✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बिघडला स्वर्ग हा अपार.

र
रेवती यांनी
Tue, 02/07/2012 - 02:58  ·  लेख
लेख
स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे. नारदमुनी: नारायण , नारायण. विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला? नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन! विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला? नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले. "जस्ट डू इट!" (चेहेर्‍यावरचा घाम पुसत लक्ष्मीची एन्ट्री होते.) लक्ष्मी: हॅलो मुनीवर! नारद: नमस्कार देवी, कश्या आहात? अंमळ थकलेल्या वाटता. लक्ष्मी: हो, हे काय आत्ताच फिटनेस सेंटरमधून आलिये. माहेरी एक लग्न निघालय, म्हटलं जरा वजन कमी करावं. (विष्णूकडे रागाने कटाक्ष टाकत) यांच्यासारखे सुपरबॉलचे चोचले कसे परवडावेत आम्हाला! (आत जाते) विष्णू (सावरून घेत): तर, काय हो मुनीवर तुमच्या तब्येतीचं हे असं कश्यामुळे झालं? नारद: हम्म्म्.......आउटसोर्सींग! हल्ली पृथ्वीतलावरच्या फेर्‍या कमी झाल्यात,बरचसं काम त्रिखंड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स केलय. व्हिडिओ कॉन्फरन्स करूनच अपडेटस् घेत असतो. (तेवढ्यात लक्ष्मी हातात ओनियन रिंग्जची प्लेट घेऊन बाहेर येते.) लक्ष्मी: अहो मुनीवर यांच्याही पोटाचा घेर केवढा झालाय पहा ना! सगळी पितांबरं गुढग्यापर्यंत वर सरकलियेत. तरी सांगत असते, सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे! पण आमचं कोण ऐकणार? विष्णू (मखलाशी करत): फार नाही हो मुनीवर, तसा मी योगा करत असतो अधून मधून. सुस्कारे सोडतानाच कपालभातीही होवून जाते. लक्ष्मी (फणकार्‍याने): थोडा कसला, परवाच झालेल्या कैलास व्हिजिटमध्ये गरूडाला यांचं वजन सहन न होवून दोनदा थांबावं लागलं असं शंकरभावोजी जीटॉकवर सांगत होते. बरं, मी जाते बाई! लग्नात घ्यायचा उखाणा तयार करायचाय. विष्णू (थट्टेच्या सुरात): देवी, आम्हालाही ऐकू द्याकी तुमचा उखाणा! लग्नानंतर घेतलाच नाहियेत..... लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! नारद: हा हा हा. छानच हो देवी! पण एक सांगा, खमंग कांदा भज्यांवरून अनियन रिंग्जवर कश्याकाय आलात? लक्ष्मी: मिसेस मोहिनी धन्वंतरींनी आमचं डाएट प्लॅन करून दिलय, त्याप्रमाणेच करते सगळं. बरंतर मुनीवर, मी जरा शॉपिंगला जाऊन येते. (राजरथ हॅन्डबॅग आणि हायहिल्स सावरत प्रस्थान करते.) विष्णू: मुनीवर, आजकाल बातम्या मिळण्यासाठी आम्हाला तुमच्याशिवाय इतरही पर्याय आहेत बरं का! नुकतेच चित्रगुप्ताने ट्वीट केल्यानुसार तो त्याच्या चोपड्या आउटडेट करून काम क्लाऊड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स करतोय म्हणे! नारद: हम्म्....चालायचच. दिवस बदलले तशी तंत्रंही बदलली. अनायसे होणारा व्यायाम मात्र थांबला. (नारदाच्या आयफोनची कॉलर ट्यून वाजते) हां, बोल रे.....काय? काय म्हणतोयस तू?........आस्सं होय्......निघतोच्.....लगेच. विष्णू: काय हो मुनीवर काय झालं? काही गडबड? नारद: हो हो सांगतो. लगेच निघायला हवं मला. असुर ग्रुप ऑफ हॅकर्सनी म्हणे त्रिखंड सर्व्हिसेसची वेबसाईट हॅक केलीये. यापुढे बातम्या काढण्यासाठी आणि पुरवण्यासाठी मलाच त्रिलोकीची यात्रा करावी लागणार. अर्थात माझे व्यवहार सुरळीत होणार. अहो शेवटी यंत्र ते यंत्र आणि तंत्र ते तंत्र! त्या यंत्रांना निकामी करण्यासाठी असूर गृपची योग्य ती कळ दाबण्याचं कार्य पार पाडलं ते आमच्या तंत्रानंच.......काहीही झालं तरी कळीचा नारद मी. जाता जाता "चारी तोंडानं चारीठाव चरणार्‍या" ब्रम्हदेवालाही काम तंत्रानं होऊ देण्याबद्दल सांगतो म्हणजे त्याच्या वाढणार्‍या वजनाखाली कोमेजणारं कमळ पुन्हा तरारून येईल! नारायण नारायण! (शिर्षक श्रेय- रंगाण्णा.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
विनोद
समाज
जीवनमान
तंत्र
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
19618 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

मस्तच..

वपाडाव
Tue, 02/07/2012 - 15:09 नवीन
देव हा प्रत्येक माणसात आहे....
  • Log in or register to post comments

हा हा हा

नगरीनिरंजन
Tue, 02/07/2012 - 15:11 नवीन
आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
:-D कलियुग असल्याने स्वर्गात देवांना असाच कैतरी टैमपास करावा लागत असेल.
  • Log in or register to post comments

मजेशीर ...

छोटा डॉन
Tue, 02/07/2012 - 15:16 नवीन
लेख वाचुन मनापासुन हसलो, मस्त लेख आहे. काही प्रतिक्रिया वाचुन तर धो धो हसलो, मनोरंजक प्रतिक्रिया आहेत. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

सहमत

तिमा
Tue, 02/07/2012 - 18:15 नवीन
छोटा डॉनशी अंशतः सहमत. कारण लेख वाचून फारसे हंसू आले नाही. पण प्रतिक्रिया वाचून मात्र भरपूर हंसलो. लेख तसा बरा आहे. पण रेवतीताईंकडून जास्त अपेक्षा होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

वा मजा आली वाचताना.

जागु
Tue, 02/07/2012 - 15:28 नवीन
वा मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

:)

प्राजक्ता पवार
Tue, 02/07/2012 - 15:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments

खुपच निखळ लेखन आवडले ...

गणेशा
Tue, 02/07/2012 - 17:25 नवीन
खुपच निखळ लेखन आवडले ...
  • Log in or register to post comments

भन्नाट!

स्वाती२
Tue, 02/07/2012 - 18:24 नवीन
भन्नाट!
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 02/07/2012 - 18:51 नवीन
रेवती, तू पण वाद ओढवून घ्यायला शिकलीस तर! आता तुझे सगळे धागे हिट होणार बघ! फक्त प्रत्येकाला उपप्रतिसाद द्यायचं तेवढं जमव ब्वॉ! ;) नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला!
  • Log in or register to post comments

एक नारद माझ्या चांगलाच

गणपा
Tue, 02/07/2012 - 19:05 नवीन
एक नारद माझ्या चांगलाच ओळखीतला आहे. पण 'तो' तोच का? हे कळण्यासाठी वरील संवाद नेमका केव्हा घडला (म्हणजे एक्झॅक्ट काळ/वेळ काय) ते आधी कळायला हवं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

उपप्रतिसाद देत आहे

रामदास
Tue, 02/07/2012 - 22:00 नवीन
नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला! सहमत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अजुन फक्त ४९ उरले.

गणपा
Tue, 02/07/2012 - 19:01 नवीन
अजुन फक्त ४९ उरले. ;)
  • Log in or register to post comments

सुपरी कोणाला दिली आहे......

मनराव
Tue, 02/07/2012 - 19:04 नवीन
सुपरी कोणाला दिली आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

चायला सॉरी माताय

मी-सौरभ
Wed, 02/08/2012 - 11:02 नवीन
कोण आहे रे काँपिटीशन आमच्या धंद्याला???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

मस्त! स्वगतः देवसुद्धा मॉडर्न

मराठे
Tue, 02/07/2012 - 21:01 नवीन
मस्त! स्वगतः देवसुद्धा मॉडर्न होतील पण लोकांनी होऊ दिलं पाहिजे ना!
  • Log in or register to post comments

हाहाहा मजा आली वाचून

जाई.
Tue, 02/07/2012 - 21:09 नवीन
हाहाहा मजा आली वाचून
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी! आवाहन न करता

रेवती
Tue, 02/07/2012 - 21:56 नवीन
धन्यवाद मंडळी! आवाहन न करता इतके प्रतिसाद मिळणे हे माझ्यासाठी मोठीच गोष्ट. त्या लक्ष्मीमातेचीच कृपा. अनेकांनी प्रेमापोटी प्रतिक्रियांचे शतक व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली. अनेकांना लेखन आवडले, काहींना नाही आवडले. अगदी असेच अपेक्षित होते. न आवडल्याचे कळवणार्‍यांचेही तेवढेच स्वागत. यातून आपल्या देवदेवतांची कुचेष्टा करण्याचा हेतू नव्हता. गणपतीबाप्पाला स्वेटर घातल्यावर काहींना क्यूट वाटते तर काहींना आवडत नाही. आपापला दृष्टीकोन. मी कट्टर देवभक्त नसले तरी देवावर श्रद्धा असणार्‍यांपैकी आहे. देवाला अगदी आपल्या मनाजवळ मानणे मला भावते. बाणा, हा लेख रंगाकाकांनी लिहिलेला नाही. शुद्धलेखनाच्या चुकांकडे तरी बघ, लगेच समजेल. मेवे, हो, लेख जरा संपल्यासारखा मलाही नंतर वाटला. पैसाताई आणि गणपा, रयवारी एका मराठी ग्रुपच्या मिटींगला सहज आणि पहिल्यांदाच गेले असताना डोक्यात किडा वळवळू लागला. सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले होते. नंतर लेखनावर हात फिरवण्याचा मूड नव्हता. आभार लवकर का मानले असे विचारू नये. उद्या जमणार नसल्याने आज मानले एवढेच.;)
  • Log in or register to post comments

>>सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले हो

संदीप चित्रे
Wed, 02/08/2012 - 21:48 नवीन
आम्ही पहाटे चार वाजता फक्त 'अ‍टलांटिक सिटी'हून परत घरी येतानाच जागे असतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अस्सं होय.

रेवती
Wed, 02/08/2012 - 21:51 नवीन
अस्सं होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

लय भारी लेख आणी प्रतिक्रिया

निनाद मुक्काम …
Tue, 02/07/2012 - 21:57 नवीन
लय भारी लेख आणी प्रतिक्रिया खुसखुशीत आहेत.
  • Log in or register to post comments

फेसबुक काय, ओनियन रिंग काय

पाषाणभेद
Tue, 02/07/2012 - 22:13 नवीन
फेसबुक काय, ओनियन रिंग काय मजा आहे बुवा!
  • Log in or register to post comments

हाहाहा मस्तच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/07/2012 - 22:20 नवीन
लेखन आवडले. :) आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! हे तर लैच भारी. बाकी, विष्णूपंत हे क्रिकेटचे फ्यान होते असे ऐकलेले होते. बाकी, क्रिकेटमधील दारुण पराभव पाहवत नसल्यामुळे विष्णूपंत सुपरबॉलकडे वळले की काय ? :) टीप : विष्णूपंत हे इहलोकातील एखाद्या काल्पनिक मनुष्याचं नाव असावं म्हणून प्रतिसादात विष्णूपंत असे लिहिले आहे. कोणा शिव आणि वैष्णव पंथांच्या भक्तांनी उगाच टेंशन घेऊ नये, ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हाहाहा रेवतीताई ढेर दुखवस्तवर

मितभाषी
Tue, 02/07/2012 - 22:45 नवीन
हाहाहा रेवतीताई ढेर दुखवस्तवर हसलो लेख वाचताना. मितभाषी.
  • Log in or register to post comments

हा हा हा उत्तम

सानिकास्वप्निल
Tue, 02/07/2012 - 23:00 नवीन
उत्तम लिहिले आहेस रेवती :) "सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे!" हे वाचून खुप हसायला आले :bigsmile: आणी उखाणा तर क्या बात!! क्या बात!! क्या बात!!
  • Log in or register to post comments

मस्त. "शंकरभावोजी जीटॉकवर"

बबलु
Wed, 02/08/2012 - 05:04 नवीन
मस्त. "शंकरभावोजी जीटॉकवर" --- जबरी. :) आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! --- हपुवा. :) :)
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
Wed, 02/08/2012 - 10:06 नवीन
काही कल्पना अजून फुलवून एखादे नाटुकले होऊ शकले असते असे वाटले. अर्थात निर्मितीची वेळ बघता पटकन लेख संपला यात आश्चर्य नाही.
  • Log in or register to post comments

मस्त..

