व्यक्तिगतता नी व्यावसायिकतेचे नाते
मिपा सदस्या अतिवास यांचे यशस्वी माघार हे रोचक अनुभवकथन वाचनात आले. त्या लेखात त्यांनी त्यांचे विवीध व्यक्तिगत दृष्टिकोण मांडले आहेत त्यातल्या एका दृष्टीकोणाने विशेषत्वाने लक्ष वेधले.
...'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे....उपरोक्त वाक्याचा खिस पाडण्यासाठी मुद्दामच काही काँटेक्स्ट बाजूला ठेऊन विचारार्थ घेतले आहे. उपरोक्त वाक्यात दोन दावे आहेत, पहिला दावा 'आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते' हा दावा पहिला यासाठी की हा दावा/विश्वास (पुर्वग्रह) आहे म्हणूनच 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात फरक करणार्या इतरांचा विश्वास/दृष्टीकोण 'सोयीचा' म्हणजे चुकीचा असल्याचा (अट्टाहासीक?) विश्वास आहे. 'आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते' आता हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचा, वाक्य लिहिणारी व्यक्ती लेखिका अतिवास नाहीत असे गृहीत धरा, साधन शुचितेची तमा न बाळगणारे कुणि व्यक्त करत आहेत असा विचार करा आणि मग विनोद निर्मिती होते की 'आदर्श' आणि 'त्यागी' या शब्दांचे अर्थ बदलले जाण्याचा विषाद वाटतो ? हे ठरवा. म्हणजे 'आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते' हे वाक्य नुसते वेगळे काढले तर काय होते आपण पाहीले आता दुसर्या भागा कडे येऊ; " 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात फरक करणार्या इतरांचा विश्वास/दृष्टीकोण 'सोयीचा' म्हणजे चुकीचा असतो (?)" आता आपण एक सार्वजनिक जिवनातले वेगळे म्हणजे अजित डोवालांचे उदाहरण घेऊ, त्यांची व्यक्तिगत श्रद्धा त्यांना गोमांस वर्ज्य सांगते पण प्रत्यक्षात त्यांना गुप्तहेरम्हणून पाकीस्तानात काम करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी त्यांचे व्यक्तिगत जिवन आणि व्यावसायिक जबाबदारी यात फरक करावयास हवा की नको ? -प्रत्यक्षात व्यक्तिगत श्रद्धा आड न आणता त्यांनी त्यांची व्यावसायिक जबाबदारी ते पार पाडू शकले कारण 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात फरक करु शकतात हे महत्वाचे नाही का ? आपण आता मिसळपाव संस्थळाच्या मालकांचे उदाहरण घेऊ त्यांचे व्यक्तिग दृष्टीकोण आस्तीक असतील वा नास्तीक असतील त्यांचे व्यक्तिगत दृष्टीकोण व्यावसायिकतेच्या आड येताना दिसत नाहीत आस्तीक आणि नास्तिक दोन्ही स्वरुपाच्या ग्राहंकांना त्यांच्या संस्थळावर व्यक्त होण्यापासून थांबवत नाहीत, हे महत्वाचे नाही का ? भारताचे राष्ट्रपती, संसदेतील अध्यक्ष ते विधीमंडळातील अध्यक्ष सभापती ते निवडणूक घेणार्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षापासून ते सर्वसामान्य शासकीय कर्मचार्यांपर्यंत सर्वजण सर्व साधारणपणे व्यक्तिगत विश्वास आणि व्यावसायीक जबाबदारी यांची गल्लत करत नाहीत. "आपल्या भावना, आपली मूल्ये, आपले विचार यातूनच आपल्या बाह्य कृतींना वळण आणि दिशा मिळते." हे खरे आहे तुमचे व्यक्तिगत जिवनातील कौशल्य आणि इंटेग्रिटी तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जिवनात आणतानाच 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात गल्लत न करणे महत्वाचे नसते का ?
वर्गीकरण
बाकी काय नाही पण मिपामालकाचे
नाही पटले
In reply to नाही पटले by मराठी कथालेखक
गुड पॉईंट पण यावर अधिक बाजूने
In reply to गुड पॉईंट पण यावर अधिक बाजूने by माहितगार
हो ना.. पण अजून मातब्बर मंडळी
In reply to हो ना.. पण अजून मातब्बर मंडळी by मराठी कथालेखक
:( फिर का करेंगे :)
वाचतेय..
In reply to वाचतेय.. by यशोधरा
काय वाचतात :D
In reply to वाचतेय.. by यशोधरा
क्रमशः नाहीये :)
In reply to क्रमशः नाहीये :) by मराठी कथालेखक
क्रमशः नसलं तरी
In reply to क्रमशः नसलं तरी by यशोधरा
काय मॅडम थट्टा करताय गरीबाची