दिवाळी (कविता)
लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी
उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी
लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा
धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा
शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी
टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी
होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी
तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी
बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी
रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी
रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा
शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा
चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा
वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा
काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे
मानवाच्या संगतीने, देवसुद्धा
काव्यरस
मिसळपाव
साहित्य :तिन वाटि : ओले खोबरे उचलेले
दोन वाटि : साखर
एक छोटी वाटि :दुध पावडर
एक छोटी वाटी : काजू पावडर
दुध : दोन तिन चमचे
वेलदोडा पुड,केशर,पिस्ता काप
कृती :खवलेले खोबरे आणि साखर व काजू पावडर मिक्सर भांड्यात तिन चमचे दुध घालुन फिरवून एकजीव करुन घेणे.हे मिश्रण मायक्रोव्हेव भांड्यात घालून दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे.दोन मिनिटानंतर मिश्रण एकदा