नमस्कार मंडळी,
तयार आहात ना जल्लोशाला ?
तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ?
तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ?
तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ?
काय म्हणता ?
कशाची तयारी करायची ?
अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे. जगातले दिग्गज खेळाडु, चाणक्याची कुटिल रणनितीने समोरच्या संघाचे मनोधैर्य नेस्तनाबुत करणारे अनुभवी दिग्गज प्रशिक्षक आणि त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो पाठिराखे इथे डेरेदाखल होत आहेत.
निमित्त आहे ..... आयसीसी विश्वचषक २०११ !!!

मग झाली का तुमची तयारी ?
सुट्ट्यांचे प्लानिंग केले असेलच, काही उत्साहींनी आपल्या 'मेन इन ब्ल्यु' संघाच्या जर्सीजही मागवल्या असतील, कुठे आणि कुणाबरोबर बसायचे आणि सामना एंजॉय करायचा ह्याचे प्लानिंगही झाले असेल.
अहो एक ना दोन अशा हजारो गोष्टी आहेत, सगळ्यांचे सेटिंग करायचे आहे, वेळ कमी आणि कामे ढीगभर राहिली आहेत, काहीही झाले तरी ह्या विश्वचषक जल्लोश आणि उन्माद अनुभवायचाच आहे.
बरोबर ना ?
तुमचेही अगदी हेच मत असेल तर तुमचे आमच्या क्लबात स्वागत आहे, आम्ही अगदी तुमच्याच शोधात होतो.
आम्हाला हवे आहेत अगदी तुमच्यासारखेच निस्सिन क्रिकेटवेडे आणि 'मेन इन ब्ल्युज' चे खंदे समर्थक.
कारण ....
हेच क्रिकेटचे महायुद्ध इथे मिपावर आपल्याला इथल्या मराठी रसिकांसाठी खास मराठीतुन सादर करायचे आहे, भले अनेक दिग्गज वेबसाईट्स, न्युज चॅनेल्स, प्रिंट मिडिया आपापल्या पद्धतीने हे सर्व कव्हर करणार असतील, करु द्यात त्यांना, पण इथे आपल्याला आपल्या ढंगात, आपल्य मस्तीत आणि आपल्या शैलीत हा 'क्रिकेट महोत्सव' साजरा करायचा आहे.
ह्यापुर्वी आपण साजरा केलेल्या 'फिफा फुटबॉल विश्वचषक-२०१०' चा अनुभव आणि त्यातुन मिळालेले गुंजभर शहाणपण आपल्या सोबत आहेच. पण ह्यावेळी आपला प्लसपॉइन्ट आहे तो तुमच्यासारखे क्रिकेटला धर्म मानणारे क्रिकेटचे निस्सीम चहाते, अहो तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर काय अशक्य आहे ?
आपण इथे काय करणार आहोत ?
१. अहो इथे तुम्हाला ह्या घनघोर युद्धातल्या प्रत्येक संघाची अगदी हटके शैलीत ओळख करुन दिली जाईल, त्यांचे खंदे वीर, बलस्थाने आणि कच्चेदुवे ह्यावर घनघोर चर्चा केली जाईल.
२. प्रत्येक गटाची बळाच्या तोलामोलाची चवीने चर्चा केली जाईल.
३. महत्वाच्या आणि रंगलेल्या सामन्यांचे इथे आपल्या शैलीत विश्लेषण सादर केले जाईल, फोटोफिनिश दिले जाईल.
४. जर-तर च्या अफाट चर्चा बेभानपणे रंगतील.
५. गुणतक्ता, क्रमवारी, सांख्यिकी अगदी अवघे अवघे इथे सादर होईल.
६. सर्वात महत्वाचे, इथे ह्या जल्लोशात 'तुम्ही' असणार आहात, इथे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जल्लोश केला जाईल, अहो खेळ आपला तर त्याचा जल्लोश आपल्या पद्धतीने नको का ?
मग आहात ना तुम्ही आमच्याबरोबर ?
तुमच्या सहभागाने ही मैफिल अजुन रंगीन होईल व त्यात अजुन मजेदार गहिरे रंग भरले जातिल हा आमचा विश्वास आणि अनुभव आहे ...
नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत गतवेळचे तज्ज्ञ, ज्ञानी आणि निपुण क्रिडामित्र, आपल्यासोबत आहे त्यांचा अनुभव आणि त्यांची क्रिकेटवरची भक्ती, आपल्यासोबत आहे इतर मान्यवरांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या आपल्याकडुन असलेल्या अपेक्षांचा डोंगर.
तर मग लागा तयारीला, येऊ देत तुमच्या कल्पना, कळवा तुमचा सहभाग आम्हाला, होऊ ह्यात मिपाचा हा क्रिकेट महोत्सव एकदम दणक्यात आणि जोशात !!!
येऊदेत तुमच्या सहभागाची सुचना आम्हाला, तुमच्याही रसिकतेची पेशकश मिपावर होऊद्यात ....
चला, साजरा करुयात 'मिपा - क्रिकेट विश्वचषक २०१ १ महासंग्राम' खास आपल्या शैलीत, आपल्या मस्तीत आणि आपल्या सहभागाने !!!!
टीप :
१. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया आपला सहभाग मला 'व्यनीने' कळवावा, सोबत तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे ह्याचे थोडक्यात स्पष्टीकरण असावे.
२. माझे आणि इतर संबंधितांचे सध्या बॅकराउंडला ह्या सदरासंबंधीत इतर काम चालु आहे, आपल्या सुचना, आपले सल्ले आणि आपला अनुभव आम्हाला निश्चितच मोलाचा आहे.
३. आम्हाला नुसते टेक्निकल हवे आहे असे अजिबात नाही, तुम्ही अगदी जनरल जल्लोशाबद्दलही लिहु शकता. ऑफिसात, घरात, रस्त्यावर, क्लबात, पबात किंवा कुठेही अनुभवलेल्य रोमांचात तुम्हाला आम्हाला सामिल करुन घ्यायचे असेल तर तुमचेही स्वागत आहे.
बाकी सगळेच इथे देणे शक्य नाही, जशा जशा गोष्टी पुढे सरकतील तशी भर घालत जाऊ ...
चला, पटकन तुमचा सहभाग आणि सुचना / सल्ले / सुचवण्या कळवा, अहो हा तुमचाच महोत्सव आहे आणि तो तुमच्याच श्टायलीत झाला पाहिजे, नै का ? :)
तळटीप :
जे मिपावर नविन आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुर्वी केलेल्या 'फिफा विश्वचषक २०१०' स्पर्धेच्या जल्लोशाची लिंक खाली देत आहे, त्यावरुन तुम्हाला ह्या महोत्सवाची जराशी कल्पना येईल ...
https://www.misalpav.com/tracker?page=1&title=&uid_touch=&type_1=fifa20…
धन्यवाद !!!
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम संकल्पना व्यनी केला
उत्तम संकल्पना :)
व्यनी केला आहे.
+१
In reply to उत्तम संकल्पना व्यनी केला by परिकथेतील राजकुमार
+१
व्यनि केला आहे!!!
--असुर
+२
In reply to +१ by असुर
मिपा वर पुन्हा एकदा धुमधडाका होऊन जाऊन द्या ... आपण तर च्यामायला फुल धिंगाणाच घालणार ;)
क्रिकेट झिंदाबाद :) मिसळपाव झिंदाबाद डाणराव पण झिंदाबाद
+ १००
In reply to +२ by टारझन
लई भारी.. व्यनी केला आहे.. होऊन जाऊ द्या...
वेळेवर आला धागा ...
स्वागत आहे. व्यनी टाकला आहे.
ए धात्ताड तत्ताड धात्ताड
ए धात्ताड तत्ताड धात्ताड तत्ताड धात्ताड तत्ताड !!!!!!
निस्ता हंगामा
टाईम टेबल ची एक जबऱ्या लिंक
टाईम टेबल ची एक जबऱ्या लिंक
https://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
बेटींगची काय सोय?
बेटींगची काय सोय?
:)
In reply to बेटींगची काय सोय? by अवलिया
समस्या सांगु नका, समस्येवरचे उपाय सांगा.
त्या उपायांचाच आम्हाला जास्त उपयोग होईल ...
नान्या, तुला नक्की समजतो आहे हां !
- छोटा डॉन
http://www.centrebet.com/ htt
In reply to बेटींगची काय सोय? by अवलिया
https://www.centrebet.com/
https://www.cricket-worldcup.net/
ह्या घ्या आणि कर दंगा :) कायदेशीर दंगा करा.
डान्या अजुन काही संघांची घोषणा व्हायची आहे. ती आज उद्यात झाली की देतो तुला एक फर्मास लेख.
नक्की का?
नक्की का?
चिअर गर्ल्स हव्या असतिलच
चिअर गर्ल्स हव्या असतिलच :|
ह्या नेने काकुंना एक फार
In reply to चिअर गर्ल्स हव्या असतिलच by पर्नल नेने मराठे
ह्या नेने काकुंना एक फार शंका.
असो...
बिका मी वायदेआझम नाही ;)
तुझ्याबद्दल शंका नाहीच रे! तो
In reply to ह्या नेने काकुंना एक फार by परिकथेतील राजकुमार
तुझ्याबद्दल शंका नाहीच रे! तो प्रश्न डन्रावांना होता.
ओके, हे पहा ...
In reply to तुझ्याबद्दल शंका नाहीच रे! तो by बिपिन कार्यकर्ते
ओके बिपिनदा, जरा हे पहा ...
संदर्भ : https://www.misalpav.com/node/12696#comment-203050
बाकी असो.
- (
वायदेआझम) छोटा डॉनमज्जा मज्जा...!!! बाकी आम्ही
मज्जा मज्जा...!!!
बाकी आम्ही काय करू शकतो याची आम्हासच खात्री नसल्याने... सद्ध्या तरी चर्चांमध्ये प्रतीसादांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू एवढेच काय ते सांगतो.
वाह मस्तच!!
सक्रीय पाठिंबा.. व्यनी पाठवला आहे
चांगला धागा.
सहभाग घेणार.
य्ये धम्माल नुस्ती
जल्लोषाची वाट बघतोय...
जमेल तसे, जमेल तेव्हा हातभार लावूच
जियो !!
जियो डॉनराव .. मस्त आहे बेत !!
छक्के मारायला आहोतच आम्ही,
छक्के मारायला आहोतच आम्ही, तुम्ही बोलींग करत रहा म्हणजे झालं.
:)
ते फुटबॉल हारलेलं मेवे प्रभो पब्लिक कुठाय?
आवडलेल्या सामन्याबद्दल जमेल तसे व जमेल तितके लिहायला आवडेल!
आवडलेल्या सामन्याबद्दल आणि कांहीं Facts & figuresबद्दल जमेल तसे आणि जमेल तितके लिहायला आवडेल!
व्यनि पाठविला आहे.
फीफाच्या वाका वाका च्या धरतीवर आयसीसीचे झाका झाका
असे चीयर्स गर्ल असलेले गीत प्रक्षेपीत होणार आहे काय ?
झाका नको...
In reply to फीफाच्या वाका वाका च्या धरतीवर आयसीसीचे झाका झाका by आत्मशून्य
वाका वाका च पाहिजे ते पण मराठी 'वाका'
शुभेच्छा..
आम्ही ...
बस्स मज्जा नी लाईफ
येक नवम्बर काम हाय बघा !!!
येक नवम्बर काम हाय बघा !!! कार्यक्रम
भारीच.. पाहातो...मजा येणार..
भारीच..
पाहातो...मजा येणार..
http://www.crictime.com/ ह्या
https://www.crictime.com/
ह्या साईट वर हमखास क्रिकेट चे सामने आपण लाइव पाहू शकतो .
मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक
मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक २०११ संदर्भात काही लिखाण केले आहे, ते मी इथे पोस्ट करु शकतो का? आणि ते नविन लिखाणामध्ये लिहायला हवे की अजुन दुसरीकडे कुठे?
गौरव व्यवहारे
स्वागत आहे ...
In reply to मी माझ्या ब्लॉग वर विश्वचषक by गौरव व्यवहारे
नमस्कार,
तुमच्या ब्लॉगवरच्या लिखाणाचे इथे मिपावर स्वागत आहे.
ते इथे पोस्ट करण्यास अजिबात हरकत नाही, उलट आपले लिखाण मिपा-क्रिकेट सदर समृद्ध करेल अशा विश्वास आहे.
तुर्तास सध्या तो विभाग बनवण्याचे काम चालु आहे, १-२ दिवसात शक्यतो तो सर्वांना उपलब्ध करुन देण्याचे प्लानिंग आहे.
तोवर कृपया आपण वाट पहावी.
एकदा हा विभाग सुरु झाला की आपले लिखाण डायरेक्ट त्या नव्या विभागातच पोस्ट करावे.
बाकी मी आपल्याला व्यक्तिगत निरोपातुन संपर्क साधेनच :)
आपले स्वागत आहे :)
- छोटा डॉन
मस्त रे छोटा डॉन. वाचत
मस्त रे छोटा डॉन. वाचत राहीन. प्रतिसाद डकवित राहीन.
>>> मग आहात ना तुम्ही आमच्याबरोबर ?
आरं नक्की...!
-दिलीप बिरुटे
[भारतीय संघाचा कट्टर समर्थक]