Skip to main content

चाफा

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 04/02/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवरी कुणाच्या आहे अजून चाफा! मंद परी जीवघेणा, आहे तसा पसारा! ऊन उठून येते रात्री, घर गोळा होते नेत्री! कुणी दिसते, कुणी विरते! परी चाफ्यापाशी सारे, हताश होऊन बसते! मंद परी जीवघेणा आहे तसा पसारा वाटेवरी कुणाच्याही असू नये गं चाफा! -शिवकन्या

लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी गुरुवार, 04/02/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी नऊ वाजता मुलांचा आवाज ऐकून जाग आली. इथे अजून काही वाटसरू होते. मेरठ वरून आले होते. आमच्याच शेजारचे. आजू बाजूच्या तंबू मध्ये सचिन ला शोधले. पण नाही दिसला. बहुतेक त्याने बारालाचा पार केला असेल. माझ्या पेक्ष्या तो अनुभवी पण आहे आणि शरीराने मजबूत. मी आपला हळू हळू कसा तरी इथे आलो. तो नक्कीच माझ्या पुढे गेला असेल.....

दिवस सातवा

सकाळी साडे पांच वाजता उठलो. शेजारच्या तंबू मध्ये मेरठ वरून आलेले शेजारी आज जायच्या तयारीत होते. त्यामुळे खूप गोंधळ चालू होता. त्यांच्या गोंधळाने मला पण जाग आली.

विज्ञान लेखमाला समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 04/02/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शशक आणि श्री गणेश लेखमालेनंतर आलेली विज्ञान लेखमालादेखील मिपाच्या सिद्धहस्त लेखकांनी आणि उत्साही वाचकांनी यशस्वी केली. बघता बघता विज्ञान लेखमालेचा शेवटचा लेखदेखील काल प्रकाशित झाला. आलेले लेख निवडताना आणि प्रकाशित करताना लेखकांच्या आणि विषयाच्या निवडीवर आमचा विश्वास तुमच्या प्रतिसादांनी सार्थ ठरवला. तसं म्हटलं, तर विज्ञान हा एक किचकट, बोजड आणि अनेकदा सर्वसामान्यांच्या कक्षेपलीकडील विषय. राजकारण आणि खेळ-जगताइतक्या, या दुनियेतील घडामोडी, बातम्या नेहमीच लोकांपर्यंत पोहोचतातच असं नाही. या दुनियेत घडणारा प्रवास, लागणारे शोध यांची आपली एक गती असते.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 03/02/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ वॅलीमध्ये जातानाच्या रस्त्याचे वर्णन, तिथे घालवलेला आमचा पहिला दिवस याचे वर्णन या मालिकेत आधीच्या लेखामध्ये आलेलेच आहे. वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता.

हायकु (कायकु)-२

लेखक नाखु यांनी बुधवार, 03/02/2016 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचा प्रयत्न बाप लेकीचा अल्लड प्रश्न साजुक उत्तर बालक कोण ? पालक कोण ? गुंता दुस्तर ===== कालचक्र हलले पान हसली कळी झुकुन पाही (सुकली) फुलरांगोळी ====== थोरांची ओळख (?) आधी पाहू धर्म मग शोधू जात ते उत्तुंग कर्तुत्व,सदगुण ई.

लदाख सायकल ने : गोंदला ते जिंगजिंगबार (भाग ५)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी बुधवार, 03/02/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
तू तुझे बघ मी माझे बघतो. तू तुझा उद्याचा कार्यक्रम तयार कर, मी माझा बनवतो. जर दोघांचे कर्यक्रम एक सारखे निघाले तर मग आपण एकत्र राहू. नाहीतर मग तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या. या गोष्टीवर दोघांची संमती झाली. तीन दिवस हाफ पैन्त घातल्या मुले गुड्घ्यापाशी पाय जळाले. खूप आग होत होती. आता उद्या पासून फुल पैन्त घालावी लागणार. आज दिवसभरात ६४ किलोमीटर सायकल चालवली.

दिवस पाचवा

साडे आठला डोळे उघडले. असे तसे नाही उघडले. सचिन न हलवून हलवून उठवलं. सचिन तर हेल्मेट घालून जाण्याच्या तयारीत होता.

अप-ग्रेड (२)

लेखक सायकलस्वार यांनी बुधवार, 03/02/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
'पण हा फोन आहे कुठे? आणि तो वापरायचा कसा?' 'सांगत्ये ऐका' बंड्याला बसते करीत नर्स म्हणाली. ************************************************************* 'आयफोन-१२ म्हणजे एक एकसंध चौकोनी ठोकळा नाही. त्याचे वेगवेगळे पार्ट्स तुमच्या शरीराशी इंटिग्रेट करण्यात आले आहेत, जेणेकरून तुमचा फोन वापरणं हे तुमच्या शरीराचा एखादा अवयव वापरण्याइतकंच सोपं झालं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या टाळूमध्ये त्याची जीपीएस चिप बसवली आहे. तुमच्या कानांमध्ये त्याचे स्पीकर्स बसवण्यात आले आहेत. तुमच्या हिरडीमध्ये मायक्रोफोन बसवला आहे. आणि हे पहा' असे म्हणून तिने त्याच्यासमोर आरसा धरला. बंड्याने आरशात पाहिले.

काटा वजनाचा --४

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/02/2016 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन. काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो.