✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 04/19/2012 - 12:56  ·  लेख
लेख
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले. तर आजच्या ह्या लेखात आपण डुप्लिकेट आयडी कसे काढावेत व कसे सांभाळावेत ह्याचे मार्गदर्शन घेणार आहोत. मला विचाराल तर खरे म्हणजे डुप्लिकेट आयडी कधी काढूच नयेत. काय आहे, की ह्या आयडीने कुणाची खेचल्यावरती, रेवडी उडवल्यावरती, चार शब्द सुनावल्यावरती देखील मनापासून समाधान असे मिळत नाही. आणि मिळाले तरी दर्शवता येत नाही. असो.. तर आता एकदा डुप्लिकेट आयडी काढायचे ठरवले की मग दुसरा कुठलाही विचार मनात आणू नये. 'जगातील प्रत्येक माणसाच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार हा येतोच !' असे कोणा थोर तत्त्वज्ञानी माणसाने सांगितले आहेत. त्याच प्रमाणे 'आंतरजालावरील प्रत्येक सदस्याच्या मनात एकदा तरी डुप्लिकेट आयडी काढण्याचा विचार हा येतोच!' हे सत्य देखील जाणावे. मुळात अनेक संस्थळांवरती संस्थळ चालकांचे आणि संपादकांचे देखील खोर्‍याने डुप्लिकेट आयडी असतात, त्यामुळे आपल्या डुप्लिकेट आयडी काढण्यात काही अपराधी भावना अथवा लाज बिलकुल बाळगू नये. एकदा का विचार पक्का झाला की ताबडतोब कामाला लागावे. डुप्लिकेट आयडी काढण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. :- १) शक्यतो पुरुषांनी बाईचे किंवा बाईने पुरुषाचे नाव डुप्लिकेट आयडी म्हणून घेऊ नये. पाककृती आणि काथ्याकूट ह्या धाग्यावरती तुम्ही सरळसरळ उघडे पडता. २) डुप्लिकेट आयडी साठी शक्यतो नाव आणि आडनाव असे निवडावे. शक्यतो आडनावात 'कर' असल्यास, तुमच्या आयडी लगेच पास होतो आणि संशय देखील घेतला जाण्याचे चान्स कमी होतात. ३) स्त्रियांनी बाईचे आणि पुरुषाने नाव एकत्र करून आयडी घ्यावा. ताबडतोब काम झालेच समजा. ४) नवीन आलेल्या चित्रपटाचे, त्यातल्या हिरोचे अथवा हिरवणीचे नाव चुकून देखील घेऊ नका. एकतर तो आयडी अ‍ॅप्रुव्ह होणे कठीण, आणि त्यातून झालाच तरी इतर सदस्य तुमच्याकडे थरकी, बीन अकलेचा, झोपडपट्टी इ. इ. नजरेनेच बघतात. ५) आयडी घेताना इंडिया टाईम्स, रेडीफ, मेल डॉट कॉम असल्या आता कोणी वापरत नसलेल्या ईमेल प्रोव्हाइडर्सकडे ईमेल आयडी उघडून मग तो ईमेल नव्या खात्याच्या नोंदणी साठी वापरावा. ह्यामुळे तुम्ही इंटरनेटवरती बरेच आधी पासून वावरत असल्याचा उगाच भास निर्माण होतो. आता एकदा का आयडी अ‍ॅप्रुव्ह झाला की तो वापरणे, टिकवणे आणि त्याला विश्वासपात्र बनवणे हे सगळ्यात जिकरीचे काम. त्यासाठी मेहनत आणि संयम सगळ्यात महत्त्वाचे. ह्या कामात काही गोष्टी आवर्जून पाळल्या जाणे आवश्यक आहे. :- १) डुप्लिकेट आयडी अ‍ॅप्रुव्ह झाल्या झाल्या संस्थळावरती धाव घेऊ नये. २) शक्यतो पहिले चार / पाच दिवस निव्वळ वाचनमात्र राहावे. 'कधी एकदा माझ्या विरोधकांना इंगा दाखवतो' हा विचार अशा काळात मनात सतत उसळ्या मारत असतो, अशा वेळी संयम अतिशय आवश्यक. ३) वाचनमात्र असलेल्या चार / पाच दिवसात आपली खरडवही जमेल तेवढी सजवावी. खरडवहीत नाव-गाव-फळ-फुल सगळ्याची सविस्तर माहिती द्यावी. लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्‍याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्‍हाड मारून घ्याल. ४) खरडवहीच्या स्वागत मजकुरात, नवीन असताना शक्यतो जि. ए. , व. पु. ह्यांच्या कथा / कादंबरी मधील एखादा उतारा, अथवा कोंकणातल्या खेड्याचे चित्र किंवा ग्रेस, सुरेश भट इत्यादींचे पद्य लावावे. ५) ह्या काळात विनाकारण स्त्री सदस्यांच्या खरडवहीत जाऊन 'हाय हॅलो' करण्याची, त्यांच्या धाग्यावरती 'भावमारू' प्रतिसाद देण्याची, आपल्याला कोणी ओळखले आहे का ह्याची चाचपणी करण्याची जाम सुरसुरी येते. पुन्हा एकदा संयम धरावा. नाही धरवला तर सरळ लॉग आऊट करावे, मात्र तोल ढळू देऊ नये. ६) नवे नवे डुप्लिकेट खाते घेऊन दिवस दिवस जालावरती पडीक राहू नये. कुठल्याच नवीन सदस्याला एका दिवसात इतकी गोडी लागत नाही ह्याचे भान ठेवावे. ७) विनाकारण डुप्लिकेट आयडीसाठी भारंभार प्रॉक्सी, शेल वापरणे असले चाळे करू नयेत. ८) स्त्री सदस्यांनी आपले डुप्लिकेट आयडी घेऊन आल्या आल्या काथ्याकूट, ललित असल्या धाग्यांवरती भरार्‍या मारू नयेत. आणि पुरुष सदस्यांनी आपले डुप्लिकेट स्त्री आयडी घेऊन कविता, पाकृ अशा ठिकाणी तोंड मारू नये. ९) डुप्लिकेट आयडी पुरुष नावाने असल्यास शक्यतो एखाद्या व्यक्तिचित्रावरती, माहितीच्या धाग्यावरती किंवा कलादालनात प्रतिक्रिया देऊन लिखाणाला सुरुवात करावी. १०) डुप्लिकेट आयडी स्त्री नावाने असल्यास शक्यतो कविता, पाकृ अथवा कलादालन अशी सुरुवात करावी. ११) आपले राहण्याचे ठिकाण हे उगाच परदेशात असल्याचे भासवू नये. थोडे जरी अज्ञान उघडे पडले तरी निवासी आणि अनिवासी दोघेही तुमच्या अब्रूची लक्तरे काढतील. तेव्हा शक्यतो आपले राहण्याचे ठिकाण चंद्रपूर, उस्मानाबाद, गडचिरोली, आंबेजोगाई गेला बाजार बेळगाव, हल्याळ, छत्तिसगढ असे सांगावे. इकडे शक्यतो कोणी अंतराळवीर फिरकण्याचे चान्सेस नसतात. आणि फिरकलाच तरी ताबडतोब आपण सध्या ट्रेनिंगसाठी मुंबई, दिल्ली किंवा बेंगलारूला आलो आहोत असे ठोकून द्यावे. १२) पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे. वाद विवाद घालताना 'पुण्या मुंबईच्या लोकांना त्यांनाच सगळे काय ते कळते असे का वाटते कोणास ठाऊक' अशी प्रतिक्रिया देणे तुम्हाला मस्ट आहे. १३) अधे मध्ये लोड शेडिंग, खतांचा काळाबाजार, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्याविषयी देखील इकडे तिकडे चर्चा करत फिरण्यास विसरू नये. आयडी स्त्री नामाने असल्यास 'पाडस' , 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या', 'राणी वर्मा' असले विषय घेऊन खरडवह्यांत बोंबलत हिंडावे. १४) आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत ते लपवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचे :- १५) डुप्लिकेट आयडी मिळाल्यापासून वरील सर्व पायर्‍या पूर्ण होईतो चुकून देखील विरोधकाच्या धाग्यावरती गरळ ओकण्याचा, स्वतःची जिलबी पाडण्याचा आणि कोणाच्याही खरडवहीत पांढर्‍याचे काळे करण्याचा अट्टहास करू नये. १६) अगदीच न राहवल्यास 'मराठी लिहिण्यास मदत' ह्या धाग्यावरती नाक खुपसावे. १७) कितीही शहाणपणा केला, अक्कल लावली तरी कुठल्याही संस्थळाच सर्व्हर अ‍ॅडमीन हा प्रत्येक डुप्लिकेट आयडीचा 'चित्रगुप्त' असतो हे कधीही विसरू नये. अशा सर्व पायर्‍या यशस्वी पार पाडल्यात की तुमच्यावरती ५०% सच्चेपणाचा शिक्का बसलाच म्हणून समजा. त्यानंतरचे ५०% अधिक सावधपणे पार पाडणे तुमच्या हातात. आशा करतो की ह्या मार्गदर्शनाने तुम्हाला बहुमोल अशी मदत मिळेल. मिपावरील इतर जाणकार देखील ह्या मार्गदर्शनात भर घालतीलच. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
धोरण
गुंतवणूक
वावर
विनोद
इतिहास
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
विज्ञान
क्रीडा
राजकारण
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
मत
शिफारस
सल्ला
मदत
माहिती
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
25690 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

तुफान उपयोगी

धनंजय
गुरुवार, 04/19/2012 - 23:14 नवीन
तुफान उपयोगी. पण इतकी यवढी काळजी घ्यायची म्हंजे त्रासच की हो.
  • Log in or register to post comments

मुळात अनेक संस्थळांवरती

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/20/2012 - 05:36 नवीन
मुळात अनेक संस्थळांवरती संस्थळ चालकांचे आणि संपादकांचे देखील खोर्‍याने डुप्लिकेट आयडी असतात, त्यामुळे आपल्या डुप्लिकेट आयडी काढण्यात काही अपराधी भावना अथवा लाज बिलकुल बाळगू नये.
चोक्कस! लगे रहो राजेश घासकडवी.
  • Log in or register to post comments

>>>लगे रहो राजेश घासकडवी गप्प

प्यारे१
Fri, 04/20/2012 - 11:49 नवीन
>>>लगे रहो राजेश घासकडवी गप्प बसायचे ठरवले आहे. - प्यारेलि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लगे रहो राजेश घासकडवी.

चिंतामणी
Fri, 04/20/2012 - 13:50 नवीन
आँ. परिकथेतील राजकुमार हा राजेश घासकडवी यांचा डु आय डी आहे का?:o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहा

चित्रा
Fri, 04/20/2012 - 05:54 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

अरे देवा, हसू आवताना नाकी नऊ

चाफा
Fri, 04/20/2012 - 10:01 नवीन
अरे देवा, हसू आवताना नाकी नऊ आले परा फुल्ल थ्रॉटल :)
  • Log in or register to post comments

हाहाहा

दिपक
Fri, 04/20/2012 - 11:39 नवीन
लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्‍याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्‍हाड मारून घ्याल.
पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे. वाद विवाद घालताना 'पुण्या मुंबईच्या लोकांना त्यांनाच सगळे काय ते कळते असे का वाटते कोणास ठाऊक' अशी प्रतिक्रिया देणे तुम्हाला मस्ट आहे.
=)) =)) =)) हैला परा काय खाऊन बसला होता रे लेख लिहायला. एकदम खत्री. "वारंवार विचारले जाणारे प्रश्न"मध्ये ह्या लेखाची लिंक देण्यात यावी अशी इनंती. :-)
  • Log in or register to post comments

अगागागा

नंदन
Fri, 04/20/2012 - 12:41 नवीन
काय अभ्यास, काय अभ्यास! फ्रॉईडच्या थिअरीला पुढे नेणार्‍या 'मराठी आंतरजाल: आय.डी., इगो आणि सुपरइगो' ह्या आपल्या आगामी पुस्तकाची एक प्रत आजच नोंदवून ठेवतो ;)
  • Log in or register to post comments

च्यामारी या पर्‍याला आवारा

मदनबाण
Fri, 04/20/2012 - 12:43 नवीन
च्यामारी या पर्‍याला आवारा कोणातरी ! नुसात मोकाट सुटलाय ! याने तर डु आयडीवर पीएचडी केली रे ! ;)
  • Log in or register to post comments

सलाम

मयुरपिंपळे
Fri, 04/20/2012 - 12:46 नवीन
प्रसाद ताम्ह्नकर सर तुम्हाला सलाम! ;)
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त! वाचनमात्र

अभिज्ञ
Fri, 04/20/2012 - 12:52 नवीन
ज ब र द स्त! वाचनमात्र असलेल्या चार / पाच दिवसात आपली खरडवही जमेल तेवढी सजवावी. खरडवहीत नाव-गाव-फळ-फुल सगळ्याची सविस्तर माहिती द्यावी. लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्‍याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्‍हाड मारून घ्याल. हे तर लै भारी. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

=)))

बिपिन कार्यकर्ते
Fri, 04/20/2012 - 13:14 नवीन
=)))
  • Log in or register to post comments

.

