Skip to main content

संघर्ष : सुरुवात.

लेखक दिपक लोखंडे यांनी मंगळवार, 12/09/2017 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
०५ ऑगस्ट सकाळी : ७ वा. त्या दिवशी राधा खूप सुंदर दिसत होती तिचा तो निरागस चेहरा अबोला असूनही खूप काही बोलून जात होता. राधा अंघोळ करून केस झटकावत बाहेर आली पहाटेची तीव्र किरणे तिच्या चेऱ्यावर पडताच तिने डोळे बंद केले, तसा आनंद तिच्या समोर जाऊन थांबला. अचानक समोर आल्याने राधा थोडी दचकली (तशी राधा खूप धाडशी व जिद्दी होती प्रेमळ स्वभाव असल्याने तिने तिच्या ओवातिभोवती असणाऱ्या सर्व लोकांची मने जिंकली होती. आनंद ही त्यातलाच एक. इंजिनीयरिंग कॉलेज मधली ओळख..

एका वेडाला पुनश्च सुरुवात!

लेखक mayu4u यांनी मंगळवार, 12/09/2017 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
“मी पुन्हा सायकलिंग सुरु करणार आहे!" (भीत भीत) अस्मादिक. “उत्तम कल्पना! चांगलीशी सायकल घे आणि सुरु कर.” तीर्थरूप. (चेहऱ्यावर sadist हसू) “शाळेत पण नाव घालूया का?” सौ. “किती पैसे उडवणार आहेस?” मातोश्री. “साधारण १५ - २० हजार" (पडलेल्या आवाजात) मी. “एवढे? त्यापेक्षा बँकेत ठेव!” (अर्थातच) मातोश्री. “त्यापेक्षा घरी टीव्ही घे!” (फणकाऱ्याने) सौ. =============================================================================== काही दिवसांपूर्वी एका रविवारी दुपारी जेवणानंतर आमच्या घरी झालेला हा सुखसंवाद.

निरभ्र आकाशातील ' मृग नक्षत्र'

लेखक ओरायन यांनी मंगळवार, 12/09/2017 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
'ओरायन ' म्हणजे खगोलीय भाषेत काय ? आपणांस माहित असेल कि जागतिक मान्यतेनुसार एकूण ८८ तारकासमूह (Constellation)आहेत. जगात वेगवगेळ्या पुरातन संस्कृतीमध्ये, (जसे ग्रीक, प्राचीन सुमेरियन, चिनी, भारतीय) अनेक तारकांचा बनलेल्या समूहाला वेगवेगळी नावे आहेत. तसेच त्यांची संख्या वेगवेगळी आहे. शिवाय तारकासमूहांतील ताऱ्यांची संख्या पण कमीअधिक आहे. आपल्याकडे नाही कां २७ नक्षत्रे आहेत ? आता सर्वाना मान्य होतील व जे सर्वसमावेशक असतील, असे तारकासमूह करण्याची वेळ आली होती. कारण सोईसाठी व सहजतेसाठी जगभर खगोलीय भाषा एकच हवी.

प्रतिशोध भाग-४

लेखक कऊ यांनी मंगळवार, 12/09/2017 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ -http://www.misalpav.com/node/40584 भाग २ -http://www.misalpav.com/node/40583 भाग ३- http://www.misalpav.com/node/40568 भाग ४ पुढच्या दिवशी कॉलेज कँटिन मध्ये काव्या स्वतःच्याच तंद्रीमध्ये बसली होती. आतापर्यंत सियालचे किती कॉल येऊन गेले पण तिने उचलला नाही. "हाय काव्या, आज एकटीच,गँग कुठे ग तुझी.."स्वरा तिच्या समोरच्या खुर्चीत बसून बोलली. "माहित नाही.स्वरा तू या कॉलेजमध्ये अकरावी पासून आहे ना?" "हो ,का ग??अस अचानक?" "स्वरा मला तुला का

अत्तर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 12/09/2017 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या

नाल !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 11/09/2017 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नाल…. आमच्या इंजिनिअरींग कॉलेजमधे आमच्या टोळीत एकाहून एक नवरत्न होती. त्यातील एक राजघराण्यातील रत्न म्हणजे राजे मालोजीराजे पवार. गंमत म्हणजे आम्ही होतो ही नऊ जण. आता हॉस्टेलवर काय काय चालते याबद्दल मी काही सांगायला नको आणि विशेषत: इंजिनीअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर. त्या काळात इंजिनिअरींगच्या मुलांना जरा अवास्तव महत्त्व मिळायचे ही वस्तुस्थिती आहे.

अरुणाचल बद्दल माहिती हवी आहे..

लेखक कबीरा यांनी सोमवार, 11/09/2017 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, यंदा दिवाळी मध्ये आई आणि दोन आज्या ह्यांना घेऊन एखाद्या धार्मिक स्थळी अथवा अशी एखादी जागा जिथे शांतपणे ध्यानधारणा करता येईल, राहायची व खायची सोय योग्य असेल, आणि जिथे शांतपणा अनुभवता येईल अशा ठिकाणी जायचा मानस आहे. साधारण ५-६ दिवस हाताशी आहेत. शक्यतो जिथे खूपच गर्दी असेल ती ठिकाणे टाळायची आहेत (अर्थात दिवाळी सुट्ट्यांमुळे हे कितपत शक्य आहे माहित नाही ). गोंदवल्याला आणि निंबाळ ला साधारण वर्षातून ४-५ वेळा जाणे होते त्यामुळे ह्यावेळेस नवीन ठिकाणी जायचा विचार आहे.

अमर फोटो स्टुडियो

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 11/09/2017 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ. मनस्विनी लता रवींद्र म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या लेखीका आणि नुकत्याच गाजलेल्या "ती सध्या काय करते" च्या पटकथा लेखिका.

नेत्र न कोई

लेखक दिपक लोखंडे यांनी सोमवार, 11/09/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
दुःख दर्शविण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई शोभून दिसते सुंदरी अन् सुगंध देते मोगरी फरक इतकाच सखे भार तुच्छ हा उरावरी टकटक आवाज करती चाले गुलाबी परी मधुर सुगंध तिचा वाटे नभाची सरी हे दृश्य पाहण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई
काव्यरस

१/१/२१०२, स.न.वि.वि.

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 11/09/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे.