Skip to main content

झिंग झिंग झिंगाट....सैराट ....!!!

लेखक भम्पक यांनी शुक्रवार, 13/05/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याच दिवशी सैराट पाहिला, त्यामुळे काहीही माहित नसल्याने भयंकर परिणाम झाला.अक्षरशः शेवट पाहिल्यावर तर एकदम गार पडलो. बराच वेळ कुणाशी बोललोच नाही. परश्या , अर्ची, लंगड्या अन साल्या एकदमच भन्नाट. त्याबद्दल काही लिहित नाही कारण मिपा वर त्याबद्दल पाऊस पडला आहे , अन मला भर घालण्यासारखे काहीच नाही. असो. खरे तर मला पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्या पात्रांचे आणि खुद्द नागराज चे मनोगत जाणून घ्यायचे होते . कारण सोशल मेडिया वर चाललेला धिंगाणा.

..विचारेन त्यालाच कॉफी चहा..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 13/05/2016 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
भरोसा करावा कुणाचा जरी.. भरोसाच नाही कशाचा जरी..! विचारेन त्यालाच कॉफी चहा घरी दूत आला यमाचा जरी मिळो गार माझी तुला सावली किती त्रास मजला उन्हाचा जरी मनी मान्य केले शशीचोर मी! खुळा आळ आहे नभाचा जरी. म्हणे वाघ गेल्याच जन्मातला अता जन्म आहे सशाचा जरी किती त्यात जो तो पुरा गुंतला खरा खेळ होता मनाचा जरी अरे वाकला तो कशाने असा.? तसा भार नव्हता जगाचा जरी! खरा भक्त त्याला मिळो एकदा तिथे प्रश्न असला युगाचा जरी! - कानडाऊ योगेशु

उपनिषदे (१)

लेखक शरद यांनी शुक्रवार, 13/05/2016 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

माहीत नाही!

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 13/05/2016 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : झकेरा तामेर यांच्या He Doesn't Know या कथेचा स्वैर भावानुवाद. शिवकन्या ताई, जयंत काका, बोकाशेट यांनी केलेले अनुवाद वाचून हे एकदा करून पहायचं आहे असा भुंगा मागे लागला. पहिला प्रयत्न म्हणून छोटीशीचं कथा निवडली. वाचल्यावर वाटलं ह्यात काय एवढ! प्रत्यक्षात मात्र फॅ फॅ उडाली. मूळ कथेतला भाव हरवू न देता तिला आपल्या शब्दात मांडण हे अवघड काम आहे हे आता चांगल ठसल आहे मनावर. ही कथासुद्धा मागच्या वर्षी लिहून झाली होती. फर्स्ट ड्राफ्ट शिवकन्याताईने वाचला आणि काही ( खरतर भरपूर ;) ) बदल सूचवले. त्यातले सर्वच बदल मला करता आलेत की नाही काय माहीत! नंतर अनेक कारणांनी इथे कथा प्रकाशित करणे राहून गेले.

अक्षय पावभाजी

लेखक घाटी फ्लेमिंगो यांनी शुक्रवार, 13/05/2016 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेकफास्टला पावभाजी खाण्याची ही काही माझी पहिली वेळ नाही. आदल्या दिवशी घरात काही कार्यक्रम झाला आणि आलेल्या पाहूण्यांसाठी पावभाजीचा मेनु असेल तर पुढचे दोन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ राहिलेली पावभाजी संपवण्याचा अनुभव मला अगदी लहानपणापासूनचा आहे. फक्त माझी आई किंवा बायकोच नाही... तर इतरही काही माता-भगिनींच्या बाबतीत मी हे होताना पाहिलं आहे. एकदा केलेली पावभाजी केलेल्या दिवशी संपली अथवा कमी पडली हे माझ्या तरी ऐकीवात नाही. ह्या भाजीबरोबर खायला आणलेले पाव संपतात... मग चौकोनी ब्रेडच्या स्लाईसवर ह्या भाजीला साथ देण्याची जबाबदारी येते..! तेही दम तोडतात...

बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/05/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख वाचताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी "त्या काळात एखाद्या कारकुनाचा पगार महिना ८ रुपये असायचा तर चांगल्या मास्तरांचा ३०-३५.'' बालगंधर्व.... भाग - १ पहिला... बालगंधर्व....

एक संघ मैदानातला - भाग ८

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 12/05/2016 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उशिरा उशिरा म्हणतानासुद्धा ८ ला जाग आली. अजून एवढेचं वाजतायत म्हणजे काकांना निघायला अजून २ तास आहेत. मी परत पांघरुणात डोक खुपसलं. ते आईने पाहिलं आणि मला उठवलं. मी तिला खुणेने गप्प बस सांगायचा प्रयत्न करत असताना बेडरूममध्ये काका शिरले आणि मोठ्या आवाजात मला उठवायला लागले. आता काही इलाजच नव्हता. गपचूप उठून बसले. तोंड धुवून चहा घेईपर्यंत शांतपणे ते पेपर वाचत होते. माझा चहा पिउन झाल्याबरोबर मला हाक मारून मला समोर बसायला लावले. मला वाटलं झालं आता हे लग्नाचा वैगरे विषय काढणार पण त्यांनी तस केल नाही. त्यांनी त्यांच्या कुळाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि मग हळूहळू गाडी सतीशकडे वळवली.

“पता नहीं. कुछ हो रहा हैं अन्दर...”

लेखक पथिक यांनी गुरुवार, 12/05/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
अकोल्याला (माझं शहर) आलो कि मी नं चुकता शहरातल्या त्या भागात फिरायला जातो जिकडे शहरातले मोठे मार्केट, भाजी बाजार आणि बरीच दाट वस्ती आहे. हिंदू, मुसलमान, सिंधी, मारवाडी असे प्रामुख्याने काही ना काही व्यवसाय करणारे लोक तिकडे राहतात. तिकडली दाटीवाटीने उभी असलेली दुकानं, होटेलं, लोकांची गर्दी, गोंगाट, खरेदी-विक्रीची, जाणाऱ्या-येणाऱ्यांची गडबड, ई सगळं फिरून फिरून, त्या गर्दीत मिसळून पाहायला फार आवडतं मला.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 12/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका मागच्या लेखात आपण बघितलं की, निसर्गाच्या नियमानुसार सर्व सृष्टी चालते. त्याची एक व्यवस्था असते. जर ह्या व्यवस्थेवर ताण पडला, तर निसर्गही बदलतो. जसं गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे. जर आपण वाकडे तिकडे चाललो तर आपण ह्या नियमामुळेच पडतो. त्याच प्रकारे आपण आणि निसर्ग ह्यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

व्यक्तिगतता नी व्यावसायिकतेचे नाते

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 12/05/2016 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा सदस्या अतिवास यांचे यशस्वी माघार हे रोचक अनुभवकथन वाचनात आले. त्या लेखात त्यांनी त्यांचे विवीध व्यक्तिगत दृष्टिकोण मांडले आहेत त्यातल्या एका दृष्टीकोणाने विशेषत्वाने लक्ष वेधले.
...'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे....