ट्रू एअर स्पीड, ग्राऊंड स्पीड, सर्किट वगैरे...
:
विमानाच्या वेगाबाबतीत एक फंडा क्लिअर करुन घेऊ. विमानाचा वेग म्हणजे त्याच्या कॉकपिटात दाखवला जाणारा वेग. हा वेग हवेशी रिलेटिव्ह असतो. विमान हवेला मागे ढकलून पुढे जातं.. जमिनीला नव्हे.. त्यामुळे मागे जाणार्या हवेचा स्पीड म्हणा किंवा हवेच्या तुलनेत पुढे सरकणार्या विमानाचा स्पीड म्हणा, हाच विमानाचा स्पीड असतो. त्याला ट्रू एअरस्पीड म्हणतात.
पण आपल्याला प्रवास तर जमिनीवरच्या ठिकाणांमधे करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विमानाचा ग्राउंड स्पीड, अर्थात जमिनीशी रिलेटेड स्पीड काढणं भाग असतं.
समजा मुंबई गोवा एरियल अंतर ६०० किलोमीटर असेल. आणि समजा विमानाचा ट्रू एअर स्पीड ३०० किलोमीटर प्रतितास असेल.
अशा वेळी वारा साफ बंद असेल, तर विमान दोन तासात गोव्याला पोहोचेल. म्हणजे एअरस्पीड आणि ग्राउंड स्पीड एकच असेल.
जर समोरुन शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारा असेल तर ग्राउंड स्पीड (३०० उणे १००) २०० किलोमीटर प्रतितास इतका कमी होईल आणि विमानाला पोचायला तीन तास लागतील. जर पाठीकडून असाच वारा असेल तर विमान ४०० किमी प्रतितास अशा वाढीव ग्राउंडस्पीडने दीड तासातच गोव्याला पोहोचेल.
तसं वर दिलेलं गणित साधंच आहे. प्रत्यक्षात पायलटला प्रत्यक्ष वार्याचा वेग आणि दिशा बघून बरंच गणित करावं लागतं. वारा बरोब्बर समोरुन किंवा पाठीकडून नसतोच. त्याचा विरोध किती होईल त्याप्रमाणे वेग आणि उडण्याचे अँगल बदलले जातात.
विमान वर उचललं जातं ते पंखांवर तयार होणार्या हवेच्या "लिफ्ट"मुळे, एवढं सगळ्यांनाच माहीत असतं. पंख जोरात हवेतून पुढे जातो तेव्हा त्याच्या एरोफॉईल आकारामुळे त्याच्या खालून हवा वर दाब देते. हा दाब विमानाला हवेत उचलून धरण्याएवढा जोरदार हवा असेल तर पंख हा किमान एका वेगाने हवेतून सरकत राहिला पाहिजे. या वेगापेक्षा कमी वेग झाला की लिफ्ट पुरेशी मिळणार नाही आणि पंख (अर्थात विमान) खाली कोसळणार. म्हणजेच "स्टॉल" होणार.
या विमान हवेत राहण्यासाठी आवश्यक अशा किमान वेगाला "स्टॉलिंग स्पीड" म्हणतात. समजा तुमच्या विमानाचा स्टॉलिंग स्पीड दोनशे किलोमीटर प्रतितास आहे, तर फ्लाईटच्या कोणत्याही स्टेजमधे (जमिनीवरील चालणे वगळून) तुम्हाला २०० पेक्षा कमी स्पीड करता येणार नाही.
अर्थात स्टॉलिंग स्पीड हा ट्रू एअरस्पीड असतो. ग्राउंड स्पीड नव्हे. तात्विकदृष्ट्या तुम्ही शून्य ग्राउंडस्पीडमधे आकाशात टिकू शकाल (विमानाच्या एअरस्पीडइतकाच वारा समोरुन येत असेल तर) पण ट्रू एअरस्पीड स्टॉलिंग स्पीडच्या जराही खाली गेला की कपाळमोक्षच.
त्यामुळे विमान फास्ट चालवू नको रे म्हणण्याऐवजी "स्लो नको रे चालवू. मरायचंय का?" असं म्हणावं लागतं.
रनवेच्या भोवती विमान ज्या मार्गाने उडतं त्याला सर्किट पॅटर्न म्हणतात. सर्किट पॅटर्न हा सर्व एअरपोर्टसमधे जवळजवळ सारखाच असतो. एखाद्या एअरपोर्टच्या रनवेची दिशा ठरवताना त्या जागी वारा कसा वाहतो याचं अनेक वर्षांचं रेकॉर्ड पाहतात. विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं.
कारण.. ?
वर म्हटल्याप्रमाणे विमानाचे सर्व स्पीड हे हवेशी रिलेटिव्ह असतात. टेक ऑफसाठी आवश्यक स्पीडसुद्धा..
रनवेची लांबी अर्थातच मर्यादित असते.
त्यामुळे वारा समोरुन येत असला तर ट्रू एअरस्पीडच्या मानाने ग्राउंड स्पीड कमी राहतो आणि रनवेवरची कमी लांबी खर्च होऊन लवकर टेकऑफ होतो. एरवी विमान रनवेच्या दुसर्या टोकाशी जाऊन कदाचित ठोकरग्रस्त झालं असतं.
लँडिंगही याच, पक्षी वार्याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं, कारण समोरुन येणार्या वार्याने लँडिंग झाल्यावर ग्राउंड स्पीड कमी होतो आणि विमान कमी अंतरात थांबतं..
रनवे जरी वार्याच्या हिस्टॉरिक दिशेवरुन बांधत असले, तरी वार्याची दिशा बदलत राहतेच. विशेषतः हवामान खूप बदललं की वार्याची दिशा उलटही होते. अशावेळी रनवे तर हलवता येत नाही.. मग टेकॉफ आणि लँडिंगची दिशा उलटी केली जाते.
मुंबईवासी विमानप्रवाशांनी किंवा नागरिकांनी खूपदा पाहिलं असेल की बर्याचवेळा घाटकोपरकडून लँडिंग करणारी आणि टेकॉफनंतर जुहू चौपाटीवर वर चढताना दिसणारी विमानं अचानक दिशा बदलून चौपाटीच्या दिशेने उलट लँडिंग करायला खाली येऊ लागतात. आणि टेकॉफनंतर ती जुहू ऐवजी घाटकोपर कुर्ल्यावर दिसतात. यालाच रनवे बदलला असं म्हणतात. मुंबई कंट्रोल टॉवर सर्व विमानांना "रनवे इन यूज" अशा नावाखाली नेहमीच याक्षणी कोणत्या बाजूने रनवे वापरात आहे हे सांगत असते.
आता सर्किट पॅटर्न पाहू..
इथे मी लेफ्ट साईडेड सर्किट पॅटर्न दाखवला आहे. २७ आणि ०९ हे रनवे नंबर्स आहेत. रनवे नंबर म्हणजे त्या रनवेचं तोंड ज्या बाजूला आहे ती दिशा. २७० डिग्री म्हणजे पश्चिम दिशा. त्यातलं शेवटचं शून्य काढून पहिले दोन आकडे वापरले जातात. त्याचप्रमाणे ०९ म्हणजे ९० डिग्री, अर्थात पूर्व दिशा.
या सर्किट पॅटर्नमधे आपण ०९ रनवे वापरुन सर्किट पॅटर्न दाखवला आहे. पूर्वेला तोंड करुन टेकऑफ घेतला जातो. टेकॉफनंतर नाकासमोर वर चढत जाण्याच्या भागाला अपविंड लेग म्हणतात.
अपविंड लेगमधून सरळ नाकासमोर एक्झिट घेऊन ठराविक उंची गाठायची आणि मग आपल्या गन्तव्यस्थानाची दिशा सेट करुन तिकडे तोंड वळवायचं, अशी एक एक्झिटची पद्धत आहे. किंवा मग काही ठिकाणी वर चढताचढताच डावीकडे वळून क्रॉसविंड लेग ही रेषा जॉईन केली जाते. क्रॉसविंड लेगमधून डावीकडे ४५ डिग्रीत एक्झिट घेण्याचा आणखी एक प्रकार आहे.