निखिल देशपांडे
Fri, 04/20/2012 - 15:07 नवीन
.
  • Log in or register to post comments

अर्र्र! हा लेख चुकुन या

अन्या दातार
Fri, 04/20/2012 - 19:15 नवीन
अर्र्र! हा लेख चुकुन या आयडीवरुन प्रकाशित केला गेला का? छे! पुढच्या वेळेपासून नीट खबरदारी घेतली पाहिजे ब्वा :(
  • Log in or register to post comments

डु आयडींनी आपल्या ब्लॉगच्या

प्रचेतस
Fri, 04/20/2012 - 19:17 नवीन
डु आयडींनी आपल्या ब्लॉगच्या लिंका स्वाक्षरीत ठेऊ नयेत. उघडे पडतात लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

स्त्रियांनी बाईचे आणि

सागरकदम
Wed, 11/04/2015 - 01:32 नवीन
स्त्रियांनी बाईचे आणि पुरुषाने नाव एकत्र करून आयडी घ्यावा म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

म्हणजे

कपिलमुनी
Wed, 11/04/2015 - 09:16 नवीन
किरण करमरकर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

किती निरागस प्रश्न!!

सूड
Wed, 11/04/2015 - 15:02 नवीन
किती निरागस प्रश्न!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

कल्पनाविलास , भावनाचोर

कंजूस
Wed, 11/04/2015 - 16:29 नवीन
कल्पनाविलास , भावनाचोर ,करुणानंदन वगैरे म्हणायचे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

कल्पनाविलास , भावनाचोर

होबासराव
Wed, 11/04/2015 - 16:52 नवीन
काका हा षटकार एकदम स्टेडियम च्या बाहेर गेला :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

भावना प्रधान

सागरकदम
Mon, 11/09/2015 - 23:15 नवीन
भावना प्रधान स्मृती चित्रे असे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

वरील सल्ला वाचून एक पुरुष आणि

सुबोध खरे
Wed, 11/04/2015 - 09:43 नवीन
वरील सल्ला वाचून एक पुरुष आणि एक स्त्री डू आय डी घ्यावे असे फार फार वाटून राहिले आहे.
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Wed, 11/04/2015 - 18:21 नवीन
डॉक, तुम्हाला नाही जमणार ते! पहिल्या दोन ओळीत ओळखू याल तुम्ही! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पैसा ताई

सुबोध खरे
गुरुवार, 11/05/2015 - 13:27 नवीन
पैसा ताई लहानपणी एक वाक्य वाचलेलं लक्षात राहिलेलं आहे. तुम्ही जर एक नंबरचे थापाडे नसाल तर आपलं खरं बोललेलं बरं. म्हणून तर आमचा कोणताही डू आय डी नाही आणि नाव सुद्धा खरं आहे. उगाच जे जमत नाही ते करा कशाला. पण असावं असा वाटतं त्याचं काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अजून एक फायदा आहे

पैसा
गुरुवार, 11/05/2015 - 13:51 नवीन
नेहमी खरं बोललं तर कोणाला कधी काय खोटं सांगितलं होतं ते लक्षात ठेवावं लागत नाही! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक

नाखु
Wed, 11/04/2015 - 09:45 नवीन
कालातीत लेख !
  • Log in or register to post comments

+१

मुक्त विहारि
Wed, 11/04/2015 - 12:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

माई कुरसुंदीकर , नाना साहेब

विजुभाऊ
Wed, 11/04/2015 - 17:19 नवीन
माई कुरसुंदीकर , नाना साहेब नेफळे , काकासाहेब केंजळे ,दादा दरेकर, ग्रेट्थिंकर यांचं काय ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चिंतामणी
Wed, 11/04/2015 - 18:06 नवीन
ज्यांनी प्रतिसाद टाकुन हा लेख वर काढला त्यांचा. भूतकाळात गेलो हे वाचुन. स्वगत- पराचे पुनरागमन झाले आहे हे समजण्यासाठी इतके डु आय डी????
  • Log in or register to post comments

मी आणलाय

सागरकदम
गुरुवार, 11/05/2015 - 11:44 नवीन
मी आणलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मी मी मी मी मी मी मी मी मी मी

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 13:21 नवीन
मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 11/06/2015 - 12:35 नवीन
सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला रंगा नव्हे. रंगाण्णा डबा वापरत असतील असं वाटत नै!) डबा आणुन देउ का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

णक्को

टवाळ कार्टा
Fri, 11/06/2015 - 13:05 नवीन
णक्को
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

'मी' ला पकडणं केवळ सोपंच नाही

सूड
Fri, 11/06/2015 - 22:57 नवीन
'मी' ला पकडणं केवळ सोपंच नाही शक्यही आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डॉन डॉन डॉन

सागरकदम
Mon, 11/09/2015 - 23:13 नवीन
डॉन डॉन डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पातेलं पातेलं पातेलं =))

टवाळ कार्टा
Mon, 11/09/2015 - 23:20 नवीन
पातेलं पातेलं पातेलं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

दिल ने

सागरकदम
Mon, 11/09/2015 - 23:45 नवीन
दिल ने दिल को पुकारा लो मैन आया मिळणे दुबार काहो ना प्यार हैन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खि खि खि....श्टैल भारीयाइ

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 09:14 नवीन
खि खि खि....श्टैल भारीयाइ तुझी...कस्स क्कॉय्य जम्तं बुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

अहो त्यामुळेच तर स्त्री

सागरकदम
Tue, 11/10/2015 - 11:14 नवीन
अहो त्यामुळेच तर स्त्री प्रजाती माझ्याशी भांडतात व नंतर त्यांना मी आवडू लागतो काहो न प्यार हैन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 12:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

हा लाल नाही magneta आहे

सागरकदम
Tue, 11/10/2015 - 12:53 नवीन
हा लाल नाही magneta आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बरं मग?

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 12:56 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

delusions of grandeurhttps:/

सुबोध खरे
Tue, 11/10/2015 - 18:45 नवीन
delusions of grandeur https://en.wikipedia.org/wiki/Grandiose_delusions
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

कहि ये अमितपतिल तो नही;)

पियुशा
Tue, 11/10/2015 - 18:51 नवीन
कहि ये अमितपतिल तो नही;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

आज्काल आपण डुआयडी आहोत हे

टवाळ कार्टा
Wed, 11/04/2015 - 20:03 नवीन
आज्काल आपण डुआयडी आहोत हे मिरवणे हे इनथिंग आहे
  • Log in or register to post comments

काय झकास पंच मारला!!!

मांत्रिक
Fri, 11/06/2015 - 13:26 नवीन
काय झकास पंच मारला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खरं सांगायचं आणि खोटं नाही

कंजूस
Fri, 11/06/2015 - 13:43 नवीन
खरं सांगायचं आणि खोटं नाही बोलता येत -आमचे दोन डुआइडी आहेत आणि ते आम्ही लैट गेल्यावर हातपंखा जसा जपून वापरतो ( कारण हात दुखतात )तसे वापरत आहोत. एका खरंतर दोन गोष्टींचे वैट वाटते की आणखी दोन डुआइडी नोंदणीसाठी टाकले आणि मिपाचे दरवाजे बंद होताना त्यात चिमटले.
  • Log in or register to post comments

खरंच सांगतो ...

पगला गजोधर
Sat, 11/07/2015 - 18:21 नवीन
लैट गेल्यावर हातपंखा जसा जपून वापरतो ( कारण हात दुखतात )तसे वापरत आहोत.
हे वाक्य आधी मी चुकून
लैट गेल्यावर हातपंप जसा जपून वापरतो ( कारण हात दुखतात )तसे वापरत आहोत.
असे वाचलेले. वाचल्यावर शरीरात सूक्ष्म कळ आली ( कुठे ते विचारू नका ) डोळ्यासमोर अंधारात घामाघूम झालेली व हात दुखावलेली व्यक्ती आली. मग परत नीट वाचल्यावर मनातील गोंधळ शमला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

=))

टवाळ कार्टा
Sat, 11/07/2015 - 19:23 नवीन
=)) निदान हातपंप म्हटल्यावर सनी पाजीचा हातपंप उखाडण्याचा सीन तरी आठवायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

या संदर्भात त्या शीनचा अर्थ

बॅटमॅन
Sat, 11/07/2015 - 22:51 नवीन
या संदर्भात त्या शीनचा अर्थ लावावयाचा तर "वसतिगृह भाग २" नामक विंग्रजी चित्रपटातील काही दृश्ये पहावी लागतील. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा