Skip to main content

माझे स्वप्न...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 13/10/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्वप्न... तुझी नाजुकता फुलात आहे फुलाचा गंध तुझ्यात आहे तुझी अवखळता पाण्यात आहे पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे तुझ्या रागाची धग आगीत आहे आगीची तेजस्विता तुझ्यात आहे तुझा अबोला वाऱ्यात आहे वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे तुझे अस्तित्व स्वप्न आहे माझे स्वप्न तुझ्यात आहे राजेंद्र देवी

खव्याचे काय करू?

लेखक इना यांनी गुरुवार, 13/10/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे गाजर हलवा करायला आणलेला खवा शिल्लक आहे, तरी झटपट करता येतील अशा रेसिपी सूचवाव्यात अशी विनंती. बऱ्याचदा आपण एखादा पदार्थ करण्यासाठी काही विशिष्ट साहित्य आणतो पण ते पूर्ण वापरले जात नाही तर इतर कुणाला ह्या धाग्यावर असे प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावेत, इथल्या पाककलानिपुण सदस्यांच्या सूचनांचा माझ्यासारख्या नवशिक्या स्वैपाकघरात लुड़बुड करणाऱ्याना फायदा होईल आणि सामान वाया जाण्याचे दुःखही होणार नाही. धन्यवाद

अशी सजेल दिवाळी

लेखक नूतन यांनी बुधवार, 12/10/2016 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ.

अंधार्या रस्त्यावरची लिफ्ट

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 12/10/2016 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. दोन्हीकडच्या पावसांमध्ये मात्र दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे पावसाचं प्रमाण. मुंबईला प्रचंड पाऊस. संततधार लागायची. पुण्याचा पाऊस त्याच्या एक त्रितियांश. दुसरा फरक म्हणजे या पावसाचा विद्युतपुरवठ्यावर होणारा व्यस्त परिणाम. (मराठी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे inverse. हिंदी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे busy.

मैत्रिणीचा ..... प्रतिसाद ("मैत्रीण " ला ).....

लेखक फिझा यांनी बुधवार, 12/10/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रिणींनो , धन्यवाद !!!! 'मैत्रीण 'हि कविता तुम्हाला आवडली. माझ्या ज्या मैत्रिणीसाठी हि कविता उमटली, त्या मैत्रिणीने त्या कवितेला दिलेला प्रतिसाद इथे पोस्ट करत आहे .... ...... ...... ......

(फेंदारलेल्या मिशा....)

लेखक नाखु यांनी बुधवार, 12/10/2016 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे. दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते. मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे. पाहून स्वप्ने सत्तेची बोकाळली आहे संराशा आता कोठे होऊ लागल्यात पाठवणी जराश्या का करीशी भणभण या वखवखलेल्या सत्ताबाजारात आता कोठे मिळविल्यात खुर्द्यात चवल्या जराश्या आजूबाजूला बोंबाबोंब किती कोण ऐकेल माझे घायाळ झाली आता कोठे माझी दमाची भाषा ना रुजते मन माझे या झाकोळल्या विजनात राहतं नाही माझ्या कृष्ण्कर्मे आडोश्या फरपटत जात

शिवरायांचा कालचा दसरा

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 12/10/2016 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज घुमत होता. तिथे गेले नऊ दिवस देवीचा जागर चालू होता. शारदीय नवरात्रीचे दिवस. दशमीचा चांदवा

अंधारलेल्या निशा...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 12/10/2016 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेल्या निशा... पाहून स्वप्ने उद्याची सोकावली आहे निराशा आता कोठे जागू लागल्यात आठवणी जराश्या का करीशी वणवण या रखरखलेल्या वाळवंटात आता कोठे विसावल्यात उन्हात सावल्या जराश्या आजूबाजूला कोलाहल किती कोण ऐकेल माझे वाचाळ झाली आता कोठे माझी मौनाची भाषा ना भिजते मन माझे या कोसळत्या पावसात राहतं नाही माझ्या आठवणी पारोश्या भरकटत जात आहे मी दिशाहीन झाल्या या दिशा दाविती उजेड मज या अंधारलेल्या निशा राजेंद्र देवी

हजारो ख्वाहिशे ऐसी

लेखक ईंद्रधनु यांनी बुधवार, 12/10/2016 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्जा गालिब हे शायरी मधलं एक अजरामर नाव. गालिबची "हजारो ख्वाहिशे ऐसी" हि गझल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. कितीतरी लोकांनी याचं रसग्रहण आपापल्या शब्दात केलं आहे त्यात माझीही एक भर घालतो. "हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमाँ , लेकिन फिर भी कम निकले" यामध्ये गालिबने माणसाच्या कधीही न संपणाऱ्या इच्छा आकांक्षांचं वर्णन अगदी अचूक शब्दात केलं आहे. एक एक इच्छा पूर्ण करताना जन्म संपेल अशा हजारो इच्छा आहेत.