✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?

M
mayu4u यांनी
Sat, 12/24/2016 - 22:45  ·  लेख
लेख
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26916 वाचन

💬 प्रतिसाद (147)

प्रतिक्रिया

वादातीत = निर्विवाद = beyond controversy...

mayu4u
Mon, 12/26/2016 - 22:37 नवीन
... असा अर्थ मी शिकलो आहे. जर हा अर्थ चुकीचा असेल तर कृपया संदर्भ द्या. लेखन आणि ज्ञान, दोन्ही अद्यतन करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit१२३

हाच अर्थ आहे त्याचा.

बोका-ए-आझम
Mon, 12/26/2016 - 23:03 नवीन
वादातीत - ज्याबद्दल कुठलेही वाद होऊ शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

डांगे सर

वरुण मोहिते
Mon, 12/26/2016 - 17:01 नवीन
गरज आहे कारण विदेशातील सोडा पण भारतातल्या बाहेरच्या राज्यातील लोकांना सुद्धा गड किल्ले पाहता येतात का .. तितका वेळ असतो का??तितकी परिवहन सुविधा उपलब्ध आहे का?? कसं समजणार लोकांना ? त्यामुळे मुठी वळतात वैग्रे असो पण लोकांना कळणार कसं ? ह्यात परकीय चलन पर्यटन विकास हा मुद्दा अजून सांगायचंय तूर्तास इतकंच. अवांतर -किती किल्ल्यांवर साफसफाई होते आणि स्मारक ह्याचा काही संबंध लागला नाही .
  • Log in or register to post comments

राजस्थानातल्या किल्ल्यांकडे

संदीप डांगे
Mon, 12/26/2016 - 17:35 नवीन
राजस्थानातल्या किल्ल्यांकडे राजवाड्यांकडे बघितलं तर वरचे चार प्रश्न पडत नाहीत. ३६०० कोटींमधे परिवहनसुविधा, मार्केटींग होऊ शकतं. नेमकं उद्दिष्ट स्पष्ट असेल तर मार्ग सुचतील. राजकारण हेच उद्दिष्ट असेल तर काय बोलायचे? परकिय चलन पर्यटन विकास हा मुद्दा वरच्या एका प्रतिसादात मी खोडलाय तो बघून घ्यावा. महाराष्ट्रात खास पाहायला म्हणून परकिय पर्यटक औरंगाबादला जातात. तिकडचे एकून उत्पन्न (परदेशी+देशीपर्यटक) तीनेक कोटी आहे वर्षाला. अवांतरः स्मारकविरोधक हे "३१ डिसेंबरला दारुवर पैसे उडवतात व अन्न वाया घालवतात" असा दावा करत आहेत काही समर्थक इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

राजस्थान मधील किल्ले

वरुण मोहिते
Mon, 12/26/2016 - 17:53 नवीन
राजवाडे बऱ्यापैकी मेंटेन होते . त्यात अर्धी अधिक हॉटेल्स झाली. ती परिस्तिथी महाराष्ट्रात लागू नाही आहे कारण इथे किल्ले दुर्गम भागात आहेत . जयपूर उदयपूर म्हणजे राजस्थान न्हवे तसेच किल्ला म्हणजे रायगड आणि प्रतापगड हे पण न्हवे . त्यामुळे गरज होती मुंबई मध्ये काही आंतरराष्ट्रीय दर्जाची . आता ते कधी होईल कसं होईल तो वेगळा मुद्दा आहे . अवांतर - कुठल्यातरी काळात औरंगाबाद च्या लेण्या पण खर्च करून बांधल्या ना ??का लोकापर्ण सोहळा होता तो पण ? आपला खर्चाचा मुद्दा बरोबर असेलही पण त्यामुळे पर्यटन किंवा विकासाला चालना देणं हे चुकीच नाही आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

इथले काही सदस्यांचे प्रतिसाद

सतिश गावडे
Mon, 12/26/2016 - 17:07 नवीन
इथले काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून ते सूर्याजी पिसाळचे वंशज असावेत असे वाटते. त्यांना कैद करुन त्यांना शिवकालीन शिक्षा करायला हवी. जय भवानी जय शिवाजी !!!
  • Log in or register to post comments

=)) =))

संदीप डांगे
Mon, 12/26/2016 - 17:33 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आहा लय भारी प्रतिसाद आहेत.

अमितदादा
Mon, 12/26/2016 - 17:53 नवीन
आहा लय भारी प्रतिसाद आहेत. स्मारकाचे समर्थन करणरे शिवाजींचे मावळे, साथीदार आणि विरोध करणारे सूर्याजी पिसाळ आणि जावळीचे मोरे. सगळे शिवकालीन लोक किंवा त्यांचे वशंज इथ सापडणार बहुतेक. अवांतर>>>शिवबाचा जीवा असल्याचा क्लेम कुणी करू नये तो मान देवेन्द्र फडणवीस यांचा =))
  • Log in or register to post comments

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची

पुंबा
Mon, 12/26/2016 - 18:10 नवीन
या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होईल हा आक्षेप किंवा, कोळी लोकांचा रोजगारावर गदा येईल असा आक्षेप हे योग्य आहेत की नाहीत?
लोकहो, शिवस्मारक विरोधकांचे सर्व आक्षेप दूर करावेत अशी अपेक्षा योग्य आहे का?
  • Log in or register to post comments

पैसे

arunjoshi123
Mon, 12/26/2016 - 19:02 नवीन
१. एखादा शासकीय प्रकल्प किंमत वाढली आहे इतक्याच कारणाने सोडून देता येत नाही. २. ३६०० कोटी म्हणजे किती? तर अंदाजे २०० -२५० किमी चार लेनच्या रस्ता बांधणीचे पैसे. यात जमिनीच्या अधिग्रहणाचे पैसे जोडले फक्त १५० किमी रोड बांधायचे पैसे. किंवा जे एन पी टी सारख्या बंदरात अजून एक टर्मिनल लागायचे पैसे. ३. ३६०० कोटी खर्च आहे, पण प्रकलप चालू झाल्यावर तो (सरकारसाठी तरी) नफा कमवणारा असेल. त्यामुळे याला वायफळ खर्च असे म्हणू नये. सुदुर काळात हा प्रकल्प फायनान्शियली पॉझिटीव रिटर्न देणारा असेल. ४. पर्यटन हा एक सिरियक्ष बिझनेस आहे. ५. मेट्रोच्या प्रकल्पातून निघणारी माती अन्यत्र टाकायला येणारा खर्च यातून वजा करायला हवा. ६. भाजप मराठी लोकांच्या शिवप्रेमाचे राजकारण करत असेल तर ते योग्य आहे. राजकारण हा मूळात एक चांगला अर्थ आसलेला शब्द आहे. ७. या प्रकल्पामधे सुधारणा करायला आजतरी बराच वाव असावा. ८. आपल्या देशाची लेजंड्स कोण म्हणले तर नको त्या लोकांची नावे अति झाली आहेत. योग्य त्या लोकांना (तशा प्रेरणांना) न्याय मिळणे आवश्यक आहे. ९.मनमोहन सिंगाच्या काळात १७६००० कोटीचे प्रकल्प ३-३ वर्शे रखडून होते. लक्षात घ्या त्यांच्या किमती देखिल अशाच वाढल्या आहेत. मात्र पैशाबाबत इतकी लोकजागॄती तेव्हा का दिसली नसेल. प्रकल्प रखडण्याचा वास्तविक परिणाम (किंमत) खूपच जास्त आहे. पण ११% व्याजाने (डब्ल्य ए सी सी असू द्द्या, अर्थव्यवस्थेवरचा परिणाम असू द्या) हेच पैसे १७,६००*३ कोटी इतके नाही का झाले? मोदींना पण हे पैसे वाचवावे असं फारसं सिरीयसली वाटत नाही. १०. ज्यांचा फोकस पैसे हा आहे त्यांनी फक्त उतरत्या क्रमाने देशाच्या पैस्यांच्या समस्यांबद्दलच बोलावे. राष्ट्रीय अस्मिता आणि पैसे चिल्लर खर्चाकरिता मिक्स करू नयेत.
  • Log in or register to post comments

अस्मिता बिस्मिता काही नाही...

चौकटराजा
Mon, 12/26/2016 - 19:45 नवीन
मी नुकताच राजस्थानाच्या ट्रीप ला जाऊन आलो. अनेक रिक्षावाल्यांशी बोललो. शिवाजी राजा यांच्याविषयी काया माहिती आहे याचे जवळ जवळ उत्तर " नाम सुना है " इतकेच होते. शिवाजी महारांजाचे चरित्र अनोखे आहे. श्रीकृष्णा सारखे ! पण महाराज पूर्ण भारतभर माहिती असलेली विभूति आहे का ? याचा अभ्यास व्हावा ! पूर्ण भारतभर माहिती असलेल्या कृष्णाच्या नावानेही त्याच्या कर्मभूमीत एखादा विमानतळ वा रेल्वे जंकशन आहे का ? याचा माझ्या दृष्टीने एकच अर्थ आहे. तो राजकीय ! आपले महाराष्ट्र देशाचे दुर्दैव असे की आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या थोरले बाजीराव यांच्या नावाने विमानतळ पुण्याला का उभारला जात नाही.. ? कारण.... मी न सांगणेच बरे ! तेंव्हा हा अस्मितेचा प्रश्नच नाही केवळ राजकीय आहे हा ! गणपतीत कितीही जनजीवन विस्कळीत झाले तरीही त्याला सांस्क्रुतिक उत्सवाची फोडणी देऊन राजकीय फायदा उठविला जातोच तसे शिवाजी राजांचे नावाने स्मारकांची माळ लावून फक्त कुणाची तरी समजूत घातली जात आहे. कारण कोर्टाचा वा राज्यघटनेचा स्मारकाला विरोध असण्याचे काहीच कारण दिसत नाही. जाता जाता - यातून काही पर्यटन साधणार नाही. याची तुलना स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याशी होऊच शकत नाही. कारण शिवाजी राजांच्या टोपात शिरून मुंबईचे दर्शन घेण्याची कल्पना भावूक शिवभक्त कधीही मान्य करणार नाहीत.
  • Log in or register to post comments

रिक्षावाल्यांशी बोलणे म्हणजे मत ठरवणे नाही

वरुण मोहिते
Mon, 12/26/2016 - 20:30 नवीन
भरत राजाचा नाव आहे का? चाणक्य सिकंदर यांची नावं आहेत का कुठे ? त्यामुळे कृष्णाला वैग्रे मध्ये आणू नका हि विनंती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मग

चौकटराजा
Mon, 12/26/2016 - 20:37 नवीन
मग तुमचे काय म्हणणे रामचंद्र गुहा याना विचारायला हवे होते...... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

असं मी बोलो नाही काका

वरुण मोहिते
Mon, 12/26/2016 - 20:56 नवीन
आपण कोणालाही विचारा..आपली मतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हे विरिफाय केलं नाही पण असं असू शकेल काय ?

संजय क्षीरसागर
Mon, 12/26/2016 - 20:20 नवीन
Many are cribbing about the cost of the Shivaji statue What they do not know is this statue is a masterstroke by our PM Modiwhich will pay for itself many times over. The statue is made of Amorphous Silicon, Cadmium Telluride & Copper Indium Gallium Selenide. This is exactly the same material used to make solar cells. Our government consulted with Dr. Immonen Kirsi, Senior Solar Scientist at VTT Research, Finland to develop technology to mould these materials into a statue form. This research took 2.5 years & on December 3rd, Dr. Kirsi sent a email to Modi Sir that it's now ready for mainstream use. The statue has capability to generate enough electricity to power all government offices in Mumbai. The statue also has Radial Uniform Projection And Ranging(RUPAR) technology to track boats in the Arabian Sea to prevent a repeat of the 2008 Mumbai attack where the terrorists entered India through the sea. RUPAR is the next generation of SONAR technology and has been developed at the Indian Institute of Science.
  • Log in or register to post comments

जर हे असे असेल ..

चौकटराजा
Mon, 12/26/2016 - 20:28 नवीन
तर संजय क्षीरसागर व मोदी दोघानाही मुजरा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मला नको !

संजय क्षीरसागर
Mon, 12/26/2016 - 20:29 नवीन
मी फक्त मनातून विषय काढण्याचं बघतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हा spoof आहे चौराकाका.

बोका-ए-आझम
Mon, 12/26/2016 - 20:38 नवीन
असं काहीही नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मग बोंबला!

संजय क्षीरसागर
Mon, 12/26/2016 - 20:40 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मग ..

चौकटराजा
Mon, 12/26/2016 - 20:45 नवीन
मग मुजरा पाठीमागे...... हा हा .. मागे एकदा एका लेखकाने पुस्तक परत घेतले होते त्या चालीवर .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लगेच घ्यावा !

संजय क्षीरसागर
Mon, 12/26/2016 - 21:30 नवीन
पटेलांचं अचाट स्मारक उभं करणार्‍याला एकदम इतकी कशी सुचली याचं आश्चर्य होतंच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

=))

पैसा
Mon, 12/26/2016 - 22:30 नवीन
=)) =)) =)) =)) =)) २००० च्या नोटांमधे चिप बसवल्यानंतर पुढचं लॉजिकल पाऊल आहे ते. =)) =)) =)) जरा थांबा! थोड्या दिवसांनी पाकिस्तानच्या अध्यक्षाच्या ताटाना चिप बसवणार आहेत. त्यांच्या आणि दाऊद इब्राहिमसाठी एकेक उपग्रह सोडणार आहेत. मग त्यानी बिर्याणी खाल्ली का रोटी ते आपल्या घरोघरी टीव्हीवर दिसणार आहे. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्मारकाचा विरोध करणाऱ्यांना, विशेषतः राष्ट्रवादीच्या

बोका-ए-आझम
Mon, 12/26/2016 - 20:37 नवीन
लोकांना हा एक शालजोडीतला खास दिलेला आहे. दादांचा इतिहास http://dhunt.in/1MZqE?ss=wsp via Dailyhunt
  • Log in or register to post comments

शिवस्मारकाचा उद्देश

सतिश गावडे
Mon, 12/26/2016 - 21:29 नवीन
शिवस्मारकाचा उद्देश महाराजांची थोरवी जगाला कळावी हा आहे मात्र काही लोक "आपल्या" सरकारचे समर्थन करण्याच्या नादात खुपच वाहवत गेले आहेत. लोकांच्या "सरकार अनाठायी खर्च करत आहे" या आक्षेपाला उत्तर देताना हे समर्थक या स्मारकामुळे कसा रोजगार मिळेल, सरकारी तिजोरीत कसा महसूल जमा होईल हे अगदी हिरीरीने लिहीत आहेत. जणू काही सरकार नवीन एमआयडीसी किंवा सेझ प्रकल्प आणत आहे रोजगार निर्मितीसाठी.
  • Log in or register to post comments

बरोबरे !

संजय क्षीरसागर
Mon, 12/26/2016 - 21:33 नवीन
कसला आलाय रोजगार ? नुसता पैसा फिरेल पण फायनल प्रॉडक्ट जर निव्वळ शोभेची वस्तू असेल तर तो अपव्ययंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सगासर, ते तसं हिरिरीने जे

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 12/26/2016 - 21:39 नवीन
सगासर, ते तसं हिरिरीने जे कोणी जिथे कुठे लिहीत असतील तिथे फटकन उत्तर देऊन टाकलं ना म्हणजे असे मुद्दे पुढे सरकत नाहीत. बाकी सरसकटीकरण नको. त्यातून कसला परतावा मिळेल, कसला रोजगार निर्माण होईल यावर यथायोग्य मुद्देसूद चर्चा झाली तर चांगलंच आहे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

थोरवी..

चौकटराजा
Mon, 12/26/2016 - 22:11 नवीन
सगा , तुम्ही दोन वर्षे अमेरिकेत होता. तुम्हाला जॉर्ज वॉशिग्टन किंवा अब्राहम लिन्कन यांचे पुतळे पाहून त्यांची थोरवी कळली काय ? मी रिओ ला गेलो नाही पण ख्रिस्ताची थोरवी मला त्याचा रिडीमरचा पुतळा माहीत नसताना ही दुसरीच्या क्रमिक पुस्तकातून समजली. शिवाजी राजांची थोरवी ब मो पुरंदरे नावाच्या जिवंत माणसाकडून कळली हो ! पुतळे स्फूर्ती देतात ही थेअरीच चुकीची आहे. त्यासाठी चरित्रच समजून घ्यावे लागते. कन्याकुमारीच्या सफरीमुळे विवेकानंद समजतील काय ... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमचं म्हणणं बरोबर आहे काका.

सतिश गावडे
Mon, 12/26/2016 - 23:42 नवीन
तुमचं म्हणणं बरोबर आहे काका. मी या स्मारकाच्या निर्मितीमागचे जे कारण माझ्या वाचनात आले त्याबद्दल म्हटलं. मात्र इथे तर त्यावरही वरताण प्रतिसाद वाचायला मिळाले. काय तर म्हणे रोजगार आणि महसूल निर्माण होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

नाही होणार का?

बोका-ए-आझम
Mon, 12/26/2016 - 23:49 नवीन
असं का वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

काहीशे लोकांसाठी रोजगार

खटपट्या
Tue, 12/27/2016 - 02:30 नवीन
काहीशे लोकांसाठी रोजगार नक्कीच निर्माण होइल. उदा. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी लागणारी बोट सेवा. त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग. बेटावर असणारे संग्रहालय व त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग. बेटावर खानपान सेवा असेल तर त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग. सफाइ कर्मचारी. अन्य तंत्रज्ञ. सुरक्षा रक्षक... कोणतेही नवीन पर्यटनस्थळ बनते तेव्हा रोजगारनिर्मिती होतेच. आता एवढी रोजगार निर्मिती करण्यासाठी एवढा खर्च अपेक्षीत आहे का वगैरे याचा उहापोह वर होतोच आहे. गडकील्ल्यांसाठी खर्च व्ह्यायलाच हवा त्यात काही दुमत नाही. पण नवीन पर्यटनस्थळे होउच नयेत हे बरोबर नाही. राहता राहीला प्रश्न करदात्यांचा पैसा यासाठी वापरायला हवा की नको हा. खाजगी संस्था यात परताव्याची हमी नसल्यामुळे उतरणे कठीण आहे. सरकार काही प्रॉफीट मेकींग ऑर्गनायझेशन नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वगैरे आहेत पण त्या विषयाला धरुन कोणतेच शोभेचे प्रोजेक्ट, कार्यक्रम व्हायला नकोत असे म्हणावे लागेल. दर महीन्याला शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात म्हणून मग आपण नेहमीच दुखवटा पाळायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तेच तर म्हणतोय.

बोका-ए-आझम
Tue, 12/27/2016 - 09:01 नवीन
काही नाही हो. याचं श्रेय यांच्या नावडत्या पक्षाला मिळेल म्हणून ही पोटदुखी आहे. पूर्वीचं सरकार यांना करदात्यांचे पैसे कसे खर्च केले याचा हिशोबच द्यायचं ना दरवर्षी. एवढं जर असेल तर हे स्मारक झाल्यावर याला विरोध करणाऱ्यांनी तिथे जाऊ नका. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

=))

सतिश गावडे
Tue, 12/27/2016 - 09:46 नवीन
आधीच्या पक्षांनी जनतेची घोर निराशा केली त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तेव्हा आता आधीच्या सरकारांचे दाखले देण्याला काय अर्थ आहे? त्यांचं सरकार करत नसे मग या सरकारकडून का अपेक्षा करता असं म्हणायचे आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

उलट म्हणतोय.

बोका-ए-आझम
Tue, 12/27/2016 - 10:52 नवीन
या सरकारला जाब विचारणा-यांनी पूर्वीच्या सरकारांनाही असाच जाब विचारला होता का? जर उत्तर हो असेल तर काही म्हणायचं नाही, पण जर नाही असेल तर तो राजकीय bias आहे. तसा bias दाखवायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण मी दाखवतो तेव्हा तो विचारांना पाठिंबा आणि बाकीचे दाखवतात तेव्हा भक्त, भाट वगैरे शेलकी विशेषणं वापरणे (हे व्यक्तिगत घेऊ नये) हे चुकीचं आहे. Biased आहात तर आहात असं सांगावं. उगाचच ₹३६०० कोटींमध्ये काय काय झालं असतं असं म्हणून जनतेचा खोटा कळवळा दाखवू नये, जसा इथे याला विरोध करणारे काही जण दाखवत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बोक्या भाऊ...

विशुमित
Tue, 12/27/2016 - 12:33 नवीन
अगदी बरोबर बोलत आहात. हा जो काय स्मारक विरोधाचा पोटशूळ उठला आहे तो कोणत्या पक्ष्याने त्याचे श्रेय घेतले यावरूनच आहे, हे स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे. पण या पक्षाचा आवेग सुद्धा उतावळ्या नवऱ्या प्रमाणे होता, हे प्रकर्षाने दिसून आले. त्यात १७ का १८ कोटींच्या स्वपक्षाच्या जाहिराती, विविध ठिकाणच्या मृदा आणि नद्यांचे पाणी आणण्याच्या संकल्पना ज्याने सुचवली त्यानेच अर्ध्या वाटेतून माघार जाणे, वाघाची झूल पांघरलेल्या शेळपटण्याचे मानापमानाची नाटकं, पक्षीय विरोधकांना जाणून बुजून भूमी पूजनापासून दूर ठेवणे, ज्या राज्याच्या पाठ्यपुस्तकातून महाराजांना लुटेरा म्हणून इतिहास शिकवलं गेला त्या गुजराती माणसाच्या हस्ते भूमिपूजन झाले अशी धारणा असणारे, भट ब्राह्माणाचा पक्ष अशी विरोधकांकडून हेटाळणी (पण या पक्षात मराठेच जास्त आहेत), स्मारक कसे पैसे कमावण्याचे साधन आहे याची भलामण करणाऱ्या व्यवहार पंडितांचे ज्ञानामृत, शेतकरी आत्महत्या आणि इतर समस्ये शी सांगड घालण्याचा प्रयत्न या आणि इतर बाबी मुळे खऱ्या खुऱ्या जाणत्या राज्याच्या या भव्य दिव्य शिव स्मारकाच्या भूमिपूजनाला गालबोट लागले आहे. ज्यांच्या मुळे या लोक राजाला "जाणता राजा" ही बिरुद मिरवायला मिळाले त्या रयतेला या महाराजांच्या जीवावर जगणाऱ्या बांडगुळांनी खिजगिणतीत ही ठेवले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लोकशाही आहे विशुमित भौ

बोका-ए-आझम
Tue, 12/27/2016 - 17:20 नवीन
काय करता? लोकशाही जरी सर्वात चांगली राज्यपद्धती असली तरी त्यात जेव्हा निवडणूक, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमं वगैरे प्रकार येतात तेव्हा असल्या गोष्टी होतात. Nothing is free. Definitely not democracy.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

रोजगार आणि महसूल निर्मिती हा

सतिश गावडे
Tue, 12/27/2016 - 09:33 नवीन
रोजगार आणि महसूल निर्मिती हा स्मारकाच्या निर्मितीचा उद्देश आहे का? स्मारकाच्या निर्मितीमागचा हेतू वेगळा आहे मात्र अवाढव्य खर्च जस्टीफाय करता येत नसल्याने हा रोजगार आणि महसूल निर्मितीचा मुद्दा रेटला जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हिंदू द्वेष्टे कुठले

टवाळ कार्टा
Tue, 12/27/2016 - 09:38 नवीन
हिंदू द्वेष्टे कुठले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वरचाच प्रतिसाद डकवतो..

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 12/27/2016 - 09:43 नवीन
वरचाच प्रतिसाद डकवतो.. सगासर, ते तसं हिरिरीने जे कोणी जिथे कुठे लिहीत असतील, जिथे कुठे मुद्दे रेटत असतील तिथे फटकन उत्तर देऊन टाकलं ना म्हणजे असे मुद्दे पुढे सरकत नाहीत. बाकी सरसकटीकरण नको. त्यातून कसला परतावा मिळेल, कसला रोजगार निर्माण होईल यावर यथायोग्य मुद्देसूद चर्चा झाली तर चांगलंच आहे ना! भाजप राजकारण करतंयच, आणि करत राहणार! जोपर्यंत या गोष्टींवर आधारित मतदान होणार तोपर्यंत अशा गोष्टी सर्व राजकीय पक्ष करणार, भाजप त्याला अपवाद असण्याचा काहीच कारण नाही. पण या स्मरकातून काय वाईट होईल आणि काय चांगले यावर चर्चा नको का व्हायला? हि गोष्ट भाजप करतंय म्हणून विरोध आणि विरोध जस्टीफाय करायला मुद्दे नाहीत म्हणून खर्चाचा मुद्दा पुढे, असे म्हणणे योग्य ठरेल काय? खर्च जस्टीफाय करायचा झाला तर सरकारचे बरेचसे प्रकल्प अशाच प्रकारात मोडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सगासर, ते तसं हिरिरीने जे

सतिश गावडे
Tue, 12/27/2016 - 10:28 नवीन
सगासर, ते तसं हिरिरीने जे कोणी जिथे कुठे लिहीत असतील, जिथे कुठे मुद्दे रेटत असतील तिथे फटकन उत्तर देऊन टाकलं ना म्हणजे असे मुद्दे पुढे सरकत नाहीत.
असे उत्तर देणे बहुतेक वेळा व्यक्तिगत होते हा माझा मिपावरील नऊ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे आपलं म्हणणे स्वतंत्रपणे मांड्णे योग्य वाटते मला.
बाकी सरसकटीकरण नको. त्यातून कसला परतावा मिळेल, कसला रोजगार निर्माण होईल यावर यथायोग्य मुद्देसूद चर्चा झाली तर चांगलंच आहे ना!
रोजगाराचा मुद्दा स्मारकनिर्मितीमागील कारण असेल असे वाटत नाही. तसा उल्लेख दुरदर्शन किंवा वृत्तपत्रांमधील जाहीरातींमध्येही नव्हता. निदान माझ्या तरी असे कुठे पाहण्यात अथवा वाचण्यात आलं नाही. काही लोक सरकाराच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी हा मुद्दा ओढून ताणून चर्चेत आणत आहेत.
भाजप राजकारण करतंयच, आणि करत राहणार! जोपर्यंत या गोष्टींवर आधारित मतदान होणार तोपर्यंत अशा गोष्टी सर्व राजकीय पक्ष करणार, भाजप त्याला अपवाद असण्याचा काहीच कारण नाही.
सहमत.
पण या स्मरकातून काय वाईट होईल आणि काय चांगले यावर चर्चा नको का व्हायला?
व्हायला हवीच मात्र जो मूळ हेतूच नाही तो समर्थन करण्यासाठी इथे ओढून ताणून तयार केला जातोय त्याचं काय?
हि गोष्ट भाजप करतंय म्हणून विरोध आणि विरोध जस्टीफाय करायला मुद्दे नाहीत म्हणून खर्चाचा मुद्दा पुढे, असे म्हणणे योग्य ठरेल काय? खर्च जस्टीफाय करायचा झाला तर सरकारचे बरेचसे प्रकल्प अशाच प्रकारात मोडतील.
विरोध "कोण करतंय" याला नसून "काय केलं जातंय" याला आहे. ज्यांना प्रतिकांमध्ये अस्मिता दिसते त्यांना हा निर्णय आवडेल मात्र ज्यांना प्रतिकांपेक्षा विचारांचे आचरण जास्त महत्वाचे वाटते त्यांना स्मारकावरील एव्हढा अवाढव्य खर्च अनाठायी वाटणं साहजिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

असे उत्तर देणे बहुतेक वेळा

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 12/27/2016 - 11:39 नवीन
असे उत्तर देणे बहुतेक वेळा व्यक्तिगत होते हा माझा मिपावरील नऊ वर्षांचा अनुभव आहे
हे पटले नाही. वैयक्तिक उत्तराबद्दल नाही तर मुद्द्याला उत्तराबद्दल (मुद्दा खोडून काढण्याबद्दल) म्हणालो मी.
रोजगाराचा मुद्दा स्मारकनिर्मितीमागील कारण असेल असे वाटत नाही.
नाहीच आहे तो मुद्दा! मला वाटते खर्च वगैरे मुद्दे काढून विरोध केल्यावर त्याला उत्तर म्हणून रोजगार, पर्यटनातून उत्पन्नाचा मुद्दा आला असावा. मुळात या योजनेच्या खर्चाच्या तरतुदीबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नसताना त्याच्यावर उहापोह करणे कितपत योग्य आहे? उद्या सरकारने सीएसआर मधून पैसा उभा केला तरी विरोध करणारे मागे हटणार नाहीत. काही लोक सरकाराच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी हा खर्चाचा मुद्दा ओढून ताणून चर्चेत आणत आहेत.
ज्यांना प्रतिकांमध्ये अस्मिता दिसते त्यांना हा निर्णय आवडेल मात्र ज्यांना प्रतिकांपेक्षा विचारांचे आचरण जास्त महत्वाचे वाटते त्यांना स्मारकावरील एव्हढा अवाढव्य खर्च अनाठायी वाटणं साहजिक आहे.
हे परत सरसकटीकरण! थोडक्यात या स्मारकाला समर्थन असणारे महाराजांच्या विचारांचे आचरण करत नाहीत आणि विरोधक ते नक्की करतात असे आहे तर! आणि हो, तो खर्च अनाठायी कसा आहे यावरच तर चर्चा व्हायला हवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

रोजगार आणि महसूल निर्मिती हा

खटपट्या
Wed, 12/28/2016 - 06:02 नवीन
रोजगार आणि महसूल निर्मिती हा निर्मितीचा उद्देश नाहीच. पण जे लोक्स फायदा तोट्याचा विषय काढून स्मारकाला विरोध करत आहेत त्यांचासाठी म्हणालो की काहीशे लोकांना रोजगार मिळेलच मिळेल. अवाढव्य खर्च जस्टीफाय करायचा म्ह्टला तर गेल्या सरकारने सींचनावर केलेला अवाढव्य खर्च कसा काय जस्टीफाय करता येइल? कीत्येक धरणे फक्त आणि फक्त काँट्रॅक्टर लोकांची (आणि पर्यायाने स्वतःची) सोय पहाण्यासाठी बांधली गेली. कोकणात माझ्या आजोळी बांधलेले अवाढव्य धरण कवडीमोलाचे ठरले आहे. कारण साठलेल्या पाण्याचे वितरण करण्याची योजनाच नाही. परीणामी धरण तुडंब भरुन वाहते आणि पाणी समुद्राला जाउन मिळते. थोड्याफार प्रमाणात वीहीरीतील पाण्याची पातळी वाढली. भूजल पातळीही वाढली असेल. पण त्यासाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवत्या आल्या असत्या. अवांतराबद्दल क्षमस्व पण सरकारचे डब्यात गेलेले प्रोजेक्ट शोधणे कठीण नाही. त्यामुळे मुळात फायदा ग्रुहीत न धरता सुरु केलेल्या या प्रोजेक्टला व्यवहारीतेच्या नावाखाली विरोध करणे उचीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ढॅण ढॅण ढॅण

कापूसकोन्ड्या
Mon, 12/26/2016 - 23:30 नवीन
शिवस्मारक करून ते पाहण्यासाठी भक्कम तिकिट आकारले तर एक नवीन पर्यटनस्थळ निर्माण होऊन भरपूर कमाई होऊ शकेल.
नंतर शिवस्मरकाला जाण्यासाठी खुप खर्च येतो म्हणून ओरडा होइल. सरकार सबसिडि चालू करेल. फेरी साठी लागणारे खर्च पण सरकार उचलेल. महानगरपालिका ला पैसे देइल. आणि राजकारण ढॅण ढॅण ढॅण चालू होइल. असो.
  • Log in or register to post comments

शिवस्मारक ही अस्मितेची गरज

बाळ सप्रे
Wed, 12/28/2016 - 11:49 नवीन
शिवस्मारक ही अस्मितेची गरज आहे. अस्मिता ही प्राथमिक गरज नव्हे (मॅसलॉच्या रचनेनुसार ३ की ४थ्या क्रमांकावरची). अस्मितेची गरज ही वेगवेगळ्या लोकांत वेगवेगळी असते. सरकारने शक्यतो प्राथमिक गरजांवर लक्ष केंद्रीत करावं जी संपूर्ण जनतेची गरज आहे. बाकी गोष्टी व्हाव्यात पण सरकारी कोषातून शक्यतो टाळाव्यात. जर खरच जनतेची अस्मिता प्रखर असेल तर पैसाही गोळा होइल त्यासाठी. त्यातून होणारे कामही जास्त चांगल्या प्रतीचे होइल.. त्याची निगराणीही तितकीच चांगली होउ शकेल. हौसेला मोल नसतं पण एकासाठी हौस ही दुसर्‍याला पैसा उधळणे वाटणारच. पण हे सरकारी पैशातून नसेल तर इतका नक्कीच आक्षेप नसेल.
  • Log in or register to post comments

शिवरायांच्या विचाराचाच प्रसार करायचा तर अनेक मार्ग

मारवा
गुरुवार, 12/29/2016 - 20:54 नवीन
शिवरायांच्या "विचार" व "प्रेरणा" किंवा इतिहासाच "भान" याच गोष्टी महत्व्याच्या असतील. म्हणजे या स्मारकामागे असा उद्देश असेल तर शिवरायांचा "विचार" प्रसार करण्याचे अनेक क्रिएटीव्ह मार्ग कमी या इतक्या खार्चिक प्रोजेक्ट पेक्षा कमी पैशात होऊ शकतात. किंवा इतके पैसे खर्चुन याहुन उत्तम विचार प्रसार करता येइल. उदा.असे करता येइल ( मी महापालिकेच्या उंदीर मारण्याच्याच विभागात काम करतो याची पुर्ण जाणीव ठेऊन ही सुचवणी ) १- सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरेंची ( वादग्रस्त भाग एडिट करुन बाकी सर्वमान्य ) आणि गजानन मेहेंदळें या सारख्या दिग्गजांची शिवाजीवरील पुस्तके शासनाने भरपुर सबसिडी लावुन. प्रति विकत घेऊन शाळा व महाविद्यालयीन तरुणांना मोफत वा कमी किमतीत उपलब्ध करुन द्यावीत. २-आवडेल तो किल्ला बघा. एस टी महामंडळाकडुन किल्ला दर्शन योजना राबविता येइल. ज्या विद्यार्थ्यांना वरील पुस्तके वाचुन कॅसेट ऐकुन शिवरायांचे गड किल्ले बघण्याची इच्छा होइल व अनेक ग्रामीण तरुणांना खर्च परवडणारा नसेल किंवा अशा विद्यार्थ्यांना. किल्ला पास योजना राबवावी. वेगवेगळे पॅकेज बनवावे. दक्षिणेतले किल्ली काही मिळुन एक संच असा. व कुठलाही संच कुणालाही कधीही घेता येइल असा ठेवावा. त्यात किल्यावर रजीस्टर एंट्री घेऊन परतीचे तिकीट वगैरे बाबी दुरुपयोग टाळण्यास इ. करता येतील. ३- अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट सर्व साडेतीनशे किल्ल्यांसाठी शिवाय परमनंट स्वच्छता दुतांची नियुक्ती.इ, करुन किल्ले संवर्धन इ. करता येइल. प्रत्येक ठिकाणी उच्च प्रशिक्षीत गाईड ची नेमणुक करावी जो आलेल्या प्रवाश्यांना अचुक इतिहास सांगेल माहीती देईल. ४- काही शिबीर डिझाइन करता येतील बेसीक इंटरमिजीएट अ‍ॅडव्हान्स अशा श्रेणी ठेऊन ज्याचे स्ट्डी मटेरीयल व्हीजीट प्रोग्राम तज्ञांकडुन बनवुन घेता येइल. व तो सर्वत्र उपलब्ध करुन देता येइल. ५- आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्य जागतिक इतिहासाच्या प्रवाहात जिथे जिथे संशोधन होते तिथे शिवाजी त्या काळातील सर्वच संबंधित बाबींवरील संशोधनाला सरकारकडुन प्रोत्साहन देता येइल. ६- पुरंदरे सारख्या व्यक्तीकडुन आयडीयाज घ्याव्यात जसे त्यांची एक आयडीया होती डिस्नेलॅन्ड च्या धर्तीवर शिवसृष्टी इ. म्हणजे सांगायचे असे आहे की एकदम इतका मोठा खार्चिक प्रोजेक्ट घेण्यापेक्षा टप्प्या टप्प्यात ग्राउंडलेव्हल ला काम करत शिवरायांच्या "विचारा" चा प्रसार प्रचार करता येइल. प्रेरणा अधिक सकारात्मकतेने संक्रमित करता येइल. अर्थात या प्रकारात भडक भव्यपणाचा सोस नसेल यात राजकीय पक्षाला इन्स्टंट प्रसिद्धी मिळणार नाही. म्हणजे अजुन विचार करता येइल अनेक सकारात्मक पर्याय शोधता येतील. आणि एक जनसहभागाने जर काही झाल तर तेच अधिक उत्तम आणि त्याने होत नसेल तर मग एक अर्थ जनतेची इच्छाही नसेल सहमतीही नसेल कदाचित.
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 12/29/2016 - 22:59 नवीन
थे दिल्लीतली एकाआड डॉन घाटांची जमीन विकून पैका इन का? कायप्पा म्हणे 9 हजार करोड ची जमीन हाय थे?
  • Log in or register to post comments

ठाकरेच्या स्मारकाला विरोध

Ram ram
Sun, 01/01/2017 - 19:29 नवीन
ठाकरेच्या स्मारकाला विरोध केलाव का कोणी
  • Log in or register to post comments

त्यासाठी सुद्धा ३६०० कोटी

टवाळ कार्टा
Sun, 01/01/2017 - 22:25 नवीन
त्यासाठी सुद्धा ३६०० कोटी खर्च करणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा