बिघडला स्वर्ग हा अपार.
स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे.
नारदमुनी: नारायण , नारायण.
विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला?
नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन!
विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला?
नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले. "जस्ट डू इट!"
(चेहेर्यावरचा घाम पुसत लक्ष्मीची एन्ट्री होते.)
लक्ष्मी: हॅलो मुनीवर!
नारद: नमस्कार देवी, कश्या आहात? अंमळ थकलेल्या वाटता.
लक्ष्मी: हो, हे काय आत्ताच फिटनेस सेंटरमधून आलिये. माहेरी एक लग्न निघालय, म्हटलं जरा वजन कमी करावं.
(विष्णूकडे रागाने कटाक्ष टाकत) यांच्यासारखे सुपरबॉलचे चोचले कसे परवडावेत आम्हाला! (आत जाते)
विष्णू (सावरून घेत): तर, काय हो मुनीवर तुमच्या तब्येतीचं हे असं कश्यामुळे झालं?
नारद: हम्म्म्.......आउटसोर्सींग! हल्ली पृथ्वीतलावरच्या फेर्या कमी झाल्यात,बरचसं काम त्रिखंड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स केलय. व्हिडिओ कॉन्फरन्स करूनच अपडेटस् घेत असतो.
(तेवढ्यात लक्ष्मी हातात ओनियन रिंग्जची प्लेट घेऊन बाहेर येते.)
लक्ष्मी: अहो मुनीवर यांच्याही पोटाचा घेर केवढा झालाय पहा ना! सगळी पितांबरं गुढग्यापर्यंत वर सरकलियेत. तरी सांगत असते, सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे! पण आमचं कोण ऐकणार?
विष्णू (मखलाशी करत): फार नाही हो मुनीवर, तसा मी योगा करत असतो अधून मधून. सुस्कारे सोडतानाच कपालभातीही होवून जाते.
लक्ष्मी (फणकार्याने): थोडा कसला, परवाच झालेल्या कैलास व्हिजिटमध्ये गरूडाला यांचं वजन सहन न होवून दोनदा थांबावं लागलं असं शंकरभावोजी जीटॉकवर सांगत होते. बरं, मी जाते बाई! लग्नात घ्यायचा उखाणा तयार करायचाय.
विष्णू (थट्टेच्या सुरात): देवी, आम्हालाही ऐकू द्याकी तुमचा उखाणा! लग्नानंतर घेतलाच नाहियेत.....
लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल,
विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
नारद: हा हा हा. छानच हो देवी! पण एक सांगा, खमंग कांदा भज्यांवरून अनियन रिंग्जवर कश्याकाय आलात?
लक्ष्मी: मिसेस मोहिनी धन्वंतरींनी आमचं डाएट प्लॅन करून दिलय, त्याप्रमाणेच करते सगळं. बरंतर मुनीवर, मी जरा शॉपिंगला जाऊन येते. (राजरथ हॅन्डबॅग आणि हायहिल्स सावरत प्रस्थान करते.)
विष्णू: मुनीवर, आजकाल बातम्या मिळण्यासाठी आम्हाला तुमच्याशिवाय इतरही पर्याय आहेत बरं का! नुकतेच चित्रगुप्ताने ट्वीट केल्यानुसार तो त्याच्या चोपड्या आउटडेट करून काम क्लाऊड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स करतोय म्हणे!
नारद: हम्म्....चालायचच. दिवस बदलले तशी तंत्रंही बदलली. अनायसे होणारा व्यायाम मात्र थांबला.
(नारदाच्या आयफोनची कॉलर ट्यून वाजते) हां, बोल रे.....काय? काय म्हणतोयस तू?........आस्सं होय्......निघतोच्.....लगेच.
विष्णू: काय हो मुनीवर काय झालं? काही गडबड?
नारद: हो हो सांगतो. लगेच निघायला हवं मला. असुर ग्रुप ऑफ हॅकर्सनी म्हणे त्रिखंड सर्व्हिसेसची वेबसाईट हॅक केलीये. यापुढे बातम्या काढण्यासाठी आणि पुरवण्यासाठी मलाच त्रिलोकीची यात्रा करावी लागणार. अर्थात माझे व्यवहार सुरळीत होणार. अहो शेवटी यंत्र ते यंत्र आणि तंत्र ते तंत्र! त्या यंत्रांना निकामी करण्यासाठी असूर गृपची योग्य ती कळ दाबण्याचं कार्य पार पाडलं ते आमच्या तंत्रानंच.......काहीही झालं तरी कळीचा नारद मी. जाता जाता "चारी तोंडानं चारीठाव चरणार्या" ब्रम्हदेवालाही काम तंत्रानं होऊ देण्याबद्दल सांगतो म्हणजे त्याच्या वाढणार्या वजनाखाली कोमेजणारं कमळ पुन्हा तरारून येईल!
नारायण नारायण!
(शिर्षक श्रेय- रंगाण्णा.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच..
हा हा हा
मजेशीर ...
सहमत
वा मजा आली वाचताना.
:)
खुपच निखळ लेखन आवडले ...
भन्नाट!
हाहाहा!
एक नारद माझ्या चांगलाच
उपप्रतिसाद देत आहे
अजुन फक्त ४९ उरले.
सुपरी कोणाला दिली आहे......
चायला सॉरी माताय
मस्त! स्वगतः देवसुद्धा मॉडर्न
हाहाहा मजा आली वाचून
धन्यवाद मंडळी! आवाहन न करता
>>सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले हो
अस्सं होय.
लय भारी लेख आणी प्रतिक्रिया
फेसबुक काय, ओनियन रिंग काय
हाहाहा मस्तच.
हाहाहा रेवतीताई ढेर दुखवस्तवर
हा हा हा उत्तम
मस्त. "शंकरभावोजी जीटॉकवर"
छान
मस्त..
हम्म
जाहीर पुणेरी मराठी:
बरं झालं बाबा निषेध
ज ह ब -या
ह्यःह्यः रेवती आज्जी मधेच
झकास
समजता कोण स्वतः ला ?
एका हलक्या फुलक्या
मस्त आहे लेख..
रेवाक्का_/\_
=)) मस्तं!!