची जबाबदारी यांच्याकडे असे. त्यांचा मोठ्ठा वाडा असे.

शब्द

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 16/10/2015 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/33189 शब्दांचा पसारा सारा, शब्दांचाच आसरा, शब्द भुलवून नेतात, शब्द झुलवत ठेवतात, शब्द दिलासा देतात, शब्द अंतही पाहतात, शब्द मने तोडतात, शब्द नाती जोडतात, शब्द वार करतात, शब्द घायाळ करतात, शब्दांच्या जखमा सलतात, मनात निरंतर उरतात, जखमा ज्या कधी न भरतात, जखमा त्या वेदना देत जगतात, कायमस्वरूपी....
काव्यरस

भरली केळी

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 16/10/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
रुची विशेषांक पुरवणी ( अनेक्स )साठी अनाहुतांकडून :- भरली केळी साहित्य:- राजेळी केळी, ओलं खोबरं ,गुळ. कृती :- १) राजेळी केळी आणून त्याची साल काळी पडू लागली की ते तयार झाले समझते.साल काढा आणि जपून ठेवा.ती वापरायची आहे. फोटो १ फोटो २ २) तीन चार तुकडे करा.सुरीने त्या तुकड्यांना थोडी चीर द्या. ३) ओल्या खोबय्रात थोडासाच गुळ घालून शिजवून मोदकाचे सारण करतो तसे करा आणि केळ्याच्या चीर दिलेल्या तुकड्यांत भरा. फोटो ३

विकट वाट विकटगडाची

लेखक जगप्रवासी यांनी शुक्रवार, 16/10/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
आता कुठला गड करावा ह्यावर माझ आणि बायकोच खलबत चालू होत. बायकोने सहज विचारलं "माथेरान जवळच्या विकटगड करायचा का?" म्हटलं ठीक आहे बघूया झेपतो का, विकटगड करायचा म्हणून गुगल बाबाला म्हटलं जर माहिती द्या तर एक इमेज आली त्यात शिवशौर्य ट्रेकर्स १३ सप्टेंबर ला ह्या गडाच्या ट्रेकच आयोजन करताहेत असा कळाल.

हिशोब

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/10/2015 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
पोटापाणयाची मोठी चिंता होती मला.पैशासाठी काय पडेल ते करणं भागच होत त्यामुळं,त्यांचा तो प्रस्ताव मी ताबडतोप मान्य केला.आणि सरकारी दवाखान्याच्या व्हरांड्यात टाकलेल्या अमरला आणलं मी ऊचलून घरात.एड्स पेशंटला कोण थारा देणार? तो मी दिला.पैशाची चिंता करू नका ते बोलले,आणि 5000 रु.