मधातील मेवा फळं
'भुकेला कोंडा नि नीजेला धोंडा' असे म्हणतात.
थक्क करणारी एक घोडदौड
पेला अर्धा भरला आहे.. पेला अर्धा सरला आहे... पाडगावकरांच्या या कवितेतले भाव इतके कालातीत आहेत की बास! आणि क्षणोक्षण त्याचा प्रत्यय येत राहतो. शंभर व्यक्ती भेटतात, शंभर गोष्टी कानावर पडतात. नाव, गाव, चेहरा, व्यवसाय या पलिकडची माणसाची एक ओळख असते ती म्हणजे त्याचा विचार. त्याला दृष्टिकोन म्हणा, स्वभाव म्हणा, किंवा अॅटिट्यूड म्हणा इंग्लिशमधे. हा अॅटिट्यूड माणसाची खरी ओळख करून देतो, तोच माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. बाकी सगळं दुय्यम असतं.
संकटं, अडचणी सगळ्यांनाच येतात. काही त्यात खचतात, काही त्यातही रचतात, काही विरतात, काही उरतात, काही पडतात, काही घडतात. अॅटिट्यूड.
हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल
(चित्रात सक्रेणी देवीचे मंदिर)
हिमाचल मध्ये मंडी जिल्ह्यातील सक्रेण घाट. चहु बाजूला उंच आणि कठीण हिरवेगार पर्वतराजी. या भागात पाऊस हि भरपूर पडतो. पाऊस झाला कि पर्वत इथे नेहमीच ढासळतातच. पावसाळी दिवसात तर बाहेरच्या जगाशी संबंध हा नेहमीच तुटतो.
या भागात वसाहत विरळ आहे. इथले लोक उंचपुरे हृष्ट्पुष्ट आणि काटक शरीरयष्टीचे असतात. माझ्या लेकीचे सासर हि याच भागात आहे अर्थात मंदिरा जवळच आहे.राजमाची नावाचं मनोरंजन
काल पाऊस आणण्यासाठी सह्याद्रीत भटकावे म्हणून राजमाचीला जाणं झालं.कोंदिवडेमार्गे चढताना पाऊस लागला त्याअगोदर जांभळं खायला मिळाली.यावेळेस फोटोग्राफर मिपाकर स्टीव रॅाजर्स/ स्पा/मन्या इत्यादी एकचसोबत होता.फोटोग्राफीच्या टिप्स मिळणार होत्या.येताना तो एक विशलिस्ट घेऊन आलेला.म्हटलं बघू त्यातलं किती जमतंय ते.कर्जत गाडी येवो नाहीतर स्टेशनवरच फिरून आणलेला डबा खाऊन परत जाऊ.
वेळेवर कर्जतला गेलो आणि वडा ,डोसा चहा घेऊन सिक्ससीटर ओटोरिक्षा नाका/आमराई नाकाकडे कूच केलं.कर्जत बाजारही बदलत चाललाय गावरानपणा हरवून नवीन दुकाने येत आहेत.चौदा किमी अंतर
मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही,
काल जुनी अडगळ साफ करताना कॉलेज मध्ये असताना ट ला ट जोडून लिहिलेली कविता सापडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि रात्री ४ वाजेपर्यंत बायकोशी गप्पा मारत बसलो. सहज तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून इथे टंकली.
पहिली कविता मी लिहिलेली, माझ्या बायकोला (तेव्हा गर्लफ्रेंड होती) एका साध्या कागदावर लिहून गुलाबा सोबत दिलेली.
काव्यरस
सफर ग्रीसची: भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
केप सूनिअनचा सूर्यास्त मनात साठवून पहिल्या दिवशी मुक्कामासाठी कोरिंथला आलो. हे खरं तर नवं कोरिंथ. साधारण साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असलेलं प्राचीन कोरिंथ (ग्रीकमध्ये Archaia Korinthos) १८५८ साली भूकंपामुळे उध्वस्त झाल्यावर जुन्या शहरापासून दूर नवं कोरिंथ वसविण्यात आलं.
सार्थक जन्म-समर्पण अर्थात नर्मदाख्यान लोककथा.
असूर संहारा नंतर थकून बैसले त्रिपुरारी। निढळावरचा घर्मबिंदू एक टपकला भूमिवरी॥
त्या बिंदूतुन प्रगटली एक कन्या सुंदरी। कोण असशी गे मुली तू सुख देती हासरी॥
मी तर असे आपुलीच तनुजा बोले नमस्कारुनी। घर्मबिंदूमधुन आपुल्या जन्म माझा पावनी॥
दोन पुत्र असती आमुचे पण एक उणीव होती उरी। तुझ्या जन्माने सुरसे आज तीही झाली पुरी॥
आपुलीच गे पुत्री अपर्णे येई तू स्वीकार करी। येई गे मुली बैस अंकी हसून बोले शर्वरी॥
दोन बंधू एक भगिनी मोदे खेळती अंगणी। सुखी गृहस्थी पाहून डोलती उमा आणि मदनारी॥
स्कंद गजानन लपून बैसती शोधतसे मंदाकिनी। कोठे लपले बंधू दोघे खूणे दाखवि
काव्यरस
चॉकलेट
पक्याला वाईट सवय. स्टेशनवर घेऊन जायचा मला. आगगाड्यांचा खडबडाट नुसता. गर्दी म्हणजे नुसती चेंगराचेंगरी. थांबलेल्या मालगाड्या बघण्यात काय हशील? स्लीपर कोचात जावून झोपणं, असले उद्योग त्याचे. एकदा एसी डब्यातून हाकललं आम्हाला, साल्या झाडूवाल्याने, छ्या.
चकमक चकमक रात्र होती.
अशीच खडबडत एक रेल्वे आली. थांबली. आणि निघून गेली.
जगाचं ओझं पाठीवर वाहीलेला माणूस दिसला. अगदीच थकलेला. माझ्या शेजारी येऊन बसला. म्हणजे बाकड्यावर.
मी सिगारेट काढली. अन उगाचच्या उगाच त्याला माचीस मागितलं. हे पक्याचे आवडते उद्योग. पण आज तो कुठे उलथलाय?
तो टकलू माणूस माझ्याकडे भांबावून बघतच राहिला. साल्या माचीस मागितलं रे.
मिसळपाव