✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

प
प्रास यांनी
Sun, 07/15/2012 - 22:42  ·  लेख
लेख
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे. सदर सम्मेलनासाठी
दाराज् धाबा, पश्चिम दृतगती मार्ग, घोडबंदर रोड, मिरा रोड (पूर्व)
हे स्थान निश्चित करण्यात आलेले असून दिनांक २२ जुलै २०१२ रोजी सांध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमुहूर्तावर इथे येण्याचे आमंत्रण या अनुषंगाने सर्व मिसळपाव सदस्यांना देत आहोत. या मिषाने जुन्या-नव्या मिपाकरांमध्ये मैत्रीचे नवे धागे गुंफणे शक्य होईल आणि त्याचप्रमाणे आंतरजालिय व्यक्तिमत्त्वांच्या भेटीद्वारे आपला अभ्यास वाढवणेही शक्य होईल अशी आशा आहे. कार्य सिद्धीस नेण्यास सर्व मिसळप्रेमी समर्थ आहेतच तरी उपरोल्लेखित कार्यक्रमामध्ये अधिकाधिक मिपाकरांनी हजेरी लावावी अशी विनंती आहे. दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे. मिपाकर आगत्ये येऊन 'मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२' यशस्वी करतील अशी खात्री व्यक्त करतो. प्रतिसादांच्या माध्यमातून मिपाकरांनी आपली उपस्थिती कळवल्यास मंडळ आभारी राहील. तेव्हा आता २२ तारखेला भेटूच!
जय हिन्द । जय महाराष्ट्र । जय मिसळपाव ।
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
संस्कृती
जीवनमान
राजकारण
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
बातमी
शिफारस
माहिती
वाद
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
15544 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

दाराज ढाब्यात शिक्रण ? म्हणजे

किसन शिंदे
Wed, 07/18/2012 - 12:34 नवीन
दाराज ढाब्यात शिक्रण ? म्हणजे मालवण किनारा मधे पास्ता? हायवे गोमांतकमधे साबुदाणा खिचडी ? तांबे आरोग्यभुवनात मटणपॅटिस? पिझ्झा हट मधे मिसळ? के एफ सी मधे थालीपीठ? स्वाद थाळी मधे सुक्की वजडी?
=)) =)) =)) हाहाहा.. गविपण आजकाल जाम टांग खेचतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हां... मटार उसळी ऐवजी आलू मटर

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 07/18/2012 - 12:40 नवीन
हां... मटार उसळी ऐवजी आलू मटर मिळेल हो..
आणि शिक्रणी ऐवजी फ्रुट सॅलड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

किंवा शिक्रणीलाच "मिल्क बनाना

बॅटमॅन
Wed, 07/18/2012 - 12:55 नवीन
किंवा शिक्रणीलाच "मिल्क बनाना सॅलड" म्हटलं तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

वा वा

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 07/19/2012 - 09:59 नवीन
मालवण किनारा हायवे गोमांतक आरोग्यभुवन पिझ्झा हट के एफ सी स्वाद थाळी
वा वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आग्रहाचे निमंत्रण वाचून डो.क.ओ.

कापूसकोन्ड्या
गुरुवार, 07/19/2012 - 09:54 नवीन
आग्रहाचे निमंत्रण वाचून डो.क.ओ. प्रत्येकाची इनो घ्यायची पध्दत वेगळी असते. आम्हाला येता येत नाही ना मग म्हणता येते "छ्या! तिथे साधी ---- नाही? कट्ट्याला शुभेच्छा. करा लेको मजा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

तो अंदाज आला होता. पण कट्टा

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 07/20/2012 - 12:05 नवीन
तो अंदाज आला होता. पण कट्टा मुंबईत आहे. शिकरण आणि मटार उसळीवर दुसऱ्या शहराचा प्रताधिकार आहे ना ? आता दुसरा पदार्थ शोधा पाहू !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

येण्याचा प्रयत्न केला जाईल

प्रभो
Wed, 07/18/2012 - 13:29 नवीन
येण्याचा प्रयत्न केला जाईल :)
  • Log in or register to post comments

येण्याचा प्रयत्न केला जाईल

राजघराणं
Wed, 07/18/2012 - 18:01 नवीन
बायका पोराना घेउन आल तर चालत का ? मंजी सुट्टीच्या दिवशी घरातून कलटी मारलेली खपवून घेतळा जात नाही आमच्याकडे.
  • Log in or register to post comments

आनंदच आहे सहकुटुंब आलात तर..

गवि
Wed, 07/18/2012 - 18:04 नवीन
आनंदच आहे सहकुटुंब आलात तर.. मिसळपाव मेंबर्स म्हणजे एक्स्टेंडेड कुटुंबच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजघराणं

गवि तुम्ही कसं येणार आहात ते

५० फक्त
Wed, 07/18/2012 - 18:07 नवीन
गवि तुम्ही कसं येणार आहात ते बोला,म्हणजे मी पण ठरवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कोण कोण सहकुटुंब येणार आहे????

राजघराणं
Wed, 07/18/2012 - 19:16 नवीन
नोंद केल्यास बरे होइल
  • Log in or register to post comments

मज्जा करा आमच्या कडून

निनाद मुक्काम …
Wed, 07/18/2012 - 20:01 नवीन
मज्जा करा आमच्या कडून संमेलनाला शुभेच्छा ,
  • Log in or register to post comments

..

गवि
Fri, 07/20/2012 - 09:23 नवीन
जनहितार्थ धागा वर आणत आहे. श्री. रा. रा. पै. डॉ. प्रास यांनी आजपर्यंतची (प्रवर्तक वगळता) अपेक्षित यादी प्रकाशित करावी अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments

गविंनी केलेल्या विनंतीचा

प्रास
Fri, 07/20/2012 - 10:07 नवीन
गविंनी केलेल्या विनंतीचा अव्हेर न करता आणि त्यांनी अस्मादिकांच्या नावाआधी लावलेल्या सर्व पदव्यांकडे दुर्लक्ष करून सम्मेलनासाठी उपस्थिती कळवलेल्या (आणि अपेक्षित अशा) सदस्यांची यादी, प्रवर्तक वगळता, खालील प्रमाणे - १. रामदास काका २. सर्वसाक्षी ३. किसन शिंदे ४. गणपा ५. देविदस्खोत ६. प्रभो ७. मुवि ८. ५० फक्त ९. गणामास्तर १०. मोदक ११. राजघराणं १२. मी कस्तुरी १३. पंकज १४. अमोल खरे १५. पुश्कर १६, सुहास झेले १७. विजुभाऊ १८. जयपाल इच्छुकांनी आपापली नावं या यादीत जोडावी ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अजुन तीन..

किसन शिंदे
Fri, 07/20/2012 - 10:10 नवीन
१९.अमोघ शिंगोर्णीकर २०.टवाळ कार्टा २१. गुळाचा गणपती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

९. गणामास्तर येवू शकणार नाही....

मोदक
Fri, 07/20/2012 - 10:34 नवीन
९. गणामास्तर येवू शकणार नाही.... आणि बॅटमॅन भाव खात आहे. ब्याम्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मी प्रयत्न करतो.

नीलकांत
Fri, 07/20/2012 - 10:40 नवीन
नमस्कार, या विकांताला मुंबईत आहे. त्यामुळे येण्याचा नक्की प्रयत्न करतो. - नीलकांत
  • Log in or register to post comments

अरे व्वा सही... भेटूयात मग

सुहास झेले
Fri, 07/20/2012 - 10:49 नवीन
अरे व्वा सही... भेटूयात मग :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

नुसता जाऊ नकोस नीलकांत, एक

रेवती
Sun, 07/22/2012 - 06:16 नवीन
नुसता जाऊ नकोस नीलकांत, एक छडी घेऊन जा. धपाटे घालून तुझे हात दुखू नयेत म्हणून. नावे व्य. नीतून कळवीन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

एक अति महत्त्वाची सूचना :- जे

मितभाषी
Fri, 07/20/2012 - 10:57 नवीन
एक अति महत्त्वाची सूचना :- जे या कट्ट्याला येण्याची शक्यता आहे त्यांनीच या धाग्यावर वरील पैकी कुठल्याही बाबतीत मत/सूचना व्यक्त करावी ही नम्र विनंती. तात्विक चर्चेसाठी सरळ दुसरा धागा काढावा.
आम्हाला यायला जमणार नाही. शुभेच्छा देवू शकतो का?
  • Log in or register to post comments

जरूर देऊ शकता की. कुठलीही

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 07/20/2012 - 11:58 नवीन
जरूर देऊ शकता की. कुठलीही चांगली गोष्ट करायला अजिबात आडकाठी नाही. त्याचे काय आहे ना, कधी कधी काही समाजकंटक सदृश घटक अनावश्यक वाद निर्माण करू शकतात, मग उगाच कटकट होते. ते टाळावे म्हणून अत्यंत नाईलाजाने हे उद्धट वाक्य लिहावे लागले. कुणाचे मन दुखावले असल्यास दिलगीर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

स्पष्टीकरण दिल्याबद्दल

स्पा
Fri, 07/20/2012 - 12:11 नवीन
स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

स्पाकाकांनी केवळ आंतरजालिय

प्रास
Fri, 07/20/2012 - 14:02 नवीन
स्पाकाकांनी केवळ आंतरजालिय धन्यवादावर बोळवण करू नये. विमेकाकांची बोळवण प्रत्यक्ष धन्यवाद देऊन करावी ही विनंती. __________________________ कोण म्हणतो टॅब्ब दिला.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्रकाटाआ

मोदक
Fri, 07/20/2012 - 14:15 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>>समाजकंटक सदृश घटक शब्द

प्यारे१
Fri, 07/20/2012 - 12:47 नवीन
>>>समाजकंटक सदृश घटक शब्द प्रयोग आवडण्यात आला आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अरे कुणीतरी त्या

विजुभाऊ
Sat, 07/21/2012 - 09:34 नवीन
अरे कुणीतरी त्या प्रभुमास्तराना किडनॅप ( मास्तर आणि किड कसे ते विचारू नये) करून आणा रे. कुठं भटकत असतात कोण जाणे
  • Log in or register to post comments

पुन्हा सर्वांना आग्रहाचं

प्रास
Sat, 07/21/2012 - 20:47 नवीन
पुन्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी धागा वर आणत आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर सम्मेलनास भेट देऊन आपली घोषणा सार्थक करावी - मिसळपाव धर्म वाढवावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥
  • Log in or register to post comments

अरेरे, मुंबईत असून सुद्धा मला

पिंगू
Sat, 07/21/2012 - 22:48 नवीन
अरेरे, मुंबईत असून सुद्धा मला कट्टयाला येणे जमणार नाही आहे... :( बाकी कट्ट्याला शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा! गवि,

सोत्रि
Sat, 07/21/2012 - 23:11 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा! गवि, लाइव्ह अपडेट्ससाठी ऑनलाईन असणार आहे. नक्की अपडेट्स टाका! - (चेन्नैस्थित असल्याने हे सम्मेलन मिस करणारा) सोकाजी :(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा