✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बिघडला स्वर्ग हा अपार.

र
रेवती यांनी
Tue, 02/07/2012 - 02:58  ·  लेख
लेख
स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे. नारदमुनी: नारायण , नारायण. विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला? नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन! विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला? नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले. "जस्ट डू इट!" (चेहेर्‍यावरचा घाम पुसत लक्ष्मीची एन्ट्री होते.) लक्ष्मी: हॅलो मुनीवर! नारद: नमस्कार देवी, कश्या आहात? अंमळ थकलेल्या वाटता. लक्ष्मी: हो, हे काय आत्ताच फिटनेस सेंटरमधून आलिये. माहेरी एक लग्न निघालय, म्हटलं जरा वजन कमी करावं. (विष्णूकडे रागाने कटाक्ष टाकत) यांच्यासारखे सुपरबॉलचे चोचले कसे परवडावेत आम्हाला! (आत जाते) विष्णू (सावरून घेत): तर, काय हो मुनीवर तुमच्या तब्येतीचं हे असं कश्यामुळे झालं? नारद: हम्म्म्.......आउटसोर्सींग! हल्ली पृथ्वीतलावरच्या फेर्‍या कमी झाल्यात,बरचसं काम त्रिखंड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स केलय. व्हिडिओ कॉन्फरन्स करूनच अपडेटस् घेत असतो. (तेवढ्यात लक्ष्मी हातात ओनियन रिंग्जची प्लेट घेऊन बाहेर येते.) लक्ष्मी: अहो मुनीवर यांच्याही पोटाचा घेर केवढा झालाय पहा ना! सगळी पितांबरं गुढग्यापर्यंत वर सरकलियेत. तरी सांगत असते, सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे! पण आमचं कोण ऐकणार? विष्णू (मखलाशी करत): फार नाही हो मुनीवर, तसा मी योगा करत असतो अधून मधून. सुस्कारे सोडतानाच कपालभातीही होवून जाते. लक्ष्मी (फणकार्‍याने): थोडा कसला, परवाच झालेल्या कैलास व्हिजिटमध्ये गरूडाला यांचं वजन सहन न होवून दोनदा थांबावं लागलं असं शंकरभावोजी जीटॉकवर सांगत होते. बरं, मी जाते बाई! लग्नात घ्यायचा उखाणा तयार करायचाय. विष्णू (थट्टेच्या सुरात): देवी, आम्हालाही ऐकू द्याकी तुमचा उखाणा! लग्नानंतर घेतलाच नाहियेत..... लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! नारद: हा हा हा. छानच हो देवी! पण एक सांगा, खमंग कांदा भज्यांवरून अनियन रिंग्जवर कश्याकाय आलात? लक्ष्मी: मिसेस मोहिनी धन्वंतरींनी आमचं डाएट प्लॅन करून दिलय, त्याप्रमाणेच करते सगळं. बरंतर मुनीवर, मी जरा शॉपिंगला जाऊन येते. (राजरथ हॅन्डबॅग आणि हायहिल्स सावरत प्रस्थान करते.) विष्णू: मुनीवर, आजकाल बातम्या मिळण्यासाठी आम्हाला तुमच्याशिवाय इतरही पर्याय आहेत बरं का! नुकतेच चित्रगुप्ताने ट्वीट केल्यानुसार तो त्याच्या चोपड्या आउटडेट करून काम क्लाऊड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स करतोय म्हणे! नारद: हम्म्....चालायचच. दिवस बदलले तशी तंत्रंही बदलली. अनायसे होणारा व्यायाम मात्र थांबला. (नारदाच्या आयफोनची कॉलर ट्यून वाजते) हां, बोल रे.....काय? काय म्हणतोयस तू?........आस्सं होय्......निघतोच्.....लगेच. विष्णू: काय हो मुनीवर काय झालं? काही गडबड? नारद: हो हो सांगतो. लगेच निघायला हवं मला. असुर ग्रुप ऑफ हॅकर्सनी म्हणे त्रिखंड सर्व्हिसेसची वेबसाईट हॅक केलीये. यापुढे बातम्या काढण्यासाठी आणि पुरवण्यासाठी मलाच त्रिलोकीची यात्रा करावी लागणार. अर्थात माझे व्यवहार सुरळीत होणार. अहो शेवटी यंत्र ते यंत्र आणि तंत्र ते तंत्र! त्या यंत्रांना निकामी करण्यासाठी असूर गृपची योग्य ती कळ दाबण्याचं कार्य पार पाडलं ते आमच्या तंत्रानंच.......काहीही झालं तरी कळीचा नारद मी. जाता जाता "चारी तोंडानं चारीठाव चरणार्‍या" ब्रम्हदेवालाही काम तंत्रानं होऊ देण्याबद्दल सांगतो म्हणजे त्याच्या वाढणार्‍या वजनाखाली कोमेजणारं कमळ पुन्हा तरारून येईल! नारायण नारायण! (शिर्षक श्रेय- रंगाण्णा.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
विनोद
समाज
जीवनमान
तंत्र
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
19618 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

हाहाहा!!! सॉल्लिड!!

प्राजु
Tue, 02/07/2012 - 03:04 नवीन
हाहाहा!!! सॉल्लिड!!
  • Log in or register to post comments

वा! क्या बात है!!

बहुगुणी
Tue, 02/07/2012 - 06:03 नवीन
वा, रेवती ताई, अप्रतिम! एखाद्या स्टॅंड-अप-कॉमेडी साठी उत्तम पक्का माल आहे, कॉलिंग संदीप चित्रे.....
  • Log in or register to post comments

लक्ष्मी: आत्ताच अपडेटली

पियुशा
Tue, 02/07/2012 - 09:59 नवीन
लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! हे हे हे भारीच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

+१

चैतन्य दीक्षित
Tue, 02/07/2012 - 15:47 नवीन
स्टँड-अप कॉमेडीसाठी ही स्क्रिप्ट खूपच मस्त ठरेल. लक्ष्मीचा उखाणा भारीच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हाजिर है!

संदीप चित्रे
Wed, 02/08/2012 - 21:41 नवीन
धन्स बहुगुणी .... रेवती, तुझा खुसखुशीत लेख आवडला. ह्याचे स्टॅंड अपच्या दृष्टीने काही करता येईल का बघतो. कॉपी राईट म्हणून 'भेळ' पुरेल असा अंदाज आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अगदी चालेल. एका भेळेवर आम्ही

रेवती
गुरुवार, 02/09/2012 - 09:48 नवीन
अगदी चालेल. एका भेळेवर आम्ही खूष!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

पण

मी-सौरभ
गुरुवार, 02/09/2012 - 17:14 नवीन
भेळेचे कुरीयर चार्गेस कोण देणार.. (नदीच्या अलीकड्चा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे, संदीप हा जवळच

रेवती
गुरुवार, 02/09/2012 - 19:10 नवीन
अरे, संदीप हा जवळच (त्यामानाने) राहतो. त्यातून त्याची बायको आहे सुगरण. मीच जाईन म्हणते आहे.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

जाताना

कुंदन
Fri, 02/10/2012 - 01:57 नवीन
जाताना ओन्यिन रिंगा घेउन जा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

जबरदस्त आवड्या.... निखळ

इन्दुसुता
Tue, 02/07/2012 - 07:09 नवीन
जबरदस्त आवड्या.... निखळ मनोरंजन.
  • Log in or register to post comments

एकदम

तुषार काळभोर
Tue, 02/07/2012 - 07:28 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments

ओम नमो नारायणाय !

शाहिर
Tue, 02/07/2012 - 08:14 नवीन
Image removed. बाकी चालू द्या !!
  • Log in or register to post comments

:)

प्रचेतस
Tue, 02/07/2012 - 08:28 नवीन
भारीच.
  • Log in or register to post comments

(शिर्षक श्रेय- रंगाण्णा.) मला

मदनबाण
Tue, 02/07/2012 - 08:35 नवीन
(शिर्षक श्रेय- रंगाण्णा.) मला तर अख्खा लेख रंगाण्णांनीच टंकलाय असा दाट संशय आहे ! ;) बाकी चालु द्या... नारायण ! नारायण ! ;)
  • Log in or register to post comments

मस्त आहे , छान लिहील

पक पक पक
Tue, 02/07/2012 - 08:37 नवीन
मस्त आहे , छान लिहील आहे........ आवडल.
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
Tue, 02/07/2012 - 09:45 नवीन
रेवतीताई, जबरदस्त लिहिलय. खूप मजा आली. डोळ्यासमोर येत होते सगळे प्रसंग.
  • Log in or register to post comments

आवडेश !!

सूड
Tue, 02/07/2012 - 09:57 नवीन
आवडेश !! जाता जाता: शिर्षक की शीर्षक ?? ;) नारायण नारायण !!
  • Log in or register to post comments

जाता जाता: शिर्षक की शीर्षक

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 02/07/2012 - 11:04 नवीन
जाता जाता: शिर्षक की शीर्षक ??
तुला लग्न करायचे आहे की नाही ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

___/\____ तुला लग्न करायचे

पियुशा
Tue, 02/07/2012 - 11:12 नवीन
___/\____ तुला लग्न करायचे आहे की नाही ?? ख....ह्.....प......ले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आज्जे

मी-सौरभ
Tue, 02/07/2012 - 10:37 नवीन
साहित्या संमेलन लाईव्ह बघितलस की काय?? त्याचाच परीणाम आहे ना हा??
  • Log in or register to post comments

झक्कास...

चिगो
Tue, 02/07/2012 - 11:05 नवीन
मस्त आहे..
  • Log in or register to post comments

सही, एकदम झक्कास

इरसाल
Tue, 02/07/2012 - 11:14 नवीन
नारदमुनी गिटार आणि स्पोर्ट शूज हा हा हा साधारणपणे असा काहीसा अवतार ....हा यम आहे पण सदृश्य ........ Image removed. आन्जासा
  • Log in or register to post comments

हाहाहा! खूप दिवसांनी रेवतीताई

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/07/2012 - 11:16 नवीन
हाहाहा! खूप दिवसांनी रेवतीताई इन अ‍ॅक्शन! 'जस्ट डू इट' आणि उखाणा एकच नंबर! मजा आली!
  • Log in or register to post comments

+१

राघव
Tue, 02/07/2012 - 14:01 नवीन
:) मस्त लिहिलंय! राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आवडलं नाही

आदिजोशी
Tue, 02/07/2012 - 11:21 नवीन
लिखाणातील विनोदाबद्दल बोलत नाही. हिंदू धर्म कितीही सहिष्णू असला, देवांची चेष्टा केल्याबद्दल घरावर दगड पडत नसले आणि हत्या करायचे फतवे निघत नसले तरी आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही. विनोदी लिखाणासाठी किंवा सहज गंमत म्हणून लिहिण्यासाठी अन्य लाखो विषय आहेत. अवांतरः दशावतारी नाटकं ही वेगळी परंपरा आहे. त्याचा आणि ह्याचा काडीमात्र संबंध नाही.
  • Log in or register to post comments

अभ्यास वाढवा ...

मूकवाचक
Tue, 02/07/2012 - 12:44 नवीन
"आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही" ... आपले देव? विसरा ते आता! उलट विष्णु, लक्ष्मी, नारद वगैरे कुठल्याही ठराविक 'समाजाचे' (पक्षी: जातीचे) नसल्याने या लेखात एकदम निखळ(!) आणि 'सेफ' विनोद आहे. थोडा अभ्यास वाढवा आणि अशा निखळ विनोदाचा मनमुराद आनन्द लुटा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

हिंदू ही जात आहे?

आदिजोशी
Tue, 02/07/2012 - 12:47 नवीन
'समाजाचे' (पक्षी: जातीचे) मी कोणत्या जातीचा उल्लेख केला हे कळेल काय? तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

हम्म

मूकवाचक
Tue, 02/07/2012 - 13:18 नवीन
अभ्यास वाढवा असे उपरोधाने लिहीले होते. त्यातून हिन्दूधर्मीय आपापल्या जातीची दैवते, नेते इ. बद्दल जितके 'सेन्सिटिव्ह' असतात, तितके विष्णु, लक्ष्मी, नारद इ. बद्दल नसतात इतकेच सुचवायचे होते. असो. यात व्यक्तिगत रोख दिसत असल्यास क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

किती वेळा मॉडिफाय कराल !!

सूड
Tue, 02/07/2012 - 13:20 नवीन
किती वेळा मॉडिफाय कराल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

+१ टु आदिजोशी, असलंच जरा इतर

५० फक्त
Tue, 02/07/2012 - 14:15 नवीन
+१ टु आदिजोशी, असलंच जरा इतर धर्मिंय देवतांबद्दल लिहलं तर किती गोंधळ होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कल्याण आहे ऽ!!! अहो रेवती आजी

यकु
Tue, 02/07/2012 - 17:00 नवीन
कल्याण आहे ऽ!!! अहो रेवती आजी कधीतरी सटी सहा महिन्यातून, मोठ्या मुष्‍कीलीनं लिहायला घेतात... आणि त्यात हा छिद्रान्वेष. रेवतीआजी, पुढच्या वेळी लिहीले ना, तर फक्त वाचून काही आक्षेपार्ह नाही हे ठरवण्‍यासाठी Preview टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

@आपणच आपल्या देवांची रेवडी

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/07/2012 - 14:16 नवीन
@आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही.>>> आपल्या धर्मशास्त्रातला विरोधाभास/वेडेपणा/विसंगती इतकी हास्यास्पद आहे,,,की खरंतर अश्या नव्या पद्धतीनं केलेली विषयाची हताळणी किमान देवांना माणसात तरी आणुन सोडते...त्यामुळे माझ्यासारख्यांना असे विनोदीलेखन हे देवांवरच मानवानी उपकार केल्यासमान वाटते...असो..देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा.. :-) @तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.>>> हे मन लाऊन वाचा,,,एकदातरी...प्लीज.. http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

उगाच दिलेला प्रतिसाद

आदिजोशी
Tue, 02/07/2012 - 14:28 नवीन
देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा.. मी सनातन धर्माची पाठराखण कधी केली? एकदातरी...प्लीज.. असं म्हणून जो सावरकरांचा लेख वाचायला दिलात तो आधीच वाचला आहे. तो इथे देण्याचे कारणच कळले नाही. सावरकरांच्या विचारांपैकी ०.०००००१% विचार आणि आचार पाळणं आपल्यातल्या किती लोकांना शक्य आहे ह्याचेही उत्तर द्या. देवांची रेवडी उडवू नये असे म्हणणे म्हणजे सनातन धर्माची पाठराखण करणे असे वाटत असेल तर आनंद आहे. तसेच जे मत मी मांडले आहे ते माझे वैयक्तिक आहे. ते बरोबरच आहे हा अट्टाहास नाही आणि तसे कुणी वागावे हा आग्रहही नाही. मग उगाच का मिरच्या झोंबल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@मग उगाच का मिरच्या

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/07/2012 - 14:33 नवीन
@मग उगाच का मिरच्या झोंबल्या?>>> तुमचं सगळं म्हणणं मान्य...आमचं सगळं मत मागे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

तुमचं सगळं म्हणणं

आदिजोशी
Tue, 02/07/2012 - 14:35 नवीन
तुमचं सगळं म्हणणं मान्य...आमचं सगळं मत मागे...>>>> तुमचा मानभावीपणा भावला. देवधर्म आणि कर्मकांड ह्या विषयीचे माझे विचार इथे (http://adijoshi.blogspot.in/2008/06/blog-post.html) वाचता येतील. माझ्याकडून ह्या विषयावर लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

का उगाच तालिबानी होताय?

शिल्पा ब
Wed, 02/08/2012 - 08:38 नवीन
का उगाच तालिबानी होताय? आम्हाला आमचे देव बिव सगळे आवडतात अन आम्ही त्यांच्याविषयी अशी गंमत केलेली त्याला/तिलाही आवडते असा आमचा समज आहे. ज्यांचा असा समज नसतो ते त्यावरुन दंगली करतात त्यांना आम्ही तालिबानी म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

+१०००००००

पिलीयन रायडर
Sat, 06/25/2016 - 09:07 नवीन
+१००००००० I can freely talk about my religon and that is why Proud Hindu! Revakka as usual rocks!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मनातलं बोललास आदि. जरी अगदी

श्रीरंग
Tue, 02/07/2012 - 14:43 नवीन
मनातलं बोललास आदि. जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

जरी अगदी अपमानास्पद असं काही

इन्दुसुता
गुरुवार, 02/09/2012 - 07:14 नवीन
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं. हिंदू देव हे फक्त सॉफ्ट टार्गेट्स असणे केव्हाच मागे पडले आहे... चपलांवर लक्ष्मीची चित्रे, गणपती विषयी अश्लील वक्तव्ये, हुसेनांची चित्रे या बद्दल तरी समग्र हिंदूंना एकत्र आणू शकतो काय आपण? मी कट्टर हिंदू आहे (आणि असे म्हणताना कोणाच्या बा ची भिती नाही ), पण मूर्तिपूजक नाही. देवाची ( देवता नव्हे ) जी संकल्पना हिंदूंना अपेक्षित आहे, त्यावर वरील विनोदाने काही फरक पडू नये. खेदाची बाब येव्हढीच आहे की ईतर धर्मीय ( ज्यांना त्यांच्या धर्मावर विनोद केलेला चालत नाही) सोकावतात ... म्हातारी गेल्याचे दु:ख नाही हो पण काळ सोकावतो आणि त्यांच्या धर्मांबद्दल काही विनोद करण्यासाठी आपल्या कुणाच्याच पृष्ठ्भागात दम नाही...... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

जरी अगदी अपमानास्पद असं काही

मितभाषी
Sun, 07/31/2016 - 08:30 नवीन
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.
+१ हेच बोलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

१ नंबर !!

कोल्हापुरवाले
Tue, 02/07/2012 - 11:41 नवीन
वाडलेले पोट धरुन हसत आहे !!
  • Log in or register to post comments

हाहाहा मस्त ग ..

प्रीत-मोहर
Tue, 02/07/2012 - 12:07 नवीन
हाहाहा मस्त ग .. :)
  • Log in or register to post comments

उखाणा भारीच !! छान जमले आहे!!

Maharani
Tue, 02/07/2012 - 12:40 नवीन
उखाणा भारीच !! छान जमले आहे!!
  • Log in or register to post comments

ह्हा ह्हा ह्हा....एक नंबर

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/07/2012 - 13:18 नवीन
ह्हा ह्हा ह्हा....एक नंबर झालाय प्ले...सगळ्या देवतांना अंतरजालीय/-इहलौकिकात आणुन सोडल्याबद्दल धन्यवाद... :-)
  • Log in or register to post comments

हा हा हा.. एकदम खुसखुशीत.

गणपा
Tue, 02/07/2012 - 14:47 नवीन
हा हा हा.. एकदम खुसखुशीत.
  • Log in or register to post comments

+१

कुंदन
Tue, 02/07/2012 - 18:43 नवीन
असेच म्हणतो. अवांतर : शिर्षक वरुन सुचले , शुद्धलेखनाचे का औटसोर्स करायचे असेल तर कळवा. आमचे काही मित्र याबाबत तुम्हाला मदत करु शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मज्जा आली गं

यकु
Tue, 02/07/2012 - 14:50 नवीन
मज्जा आली गं रेवतीआज्जे.. ‍अजून लिही.
  • Log in or register to post comments

लेख छान आहे

कपिलमुनी
Tue, 02/07/2012 - 14:50 नवीन
पण विडंबनाचे टारगेट सदैव हिंदु देवता असतात हे बघुन वाईट वाटला .. खरोखर भावना दुखावणे काय असता ते जाणवला .. लिखाण हे निखळ आनंद देणारा असावा .. बाकी माणसाने स्वताच आपल्या धर्माचा अभिमान ठेवला तर इतर ठेवतील ..
  • Log in or register to post comments

हा हा हा...

स्मिता.
Tue, 02/07/2012 - 14:54 नवीन
मस्त! खूप दिवसानी निखळ विनोदी काहितरी वाचलं. जस्ट डू इट आणि विष्णूपंतांच्या नावाने घेतलेला उखाणा क्लास...
  • Log in or register to post comments

हा हा हा!

मेघवेडा
Tue, 02/07/2012 - 15:05 नवीन
हा हा हा! बेष्ट! मात्र घाईघाईत उरकल्यासारखं वाटलं..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा