नेहमीसारखाच साडेपाच वाजता उठलो. पाऊस पडत होता.काल दुपारी आलेला मेघराज वस्तीलाच राहीला वाटते! कल्पनेनेच शिरशीरी भरली,अंगावर काटा आला. इतक्या दिवसांची प्रतिक्षा संपली.
आल्याचा चहा बनवला.मुखमार्जन करून नातवंड शाळेसाठी तयार होण्याची वाट बघत बसलो.पालकांची घाई गडबड बघून हसू येत होते.ओले होतील म्हणून रेनकोट,थंडी वाजेल म्हणून हुडीवाले जॅकेट,शोधाशोध चालू होती. नातवंड तयार झाली एकदाची,बस मधे बसून निघून गेली.पाऊस पडतच होता. पळत पळत स्टिल्ट पार्किंग गाठले.इथेच वाॅक करावे आणी पावसाने उसंत दिली की टेकडीवर जावे असा विचार केला.
माझ्या लहानपणी, बरोबर सात जूनला पाऊस हजेरी लावायचा.आमची हजेरी शाळेत व पावसाची हजेरी एकच दिवस.खांद्यावर दप्तर आणी डोक्यावर बारदान,म्हणजे धान्याचे रिकामे पोते,हाच आमचा रेनकोट आणी हुडीवाले जॅकेट.
थोडावेळ,रेलिगेअर रेललो व पावसाची संततधार अनिमिष नेत्राने बघत राहीलो. तेव्हढ्यात दयाळ (Oriental Maggie) ची शिळ ऐकू आली.मस्तपैकी पावसात नाचत होता.गर्लफ्रेंडला साद देत असावा. त्याचा तो नाच बघत उभा राहीलो. कॅमेरा बरोबर नव्हता, अतिशय दु:ख झाले पण नेत्र आणी मन मात्र सुखावले.
चला,उभे राहून भागणार नाही,गरमा गरम कांदा पोहे Earn करायचे असतील तर थोडी कॅलोरीज Burn केलीच पाहीजेत.तूनळीवर "मन्ना", दांचे वरदक्षिणा चित्रपटातले आवडते गाणे लावले.अगदी सद्यपरिस्थितीत अनुरूप.
"घन घन माला नभी ग्रासल्या
कोसळती धारा".
ट्रॅकर चालू केला व ब्रिस्क वाॅक सुरू केले. चालता,चालता गाणे संपले.तूनळीने विचारले दुसरे गाणे लावू का? पण काही गाणी अशी असतात की ती एकदा ऐकून समाधान होतच नाही.असेच एक गाणे,"संथ वाहते कृष्णामाई". अशी अनेक पण विषयांतर नको. पुन्हा तेच गाणे लावले. दोनदा, तीनदा,चारदा.... सुप्त मनाला गदिमांची एक ओळ भुंग्यासारखी पोखरत होती.
"कृष्ण विरहिणी कोणी गवळण,
तीला अडविते कवाड अंगण".
किती सटिक शब्द चित्रण ते... अप्रतिम. मी विचार केला माझी पण तर या गवळणी सारखी अवस्था आहे की.मला ही पक्षीदर्शन करायला जायचय.पावसातल्या त्यांच्या क्रिडा बघायच्या आहेत.काही भिजली पाखरे आडोश्याला कुडकुडत बसली असतील. काही एकमेकाला बिलगून बसली असतील, कुठे मोर थुईथुई नाचत असेल....वरून गळणाऱ्या पागोळ्या,जंगलात वहाणारे गढूळ पाण्याचे, आडव्या येणाऱ्या दगड गोट्यांवरून उड्या मारत ,झुळझुळ वहाणारे ओघळ,प्रसंगी वळसा घालत पुढे जाताना बघायचे होते. कुठे कुठे साचलेल्या डबक्यात उगाचच उड्या मारून भिजायचे होते.
"पाऊस वाजतो दारी,कानात मिसळती सूर",
अशा परिस्थितीत लाखमोलाचा कॅमेरा व दुर्बीण कशी घेऊन जाणार. कारण "दुधापेक्षा दुधावरच्या सायी ला जपावे", म्हणतात.
कॅमेरा व दुर्बीण माझ्यासाठी दुधावरची साय च ना!!!!!
बाहेर जाण्याचा बेत लांबणीवर टाकला. व्यायाम सुरू ठेवला.
ती कृष्ण विरहिणी मनात रास रचत होती....
गदिमांच्या प्रेरणेने चार ओळी सुचल्या. त्यांच्या दोन ओळी उधार घेऊन चार ओळी जोडायचा प्रयत्न केला." कहां राजा भोज और कहां गंगू तेली",गोड मानून घ्याल ही अपेक्षा.
-बेतुक्या
कृष्ण विरहिणी मी ती गवळण,
मला अडविते कवाड अंगण.
वनी दाटले अवघे पक्षीगण,
कसे घेऊ मी त्यांचे दर्शन ?
धोधो बरसती श्रावणधारा,
वनी पसरल्या चिखल माळा (पाय वाटा)
झाडांवरती पंख मिटूनी त्या,
ओलेत्या,(पक्षीणी)बसल्या बिलगूनी.
ऐकू येतो केकारव, दूर वनातून,
अश्रू झरती या नयनातून.
सखी दुर्बीण केविलवाणी,
बसली आहे उदासवाणी.
नको करू ग आता घाई,
हिरव्या रानी मेघ सवाई.
घरातूनच त्यांचे गाणे ऐकू,
निसर्गाचे हे ही रूप न्याहाळू!
मिसळपाव
प्रतिक्रिया
रिअली
आमचा मिपाकर कवी मिका म्हणाला होता.
.
यू आर लेट ...यू फूल......
.
रिअली..
बक्ष दो....सुखी राहा...राहू द्या....
तुम्हीं कोण,
फालतू प्रतिसाद देऊन स्वताचा आणी दुसर्याचा वेळ घालवू नका.
आम्ही सुखी आहोत. तुम्ही कसे सुखी रहायच ते तुमचा प्रश्न आहे.
लिहीण्याचा आमचा अधिकार आहे आणी तो मी गाजवणारच.
मस्त
पहिला पाऊस, पहिला आनंद.
लेख आवडला
सध्या रोजच मोरदर्शन होत आहे टेकडीवर. पुण्यात आजुन फिरण्यासारख्या टेकड्या राहील्यात हे आपले भाग्यच म्हणायचे. कधी बिल्डर लॉबीची वक्र दृष्टी वळेल सांगता येत नाही.
वा छान स्पुटलेखन. मोराचे…
वा छान स्पुटलेखन. मोराचे चित्रही छान आहे. काहीच हेतू नसतांना फिरणे वेगळेच असते.
एखादा सवंगडी नाही का सोबतीला?
लिखाण, चित्र आणि कविता…
लिखाण, चित्र आणि कविता सगळेच छान. शेवटी गरमा गरम कांदा पोहे Earn झाले की नाही?
गरमागरम कांदापोहे जन्मसिद्ध..
In reply to लिखाण, चित्र आणि कविता… by शेखरमोघे
अधिकार, बरोबर एक कप गरम प्यारी चाय, आ हा हा......
ऑफकोर्स मिळाले ना.
छान मुक्तक!
छान मुक्तक!
मनोगत आवडले
मनोगत आवडले
झकास
झकास