Skip to main content

रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना....

लेखक कविता१९७८ यांनी रविवार, 06/12/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस तिथे दुसर्‍या बायकांची काय बिशाद तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु तरीही जा तुला माफ केले कारण एक आई दुसर्‍या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही..
काव्यरस

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/12/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुप

दुष्काळ - जिंकायाची आहे लढाई

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 06/12/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळाचा पडला वेढा रूष्ट जाहले पाऊसपाणी मात्र भूमीच्या राजपुत्रा तू नकोस राहु खचल्यावाणी दुर्दैवाने आजघडीला आभाळाचा रोष इथे जिथे डोलली हिरवी राने उजाड आता शेत तिथे जिंकायाची आहे लढाई आपणास ही आज पुन्हा दुर्भाग्याचे जरी उन्हाळे तरी न भितो आम्ही उन्हा जरी कोपली अवघी सृष्टि समस्त बांधव तुझ्यासवे लाख हातांनी लढत राहु घडवाया सुखस्वप्न नवे संपुन जातील दिवस हेही इथे बरसतील पाऊसधारा पुनश्च येईल जुनी सुबत्ता दुःखाला ना उरेल थारा नकोच ओझे उपकारांचे हिमतीने अन् जाऊ पुढे अशी घेऊया गगनभरारी गरुडाचीही फिकी पडे विसरुन जाऊ निराशवाटा प्रगतीच्या त्या घडवु पथा आता दाखवु अवघ्या विश्वा ही बळीराजाची जिद्दकथ
काव्यरस

म्हण

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 06/12/2015 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साहेबांचा पुढचा पुर्ण आठवडा धावपळीतच गेलेला. कसली कसली उदघाटनं, सत्कार समारंभ, मिरवणुका. नुसती पळापळ. आता आख्ख पोलिस खातं त्यांच्या हातात आलेलं म्हटल्यावर या गोष्टी कायम असनारच. पण पुढच्या पाच वर्षाची गणितं मांडुन त्यांना ते खातं त्यांच्याच पध्दतीनं चालवायचं होतं. मागच्या मंत्री साहेबांनी पाडलेले वळणं बुजवुन त्यांना ती नव्यानं टाकायची होती. त्यासाठी संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजीत केलेली. राज्यातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांचे पत्रकार साहेबांच्या बंगल्यावर जमा झाले.

दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १

लेखक अजया यांनी रविवार, 06/12/2015 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेली सतरा वर्षे मी डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत आहे. दर दिवशी घडणारे काही सवाल जवाब मात्र तेच आहेत! ते म्हणजे बापरे! एवढा खर्च? बापरे, दात काढावा लागणार? रूट कॅनाल फार दुखते का हो? सगळे दात खराब झाले, आता काहीतरी कराच! लवकर का आला नाहीत वर तर कायम एकच उत्तर असतं, दात दुखत नव्हता! पण किडताना दिसत होता ना! यावर सगळे निरुत्तर असतात. याहून वाईट गत लहान मुलांची करून आणतात लोक. दुधाचे दात यावर प्रचंड गैरसमज असल्याने ते अगदी तिसर्‍या वर्षापासून किडले तरी पडणार म्हणून मुलांची ट्रीटमेंट न करता तसेच राहू देणारे लोक असतात. तेही पोराची दाढ सुजून आली की डेंटिस्ट गाठतात तोवर नाही.

काल पाहिली मी तिला......

लेखक एक एकटा एकटाच यांनी रविवार, 06/12/2015 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल पाहिली मी तिला पावसात चिंब भिजलेली माळुन अगणित मोती इंद्रधनुत सजलेली.............. काल पाहिली मी तिला पहाटेच्या धुक्यात वेढलेली ओझरत्या स्पर्शाने तिच्या ही हवा गुलाबी झालेली........ काल पाहिली मी तिला चांदण्यात निजलेली स्वप्नांच्या दुनियेत तिच्या सारी रात्र रमलेली.............. काल पाहिली मी तिला क्षितिजावर विसावलेली सांज उतरुन गेल्यावरही संधिप्रकाशात उरलेली............

साकल्यसूक्त

लेखक मितान यांनी शनिवार, 05/12/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे श्रवण.(एक उत्कट अनुभव!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 05/12/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे.

कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.

लेखक योगेश आलेकरी यांनी शनिवार, 05/12/2015 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन. कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो.

आली लहर केला कहर.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 05/12/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
आली लहर केला कहर....... मित्रासाठी आमची एक कविता ======= आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? चंद्रा वाणी मुखडा काळजाचा तुकडा ज्वानीचा कहर इष्काचा बहर नौ वारी साडी तंगशी चोळी नजरेत धार काळजावर वार खुदकन हसली काळजाला डसली जिवाला घोर झोपेच खोबरं धरला हात घातली मागणी खुदकन हसली शुक्राची चांदनी आई सरपंच. बाप आमदार आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? अविनाश