स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे.
नारदमुनी: नारायण , नारायण.
विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला?
नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन!
विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला?
नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले. "जस्ट डू इट!"
(चेहेर्यावरचा घाम पुसत लक्ष्मीची एन्ट्री होते.)
लक्ष्मी: हॅलो मुनीवर!
नारद: नमस्कार देवी, कश्या आहात? अंमळ थकलेल्या वाटता.
लक्ष्मी: हो, हे काय आत्ताच फिटनेस सेंटरमधून आलिये. माहेरी एक लग्न निघालय, म्हटलं जरा वजन कमी करावं.
(विष्णूकडे रागाने कटाक्ष टाकत) यांच्यासारखे सुपरबॉलचे चोचले कसे परवडावेत आम्हाला! (आत जाते)
विष्णू (सावरून घेत): तर, काय हो मुनीवर तुमच्या तब्येतीचं हे असं कश्यामुळे झालं?
नारद: हम्म्म्.......आउटसोर्सींग! हल्ली पृथ्वीतलावरच्या फेर्या कमी झाल्यात,बरचसं काम त्रिखंड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स केलय. व्हिडिओ कॉन्फरन्स करूनच अपडेटस् घेत असतो.
(तेवढ्यात लक्ष्मी हातात ओनियन रिंग्जची प्लेट घेऊन बाहेर येते.)
लक्ष्मी: अहो मुनीवर यांच्याही पोटाचा घेर केवढा झालाय पहा ना! सगळी पितांबरं गुढग्यापर्यंत वर सरकलियेत. तरी सांगत असते, सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे! पण आमचं कोण ऐकणार?
विष्णू (मखलाशी करत): फार नाही हो मुनीवर, तसा मी योगा करत असतो अधून मधून. सुस्कारे सोडतानाच कपालभातीही होवून जाते.
लक्ष्मी (फणकार्याने): थोडा कसला, परवाच झालेल्या कैलास व्हिजिटमध्ये गरूडाला यांचं वजन सहन न होवून दोनदा थांबावं लागलं असं शंकरभावोजी जीटॉकवर सांगत होते. बरं, मी जाते बाई! लग्नात घ्यायचा उखाणा तयार करायचाय.
विष्णू (थट्टेच्या सुरात): देवी, आम्हालाही ऐकू द्याकी तुमचा उखाणा! लग्नानंतर घेतलाच नाहियेत.....
लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल,
विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
नारद: हा हा हा. छानच हो देवी! पण एक सांगा, खमंग कांदा भज्यांवरून अनियन रिंग्जवर कश्याकाय आलात?
लक्ष्मी: मिसेस मोहिनी धन्वंतरींनी आमचं डाएट प्लॅन करून दिलय, त्याप्रमाणेच करते सगळं. बरंतर मुनीवर, मी जरा शॉपिंगला जाऊन येते. (राजरथ हॅन्डबॅग आणि हायहिल्स सावरत प्रस्थान करते.)
विष्णू: मुनीवर, आजकाल बातम्या मिळण्यासाठी आम्हाला तुमच्याशिवाय इतरही पर्याय आहेत बरं का! नुकतेच चित्रगुप्ताने ट्वीट केल्यानुसार तो त्याच्या चोपड्या आउटडेट करून काम क्लाऊड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स करतोय म्हणे!
नारद: हम्म्....चालायचच. दिवस बदलले तशी तंत्रंही बदलली. अनायसे होणारा व्यायाम मात्र थांबला.
(नारदाच्या आयफोनची कॉलर ट्यून वाजते) हां, बोल रे.....काय? काय म्हणतोयस तू?........आस्सं होय्......निघतोच्.....लगेच.
विष्णू: काय हो मुनीवर काय झालं? काही गडबड?
नारद: हो हो सांगतो. लगेच निघायला हवं मला. असुर ग्रुप ऑफ हॅकर्सनी म्हणे त्रिखंड सर्व्हिसेसची वेबसाईट हॅक केलीये. यापुढे बातम्या काढण्यासाठी आणि पुरवण्यासाठी मलाच त्रिलोकीची यात्रा करावी लागणार. अर्थात माझे व्यवहार सुरळीत होणार. अहो शेवटी यंत्र ते यंत्र आणि तंत्र ते तंत्र! त्या यंत्रांना निकामी करण्यासाठी असूर गृपची योग्य ती कळ दाबण्याचं कार्य पार पाडलं ते आमच्या तंत्रानंच.......काहीही झालं तरी कळीचा नारद मी. जाता जाता "चारी तोंडानं चारीठाव चरणार्या" ब्रम्हदेवालाही काम तंत्रानं होऊ देण्याबद्दल सांगतो म्हणजे त्याच्या वाढणार्या वजनाखाली कोमेजणारं कमळ पुन्हा तरारून येईल!
नारायण नारायण!
(शिर्षक श्रेय- रंगाण्णा.)
वाचने
19881
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा!!! सॉल्लिड!!
वा! क्या बात है!!
लक्ष्मी: आत्ताच अपडेटली
In reply to वा! क्या बात है!! by बहुगुणी
+१
In reply to वा! क्या बात है!! by बहुगुणी
हाजिर है!
In reply to वा! क्या बात है!! by बहुगुणी
अगदी चालेल. एका भेळेवर आम्ही
In reply to हाजिर है! by संदीप चित्रे
पण
In reply to अगदी चालेल. एका भेळेवर आम्ही by रेवती
अरे, संदीप हा जवळच
In reply to पण by मी-सौरभ
जाताना
In reply to अरे, संदीप हा जवळच by रेवती
जबरदस्त आवड्या.... निखळ
एकदम
ओम नमो नारायणाय !
:)
(शिर्षक श्रेय- रंगाण्णा.) मला
मस्त आहे , छान लिहील
मस्त
आवडेश !!
जाता जाता: शिर्षक की शीर्षक
In reply to आवडेश !! by सूड
___/\____ तुला लग्न करायचे
In reply to जाता जाता: शिर्षक की शीर्षक by विश्वनाथ मेहेंदळे
आज्जे
झक्कास...
सही, एकदम झक्कास
हाहाहा! खूप दिवसांनी रेवतीताई
+१
In reply to हाहाहा! खूप दिवसांनी रेवतीताई by बिपिन कार्यकर्ते
आवडलं नाही
अभ्यास वाढवा ...
In reply to आवडलं नाही by आदिजोशी
हिंदू ही जात आहे?
In reply to अभ्यास वाढवा ... by मूकवाचक
हम्म
In reply to हिंदू ही जात आहे? by आदिजोशी
किती वेळा मॉडिफाय कराल !!
In reply to हम्म by मूकवाचक
+१ टु आदिजोशी, असलंच जरा इतर
In reply to किती वेळा मॉडिफाय कराल !! by सूड
कल्याण आहे ऽ!!! अहो रेवती आजी
In reply to +१ टु आदिजोशी, असलंच जरा इतर by ५० फक्त
@आपणच आपल्या देवांची रेवडी
In reply to आवडलं नाही by आदिजोशी
उगाच दिलेला प्रतिसाद
In reply to @आपणच आपल्या देवांची रेवडी by अत्रुप्त आत्मा
@मग उगाच का मिरच्या
In reply to उगाच दिलेला प्रतिसाद by आदिजोशी
तुमचं सगळं म्हणणं
In reply to @मग उगाच का मिरच्या by अत्रुप्त आत्मा
का उगाच तालिबानी होताय?
In reply to उगाच दिलेला प्रतिसाद by आदिजोशी
+१०००००००
In reply to का उगाच तालिबानी होताय? by शिल्पा ब
मनातलं बोललास आदि. जरी अगदी
In reply to आवडलं नाही by आदिजोशी
जरी अगदी अपमानास्पद असं काही
In reply to मनातलं बोललास आदि. जरी अगदी by श्रीरंग
जरी अगदी अपमानास्पद असं काही
In reply to मनातलं बोललास आदि. जरी अगदी by श्रीरंग
१ नंबर !!
हाहाहा मस्त ग ..
उखाणा भारीच !! छान जमले आहे!!
ह्हा ह्हा ह्हा....एक नंबर
हा हा हा.. एकदम खुसखुशीत.
+१
In reply to हा हा हा.. एकदम खुसखुशीत. by गणपा
मज्जा आली गं
लेख छान आहे
हा हा हा...
हा हा हा!
मस्तच..
हा हा हा
मजेशीर ...
सहमत
In reply to मजेशीर ... by छोटा डॉन
वा मजा आली वाचताना.
:)
खुपच निखळ लेखन आवडले ...
भन्नाट!
हाहाहा!
एक नारद माझ्या चांगलाच
In reply to हाहाहा! by पैसा
उपप्रतिसाद देत आहे
In reply to हाहाहा! by पैसा
अजुन फक्त ४९ उरले.
सुपरी कोणाला दिली आहे......
In reply to अजुन फक्त ४९ उरले. by गणपा
चायला सॉरी माताय
In reply to सुपरी कोणाला दिली आहे...... by मनराव
मस्त! स्वगतः देवसुद्धा मॉडर्न
हाहाहा मजा आली वाचून
धन्यवाद मंडळी! आवाहन न करता
>>सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले हो
In reply to धन्यवाद मंडळी! आवाहन न करता by रेवती
अस्सं होय.
In reply to >>सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले हो by संदीप चित्रे
लय भारी लेख आणी प्रतिक्रिया