Skip to main content

का एवढे धप्पा धापा पोलिसांच्या मागे लागलेत लोक ?

लेखक वाल्मिक यांनी रविवार, 18/09/2016 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होते ,कोणतेही वर्तमान पात्र उघड फक्त बलात्कार बातम्या ,जणू भारतात लोक दुसरे काही काम करतच नाहीत आता पण सध्या गणपतीभर पोलिसांना मारणेच चालू आहे ,ते पण दर वेळी नवीन MO आता माझा प्रश्न 2012 ला जेव्हा रजा अकॅडेमिच्या वेळी गर्भवती पोलीस कॉन्स्टेबल महिलाना मारहाण झाली ,हाच मीडिया आणि हेच पक्ष का गॅप होते ? मी राज ठाकरे यांचा पाठीराखा नाहीये पण फक्त त्यांनहीच आवाज उठवला होता सौजन्य सप्ताह पळून पण लोक पोलिसांबद्दल अढी बाळगून आहेत ,पण अचानक एवढा उद्रेक कसा ?

पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

लेखक एस यांनी रविवार, 18/09/2016 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’ लेखिका – आतिवास सविता. आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत.

... असंही होतं ना कधी कधी....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 17/09/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

पण नाही होत ना असं!

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 16/09/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
पण नाही होत ना असं! आपण म्हणावं, अंगणात जरा सुखाचं बी टाकून बघू, फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकू, मऊ गवतावर पडून राहू, डोळे मिटून. पण नाही होत ना असं, जमिनीतच होतं अदृश्य सगळं सुख कुठेतरी एखाद्या बीला येतो कोंब पण तोवर दुःखाचं तण माजलेलं असतं मग आपणच खुरपणी करून नकळत काढून टाकतो तो कोंब न जाणो हेही असेल तणच! आपण म्हणावं, देण्यासारखं आहे काय?

रामदासांचे भारतभरातील ११११ मठ

लेखक दासबोध.कॊम यांनी शुक्रवार, 16/09/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
स्मार्टफोन, गूगल मॅप्स , रस्ते, वीज, घड्याळे, वहाने यांपैकी काहीच नसताना समर्थ रामदासांनी भारतभर उभ्या केलेल्या व आजवर टिकलेल्या एका जबरदस्त अद्भुत "इंटेलिजन्स नेटवर्क" ची अभ्यासपूर्ण कहाणी... समर्थांनी भारतभर उभ्या केलेल्या ११०० हून अधीक मठांमधील कही प्रमुख मठांची यादी समर्थशिष्य गिरीधर स्वामी लिखित समर्थप्रताप या ग्रंथात येते... त्यावरून बनविलेला नकाशा नमस्कार!

सुख म्हणजे काय असते?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 16/09/2016 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे!
काव्यरस