विसोबा खेचर
Wed, 02/08/2012 - 11:13 नवीन
मस्त.. :)
  • Log in or register to post comments

हम्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/08/2012 - 12:23 नवीन
अशा लिखाणाचा आम्ही जाहिर निषेध करतो आहोत ! आपल्याच संस्कृतीची खिल्ली उडवणारे लेखन आपल्याच लोकांकडून व्हावे यासारखे दुर्दैव नाही. परा कटियार अध्यक्ष चतुरंग दल
  • Log in or register to post comments

जाहीर पुणेरी मराठी:

असुर
Wed, 02/08/2012 - 17:39 नवीन
जाहीर पुणेरी मराठी: +१ रेवतीआजीने आम्हाला पराषेटच्या गोटात परस्परच ढकलून दिल्याने संमती देतो आहे. बाकी या ढकलाढकलीचा आनंद (अथवा दु:ख) साजरा करण्याबाबत आम्ही साशंक आहोत. खाजगी पुणेरी मराठी: लेख आवडला हो. पण मेव्या म्हणतोय तसा - शुरु होतेही खतम हो गया, और भौत घाईघाईमें लिख्या लगता है. --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बरं झालं बाबा निषेध

रेवती
Wed, 02/08/2012 - 21:53 नवीन
बरं झालं बाबा निषेध केलास. म्हटलं गेला कुठे हा. जमलं तर त्या असुरालाही समजाव. त्याचं नाव लिहिलं हे एकच मनात धरून बसलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ज ह ब -या

jaypal
गुरुवार, 02/09/2012 - 11:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ह्यःह्यः रेवती आज्जी मधेच

स्पा
गुरुवार, 02/09/2012 - 15:46 नवीन
ह्यःह्यः रेवती आज्जी मधेच काय झटका आला का ग? एकदम भन्नाट लीव्लयेस =)) =)) शतक करू आपण तुझ खाम्पलीट :D
  • Log in or register to post comments

झकास

अभिज्ञ
Fri, 02/10/2012 - 11:07 नवीन
मस्त खुसखुशीत लेखन. वाचताना मजा आली. काहि प्रतिसाद वाचून छान करमणूक झाली. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

समजता कोण स्वतः ला ?

चौकटराजा
Fri, 02/10/2012 - 11:17 नवीन
अहो , लेखिका बाई , का अशी आमच्या देव देवतांची चेष्टा करता. ....आता आमच्या कित्ती किती भावना दुखावल्या म्हणून सांगू ? आमच्यात फतवे निघत नाहीत म्हनून त्याचा लई म्हजी लईच डिस अ‍ॅडवव्हान्टेज घेता की हो ! कल्पना भारी आहे. पण एक " बग" त्यात आहे..... देवांना भूक ही भावना नसते... संदर्भ .. जीतेंद्र , प्रेमनाथ देवेन वर्माचा लोक परलोक हा चित्रपट. ( यावर भारत सरकरने बंदी घातली होती..... भावना दुखावल्या..... आ>>>>ईईईईए ग ) त्यामुळे विष्णूना सेंट्रल ओबेसिटी होणे गैरलागू आहे. फारतर सोमरसाचा डोस ज्यादा आल्याने काही अघटित आजार आला असे रूपक घेता आले असते ...अरे ,,, अरे पण देवाना आजारही होत नाहीत ,ते अजरामर आहेत ना .....? मग अश्विनीकुमार , डॉ. धनवंतरी यांचे काय बुवा तिथे...... ? अरारा ...... काहीच संगति लागत नाही ... मति गुंग झाली...... मग आता लेखनसीमा .
  • Log in or register to post comments

एका हलक्या फुलक्या

गणपा
Fri, 02/10/2012 - 13:01 नवीन
लेखाची चांगली चिरफाड केलीये.. लगे रहो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मस्त आहे लेख..

जेपी
Fri, 06/24/2016 - 17:46 नवीन
मस्त आहे लेख..
  • Log in or register to post comments

रेवाक्का_/\_

नूतन सावंत
Fri, 06/24/2016 - 18:53 नवीन
रेवाक्का_/\_
  • Log in or register to post comments

=)) मस्तं!!

पद्मावति
Fri, 06/24/2016 - 19:43 नवीन
=)) मस्तं!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा