नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया.
सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे.
१) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल.
२) मेन्यु - सध्या वरच्या मेन्युमध्ये साहित्य प्रकार नावाचा मेन्यु आहे.