आता एक पूर्ण सर्किट करुन पाहूया.. अशी एकामागून एक सर्किट्स उड्डाण शिकताना केली जातात. त्यामुळे टेकॉफ आणि लँडिंगसहित सर्वच प्रकारची उत्तम प्रॅक्टिस होते.
टेकऑफ घेतला.. अपविंडमधे एक हजार फुटापर्यंत वर चढत गेलो. मग काटकोनात पण स्मूथ असं डावीकडे वळण घेतलं. क्रॉसविंड जॉईन केला.. दोन हजार फुटांची उंची गाठली. पुन्हा डावं वळण घेऊन रनवेला समांतर पण उलट दिशेत प्रवास सुरु केला. दोन हजार फुटांवर इंजिन पॉवर अॅड्जस्ट करुन विमान स्थिर केलं. आता रनवे आपल्या डाव्या हाताला दिसतोय. इथे आपण कंट्रोल टॉवरला रेडिओवर सांगतो. उदा. "पुणे, व्हिक्टर किलो अल्फा ऑन लेफ्ट डाउनविंड जीरो नाईन.." म्हणजेच अहो पुणे टॉवरवाले काका, मी रनवे ०९ च्या डाव्या डाउनविंड लेगमधे आहे.
टॉवर आपल्याला सांगतो:" व्हि़क्टर किलो अल्फा, पुणे... रिपोर्ट ऑन फायनल्स.."
म्हणजे जेव्हा फायनल लेगला पोचाल तेव्हा सांगा.
डाउनविंड लेगमधे आपण रनवे पार करुन थोडे पुढे गेलो की साधारण आपल्याला रनवेचं ०९ टोक "एट ओ क्लॉक" पोझिशनमधे दिसायला लागतं, असा एक पॉईंट येतो. या ठिकाणी पुन्हा स्मूथली डावं वळण घ्यायचं. याच सुमारास इंजिन पॉवर आयडल किंवा बंद करायची. त्यामुळे विमान खाली उतरायला लागतं.
उतरत उतरत आणि वळत वळत क्रॉसविंडच्या उलट दिशेत असलेल्या "बेस लेग" नावाच्या रेषेला जॉईन व्हायचं.
बेस लेगला काटकोनात असलेला लेग म्हणजे फायनल लेग. उतरणं चालूच आहे. फायनल लेगमधे आलात की दूर रनवे तुमच्या नाकासमोर दिसेल. रनवेच्या सेंटरलाईनशी विमानाचं नाक लावून धरत उतरणं चालू ठेवायचं. गरजेनुसार उतरण्याचा रेट वाढवायचा. रनवेचा आकडा हे आपलं टचडाऊन करण्याचं टारगेट असलं पाहिजे. त्याच्या आधी टच केलं तर अंडरशूट झालात, म्हणजे दगडधोंड्यात थेट घुसलात..
त्या टार्गेटच्या पुढे गेलात तर ओव्हरशूट..मग टचडाऊन झाल्यावर रनवेची उरलेली लांबी तुम्हाला पुरणार नाही.
अशा दोन्ही वेळी लँडिंग म्हणजे क्रॅशच.. (मेंगलोर क्रॅश ओव्हरशूटमुळे झाला होता..)
फायनलवर आल्यावर पुन्हा टॉवरला सांगायचं की मी फायनलवर आहे. मग तो तुम्हाला लँडिंग क्लियरन्स देईल आणि लँडिंगसाठी उपयोगी आकडेरुपी माहितीही देईल..
टचडाऊन केलंत की थोडं पुढे जाऊन टॅक्सीवेवर विमान वळवा आणि एप्रनमधे पार्क करा, किंवा परत सलग टेकऑफ घेऊन आणखी सर्किट करा.
जर बाहेरुन प्रवास करुन या विमानतळावर येत असलात तर जनरली डाउनविंड लेगमधे ४५ डिग्रीमधे जॉईन व्हायचं असतं. बाकी पुढे तसंच.
रनवेची दिशा बदलली की लेफ्ट साईडेड पॅटर्न राईट बनू शकतो...
....................
ओव्हर..

याद्या
18847
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
एक शंका. वारा २०० किमी वेगाने
शंकेची उत्तरे
In reply to एक शंका. वारा २०० किमी वेगाने by विजुभाऊ
Nile
In reply to एक शंका. वारा २०० किमी वेगाने by विजुभाऊ
मला ऑफिसच्या पार्किंग मध्ये
अरे राम! तुझा हा प्रतिसाद
In reply to मला ऑफिसच्या पार्किंग मध्ये by ५० फक्त
आवडत आहे.
पुस्तकी
In reply to आवडत आहे. by विसुनाना
याही भागात एकदम इण्टरेस्टिंग
हा प्रतिसाद ना चुकलाच, हा
In reply to याही भागात एकदम इण्टरेस्टिंग by मी ऋचा
सोप्पय एकदम. च्यायला उगाच
ओ गविभाऊ,
सोमवार म्हणजे गविवार मस्त
In reply to ओ गविभाऊ, by मिसळपाव
नेहमीच्या घाईने लेख वाचला...
आवडले
+१
In reply to आवडले by स्मिता.
समोरच्याशेजारची वर इंप्रेशन मारता येईलआता विमानात बसलो की कोणत्या
In reply to +१ by ऋषिकेश
मस्त लेखन! भारी वाटलं. कधीकधी
कॉपीड
मस्त लेख
तुम्ही म्हणता त्यामधे
In reply to मस्त लेख by योगी९००
>>लँडिंग आणि टेकॉफ
In reply to तुम्ही म्हणता त्यामधे by गवि
मी मुंबई विमानतळावर फ्लाईट
In reply to >>लँडिंग आणि टेकॉफ by नितिन थत्ते
पाऊण तास एकदाच डिले झालेला
In reply to मी मुंबई विमानतळावर फ्लाईट by गवि
मोबाईल सिग्नलमुळे तसा काही
In reply to पाऊण तास एकदाच डिले झालेला by रेवती
उत्तराबद्दल धन्यवाद!
In reply to मोबाईल सिग्नलमुळे तसा काही by गवि
अद्भूत....
छान
गविभौ,
प्रतिसादास
मस्त
आम्हाला नविन माहीती मिळाली.
आनखीन येउद्यात !!!
माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक
सहमत आहे.
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक by पिवळा डांबिस
+२
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक by पिवळा डांबिस
+३
In reply to +२ by नंदन
सहीच आहे... वाचुन हिथ्रो
थरारक माहीती मिळाली
In reply to सहीच आहे... वाचुन हिथ्रो by अंतु बर्वा
विमानांची कमी वेळातली उड्डाणे
In reply to सहीच आहे... वाचुन हिथ्रो by अंतु बर्वा
आयला असं आहे होय??
In reply to सहीच आहे... वाचुन हिथ्रो by अंतु बर्वा
लेखांक आवडला
अप्रतीम...
माहितीपूर्ण लेखमालिका !
+१००
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका ! by रामदास
हवाई सुंदर्यांबद्दलही चार
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका ! by रामदास
मस्त !!!
मस्त!
स्टॉलिंग स्पीड
एक शंका : पूर्व दिशेला ९०
०००, ०९०, १८०, २७० असे तीन
In reply to एक शंका : पूर्व दिशेला ९० by बिपिन कार्यकर्ते
वोगे!
In reply to ०००, ०९०, १८०, २७० असे तीन by गवि
जबरी.
मस्त माहिती
कपिलमुनी, तुम्ही आज धागा
In reply to मस्त माहिती by कपिलमुनी
उदाहरण आणि माहितीसाठी..
भयानक.
भयानक अपघात,या अपघातात,