✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 08/26/2016 - 22:21  ·  लेख
लेख
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते. एवढ्या वर्षाअंनंतर ही जाहिराती बघून उलगडा झाला: . "राजेरजवाडे, सरदारदरकदार या लोकात पुष्कळच खप" असलेल्या 'बादशाही याकुती' ची ही जाहिरात वाचा: . "मेंदूचे काम विशेष पडणारे" वकील, कारकून, बॅरिस्टरवगैरेंना उत्तम फायदा देणाऱ्या 'व्हिगोराईन' ची जाहिरात: . "डॉक्टर्स, ग्राजुएट्स, जजीस, मॅजिस्ट्रेट्स, आफिसर्स वगैरेंनी गौरवलेले 'रंजन' मलम मागवण्याबरोबरच अर्ध्या आण्याचे तिकीट पाठवून 'विशेष खुलाश्याचे हँडबिल' देखील मागवण्यास विसरू नका: . "पुष्कळ नामांकित डॉक्टरांनी व सद्गृहस्थानीं सर्वोत्कृष्ट ठरविलेले, दु:खग्रस्तांचा एकच इलाज" असलेले स्वदेशी 'अमृतांजन: . गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः . परंतु अश्या प्रकारच्या "वर्तमानपत्रातील तिखट मीठ लावून फुगवून लिहिलेल्या मोठमोठया जाहिराती" वाचून औषधे मागवून पैश्यापारी पैसा आणि शरीरप्रकृतीही बिघडवून घेणाऱ्या लोकांना डॉ. ग.पां. काळोखे, ए. ए. एम. एस.यांची ही जाहिरात दिलासा देत असेल: . बाह्य भपक्यावर न भुलता "पक्क्या बुंदीपासून यांत्रिक शक्तीने भाजून हस्तस्पर्शाशिवाय दळून ताजी डब्यात भरलेली 'अस्सल काफी' घेण्याचा आग्रह करणारी ही जाहिरात: . "एकदाच लाविले असता जणुकाय ताज्या फुलांचा घमघमाट सुटला आहे" असा भास करवून देणारे 'दिल्ली दरबार हेयर ऑईल : . नाशिकचे सखाराम वामन जोशी 'खलीपाच्या अद्भुत गोष्टी' आणि 'पोलादि अडकित्ते' एकत्रच जाहिरातवतात : .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
साहित्यिक
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
अर्थकारण
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
संदर्भ
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
38327 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

मस्त धागा...

मुक्त विहारि
Sat, 08/27/2016 - 09:03 नवीन
वाखूसा
  • Log in or register to post comments

मस्तच.वाचून मजा आली.

विवेकपटाईत
Sat, 08/27/2016 - 09:16 नवीन
मस्तच.वाचून मजा आली.
  • Log in or register to post comments

जुन्या जहिरती

ओम शतानन्द
Sat, 08/27/2016 - 09:24 नवीन
पन्डित रन्जन मलम अजुनही मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळते , खरच गुणकारी मलम आहे
  • Log in or register to post comments

मनोरंजन ची अजून एक खास गोष्ट आहे.

बोका-ए-आझम
Sat, 08/27/2016 - 09:26 नवीन
दिवाळी अंक ही परंपरा त्यांनीच सुरु केली आणि मला वाटतं, खास स्त्री लेखिकांसाठी वेगळा विभाग त्यांनी ठेवला होता.
  • Log in or register to post comments

भारी.

प्रचेतस
Sat, 08/27/2016 - 09:27 नवीन
भारी. बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची. प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.
  • Log in or register to post comments

गहिवरून आले...

चौकटराजा
Sat, 08/27/2016 - 09:58 नवीन
साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.
  • Log in or register to post comments

कुंकू

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 15:47 नवीन
गुजरा हुवा जमान्यातील एक अतिप्रसिद्ध प्रसंग Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

झारापकर शिलाई मशीन

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 18:52 नवीन
पूर्वी मुंबईत सर्वत्र 'झारापकर शिलाई मशीन' आणि टेलरिंग कोर्सच्या मोठमोठ्या जाहिराती दिसायच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

भारी...

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/27/2016 - 10:04 नवीन
फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते. अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता? एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय. मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे.

मुक्त विहारि
Sat, 08/27/2016 - 10:57 नवीन
म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असाच त्याचा अर्थ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मस्त

नंदन
Sat, 08/27/2016 - 12:58 नवीन
एक नंबर!
  • Log in or register to post comments

झकास लेख हो चित्रगुप्तजी

मारवा
Sat, 08/27/2016 - 13:10 नवीन
इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती " अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?" खुरदरे पदार्थ.... आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली असो.
  • Log in or register to post comments

मजेदार!

एस
Sat, 08/27/2016 - 13:49 नवीन
मजेदार!
  • Log in or register to post comments

दिलीपकुमारचं लोणचं!!

तुषार काळभोर
Sat, 08/27/2016 - 15:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रभात स्टुडिओचा वाद्यवृंद

चित्रगुप्त
Sat, 08/27/2016 - 15:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सार्सा परिला

श्रीनिवास टिळक
Sat, 08/27/2016 - 20:03 नवीन
१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.
  • Log in or register to post comments

सार्सा परीला

रविकिरण फडके
Sat, 08/27/2016 - 21:05 नवीन
सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो. Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)
  • Log in or register to post comments

गौहर जान

चित्रगुप्त
Fri, 10/19/2018 - 21:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा