चित्र उपलब्ध नाही
आज कॉफी पिताना वाटले की चला कॉफीचा कप कॉफी संपल्यावर कसा दिसतो ते टिपून ठेवावे.
आपल्याल कप कसा वाटला ते जरूर सांगा.
कॅमेरा : निकॉन कूलपिक्स एस ४
समय : रात्र. फोटोत फ्लॅश वापरावा लागला.
ऍपरचर शटरस्पीड कुठे कळतो? माझ्या कॅमेर्यात ती सोय दिसत नाही.
फोटो टाकणे या प्रकाराचे विडंबन कसे करावे याचा विचार करताना हे सुचले. कसे वाटले? सर्वांनी ह.घ्यावे.
--लिखाळ :)
वाचने
14382
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणीतरी वाचणार आता हा कप
कपातून कॉफी प्यायला देऊन नंतर रिकाम्या कपात राहिलेल्या डागांवरून आणि थेंबांवरून भविष्य सांगण्याची पुरातन पद्धत आहे. बहुधा ग्रीस आणि आजूबाजूंच्या देशांत. ;) आता इथले ज्योतिषी सुरू झाले नाहीत म्हणजे मिळवली. ;)
मी फक्त एवढंच सांगू शकते की कॉफी उत्तम झाली असावी आणि आनंदाने गट्ट केलेली असावी.
खरे आहे
In reply to कोणीतरी वाचणार आता हा कप by प्रियाली
>>मी फक्त एवढंच सांगू शकते की कॉफी उत्तम झाली असावी आणि आनंदाने गट्ट केलेली असावी.
खरे आहे :)
पण अनेकदा वर्तमानस्थिती आणि साधारण भूतकाळ बरोबर आला की आमच्या त्या ज्योतिषावर प्रचंड विश्वास बसतो. हा..भविष्य थोडे किंवा फारच चुकले तर चालुन जाते..माणूस आहे चुका होणारच :)
-- (जातक) लिखाळ.
पुढल्या दोन वर्षात परदेशवारीचा योग आहे ! तुम्ही प्रयत्न केलेत तर होउन जाईल..पण त्यानंतर योग दिसत नाही. अश्या भोंगळ विधानांनी त्रस्त.
रसग्रहण: रंगसंगती
पिऊन झाल्यावर कपाला चिकटून उरलेल्या (सायमिश्रित) कॉफीची आणि टेबलाच्या/लाकडी फ्लोअरिंगच्या (नेमकं काय?) उडालेल्या पॉलिशची रंगसंगती छान जमलीय.
विडंबन
विडंबनाची कल्पना आवडली. पुढल्या वेळेस जमल्यास चरणार्या डुकरांचा क्लोज़अप व्हिडियो (आवाजांसकट) अपलोड करता आला तर पहावा म्हणतो... (कॅमेरा कुठला ते घरी जाऊन पहावं लागेल. बहुधा कॅनन ए७५० की ए५७० की असंच काहीतरी...)
वा वा
In reply to विडंबन by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
आभार ! आणि वाट पाहतोय...
रंगसंगती वगैरे
मुद्दे चांगले आहेत. रंगसंगती महत्त्वाची याबद्दल टग्या यांच्याशी सहमत.

आणखी काही चित्रे:
यातील रंगसंगतीही खासच :
चित्र उपलब्ध नाही
हे पुढील चित्र तर विक्रीसाठी ठेवले आहे!
यातून पैसेही मिळू शकतात तर!
**(सीरियसली - वरील पहिले चित्र फारच चांगले काढलेले आहे, विडंबनातही फोटोग्राफरची सफाई दिसते.)**
हॉट अँड कोल्ड...
In reply to रंगसंगती वगैरे by धनंजय
पहिले चित्र हॉट कलर स्कीमचे उत्कृष्ट उदाहरण आहे, तर दुसरे चित्र हॉट कलर स्कीम आणि कोल्ड कलर स्कीम एकाच चित्रात एकत्र नांदू शकतात हे उत्तमरीत्या दर्शवून देते.
नॉट एव्हरीवन्स कप ऑफ कॉफी
फोटोग्राफी इज नॉट एव्हरीवन्स कप ऑफ कॉफी, असे यातून सुचवायचे नाही ना? :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उलट...
In reply to नॉट एव्हरीवन्स कप ऑफ कॉफी by नंदन
इट सीम्स टू बी इन्डीड एवरीवन्स कप ऑप कॉफी असं सुचवायचं असावं असं वाटतंय.
म्हणजे आपला जो तो येतो, इथे उठसूट फोटो चिकटवतो...
जरा मजा
In reply to उलट... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
जरा मजा हो..
काही कल्पना
फोटोंच्या विडंबनासाठी काही कल्पना
१. झिजलेली चप्पल
२. शिंकताना वाकडा झालेला चेहरा
३. जांभई देताना उघडलेला जबडा
४. घरातला कचर्याचा डब्बा
५. महिने न महिने न धुतलेला कमोड (अनेक बॅचलरांकडे असण्याची शक्यता आहे ;))
ही राहिली...
In reply to काही कल्पना by प्रियाली
६. केस रंगवल्यावर शॉवरमध्ये होणारी अभावित चित्रकला. (बॅचलर असण्याची अट नाही. [रंगवणारा/रीस] केस असणं आवश्यक. ;))
७. नाकपुडीच्या अंतर्भागाचा खालून वरती अशा अँगलमध्ये कॅमेरा धरून क्लोज़अप.
८. (व्हिडिओसाठी) जेवत असताना बाकीचा चेहरा वगळून केवळ तोंडाचा क्लोज़अप.
ट्युबलाईट
In reply to ही राहिली... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
९. केस नसलेल्या चकचकीत टाळक्यावर परावर्तीत झालेली कोणतीही वस्तू. ;) (खरंतर हा अवॉर्डविनिंग फोटो व्हायला हरकत नाही) ;)
हा हा
In reply to ट्युबलाईट by प्रियाली
असाच विचार करता वरचा फोटो निघाला :)
बाकी टकलावर परावर्तीत झालेल्या वस्तूच्या फोटोला बक्षिस मिळेल हा अंदाज खरा वाटतो :)
--लिखाळ.
नाकपुड्या
In reply to ही राहिली... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
हा (आतापर्यंत उडवला नसल्यास) माझ्या संग्रही सापडण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. बहुधा दोन ते तीन वर्षे जुना असावा. छायाचित्रकाराचे वय (फोटो घेतेवेळी) तीन ते चार वर्षे. कॅप्शन: 'अ सायलेंट जर्नी थ्रू डॅडीज़ नॉस्ट्रिल्स'. कॅमेरा: कोडॅक पी-८५० किंवा असाच काहीतरी. सेटिंग्ज: हाताला येतील ती.
:)
In reply to नाकपुड्या by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
:) आणखी काही संदर्भ व्यनिने पाठवितो.
रहस्यकथा...
रहस्यकथेसाठी मुखपृष्ठावरील छायाचित्र म्हणून उत्कृष्ट आहे. (पार्श्वभूमी ही रंग उडालेले टेबल नसून रंग उडालेले लाकडी फ्लोअरिंग आहे याची भरपूर वेळ नीट निरीक्षण केले असता खात्री पटावी.) प्लॉटमध्ये कोणीतरी कोणालातरी कॉफीत विष घालून मारणे हे ओघानेच आले. ज्याअर्थी पिणाराची कॉफी संपूर्ण पिऊन झाली आहे त्याअर्थी विष रक्तात हळूहळू भिनणारे आहे. म्हणजे सायनाइड नसावे. (नेमके काय असावे ते कधी कोणाला कॉफीतून विष घालून मारले नसल्यामुळे मला सांगता येणार नाही. तज्ज्ञांनी माहितीत भर घालावी.) मुडदा कपाशेजारी पडलेला नाही. याचा अर्थ कॉफी पिऊन झाल्यावर बर्याच अवधीनंतर व्हिक्टिमास ('व्हिक्टिम'साठी इथे फिट्ट बसेल असा मराठी प्रतिशब्द काय?) मृत्यू आला असावा. ही आत्महत्या असावी की खून? आत्महत्या नसावी. कारण आत्महत्या असती तर कप असा जमिनीवर पडून राहिला नसता. मृताने तो कॉफी पिऊन झाल्यावर स्वयंपाकघरातील सिंकात किंवा डिशवॉशरमध्ये जाऊन नीट ठेवला असता. निश्चितपणे खूनच झाला आहे. व्हिक्टिम हा आरामात दिवाणखान्यात किंवा स्वयंपाकघरातील ब्रेकफास्ट एरियात (पण लाकडी फ्लोअरिंग आहे त्याअर्थी दिवाणखान्यापेक्षा स्वयंपाकघरातील ब्रेकफास्ट एरिया असण्याची शक्यता अधिक. दिवाणखाना असता तर कार्पेट असण्याची शक्यता ५०-५०.) जमिनीवर आडवा होऊन कॉफी पीत असावा. कॉफी नुकतीच संपली असावी, आणि अचानक मळमळल्यामुळे वांती काढण्यासाठी कप जमिनीवर तसाच टाकून तो तातडीने बाथरूममध्ये पळाला असावा, आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला असावा. (बाथरूमचा नीट शोध घेतल्यास मृतदेह तेथेच सापडावा.)
ज्याअर्थी ही आत्महत्या नाही, त्याअर्थी ती कॉफी त्याला कोणीतरी बनवून दिलेली असावी. याचा अर्थ तो एकटा राहत नसावा. मात्र तो विवाहितही नसावा, कारण त्याची बायको त्याला असे जमिनीवर पहुडून कॉफी पिऊन देणे केवळ अशक्य! म्हणजे बहुधा रूममेटबरोबर राहत असावा, आणि रूममेटनेच त्याला कॉफी बनवून दिली असावी. मात्र मृत्यूनंतर लगेचच कोणीतरी येत आहे असे वाटल्यामुळे रूममेटला पळ काढावा लागला असावा. कारण कॉफीचा कप जागचा हलवून त्याची विल्हेवाट लावण्याइतकाही वेळ त्याला मिळालेला दिसत नाही. म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट तर निश्चितच लावता आलेली नाही. मृतदेह खात्रीने बाथरूममध्येच सापडावा!
खुनाचे कारण (मोटिव्ह) पैसा हे निश्चित नसावे. कारण ज्याअर्थी १. मृत हा बॅचलर होता आणि २. त्याला रूममेट घेऊन राहण्याची गरज भासत होती त्याअर्थी आणि ३. एकंदरीतच फ्लोअरिंगची अवस्था पाहता तो सधन नसावा. बहुधा प्रेमाचा त्रिकोण असावा असा कयास करायला हरकत नसावी. (अशा प्रकारच्या रहस्यकथांत बहुधा पैसा नसला तर प्रेमाचा त्रिकोण हेच कारण बहुतांशी असावे असा अंदाज आहे. खूप रहस्यकथा वाचलेल्या नसल्यामुळे खात्रीने सांगता येत नाही, त्यामुळे यावर एक्सपर्ट कॉमेंट्स इतर सूत्रांकडून येतीलच. पण एखाद्या हेरगिरीच्या प्रकरणातून वगैरे रुममेटने काटा काढण्याइतका मृत किंवा त्याचा रूममेट चित्रावरून तरी ग्लॅमरस वाटत नाही. असता तर कॉफीच्या कपाऐवजी व्हिस्कीचा पेला आणि एखाद्या बर्यापैकी ऍशट्रेवर एखादा अर्धाजळका चिरूट नसता पडला? तेव्हा प्रेमाचा त्रिकोण असण्याचीच शक्यता अधिक. या अँगलवर अधिक संशोधन केल्यास बहुधा लीड्स मिळावेत.) एलेमेंटरी!
प्रेमाच्या त्रिकोणाच्या तिसर्या कोनामध्ये पट्टीच्या डिटेक्टिवांस काडीचेही स्वारस्य नसावे.
रहस्यकथेचे शीर्षक काय असावे? 'कॉफीच्या पेल्यातील वादळ'? 'रिकाम्या पेल्याचे रहस्य'? 'विषाची परीक्षा'? की आणखी काहीतरी? सूचना आणि निविदा मागवण्यात येत आहेत.
'व्हिक्टिम'
In reply to रहस्यकथा... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
'व्हिक्टिम'साठी इथे फिट्ट बसेल असा मराठी प्रतिशब्द काय?
'जातक' हा शब्द कसा वाटतो??? ;)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
हा हा हा
In reply to 'व्हिक्टिम' by घाटावरचे भट
रहस्यकथा मस्तच ! :)
व्हिकटिम = जातक
जोरदार.. (हशा आणि टाळ्या)
--लिखाळ.
जातक व ज्योतिषी
In reply to हा हा हा by लिखाळ
पुण्यात पुर्वी एका ज्योतिषाचा खुन झाला होता. असाच हॉटेल मध्ये खोली घेउन तो ज्योतिषाचा धंदा करायचा. काही तरी कारणाने त्याची आन जातकाची बाचाबाची झाली असावी त्यातुन त्याचा खुन झाला. इथे व्हिक्टिम ज्योतिषी झाला.
प्रकाश घाटपांडे
हा हा
In reply to रहस्यकथा... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा!
टग्या, रहस्यकथेचा प्रतिसाद लै भारी रे! :)
आपला,
(००७) तात्या.
कारण
In reply to रहस्यकथा... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
ज्याअर्थी पिणाराची कॉफी संपूर्ण पिऊन झाली आहे त्याअर्थी विष रक्तात हळूहळू भिनणारे आहे. म्हणजे सायनाइड नसावे. (नेमके काय असावे ते कधी कोणाला कॉफीतून विष घालून मारले नसल्यामुळे मला सांगता येणार नाही. तज्ज्ञांनी माहितीत भर घालावी.)
विष बहुधा साखर / स्वीटनर मध्ये असावे. ज्याअर्थी जवळपास चमचा दिसत नाही, म्हणजेच साखर / स्वीटनर कॉफीत विरघळले गेले नव्हते. शेवटी चाखल्यावर व्हिक्टीमचा मृत्यू झाला हे उघड आहे!
डॉ सुनील वॅटसन
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बाथरूम...
In reply to रहस्यकथा... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
वरील तपासात 'बाथरूम'ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
आत्महत्या असावी. पण विषारी कॉफी प्यायल्यावर नंतर पश्चाताप होऊन ते विष शरीराच्या सर्व मार्गांनी बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात आत्महत्याकार बाथरूमकडे धावला असावा. त्यामुळे.....
मृतदेह खात्रीने बाथरूममध्येच सापडावा!
साधं रहस्यकथेचं शीर्षक सुचू नये???
In reply to रहस्यकथा... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
इतक्यात काढलेला किस विसरलात का काय? रहस्यकथेचं नाव अर्थातच,
जाम कोणी देई (इथे जाम म्हणजे कॉफी, नाहीतर लोक म्हणायचे स्ट्रॉबेरी जामात विष होतं ;) )
छ्या! असले
छ्या! असले चहा कॉफीचे रिकामे कप पाहायला आपल्याला नाय आवडत! :(
तात्या.
ह्म
In reply to छ्या! असले by विसोबा खेचर
बरोबर आहे..चित्राचा विषय कोणता असावा यावर सुद्धा चित्रकाराने विचार करावाच :)
--लिखाळ.
फोटोच्या
फोटोच्या विडंबनाची कल्पना मस्त...
पण प्रतिसादाचे विडंबन करायला फोटोग्राफीची माहिती नाही...
नाहीतर रंगसंगती, ऍपर्चर, स्पीड, लेन्स असल्या शब्दांचा मार्मिक गुंता ठोकून दिला असता...
______________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/
कॉफीचा गाळातुन भविष्य
जिप्सी जमातीत कॉफी पिउन झाल्यावर तळाशी राहिलेल्या गाळातुन पण भविष्य सांगणारे महाभाग आहेत.
प्रकाश घाटपांडे
आप्पा साहेब
In reply to कॉफीचा गाळातुन भविष्य by प्रकाश घाटपांडे
पंतांच्या आत्मचरीत्रात या भविष्य कथनाचा उल्लेख आहे.
त्यांच्या बदलीचे भविष्य त्यात बरोबर सांगीतले असा उल्लेख आहे.
https://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
आम्ही
In reply to आप्पा साहेब by रामदास
आम्ही इन्स्टंट कॉफि प्यायल्याने त्यात गाळ उरला नाही. उरली ती कॉफिच.. आता आमच्या भविष्यात कप धुणे आहे हे नक्की.
-- (कुडमुड्या ज्योतिषी) लिखाळ.
इन्स्टंट
In reply to आम्ही by लिखाळ
> आम्ही इन्स्टंट कॉफि प्यायल्याने...
अरे वा! मग तर इन्स्टंट भविष्य कळेल. ;)
> आता आमच्या भविष्यात कप धुणे आहे हे नक्की.
बघा काय म्हणालो मी? कळलं की नाही लगेचच? ;)
जीवनाचे अंतिम सत्य
हा कॉफिचा पेला जीवनाचे महत्व आणि त्या अनुषंगाने जीवनात येणारे कडू गोड अनुभव अधोरेखित करतो.
पेल्यातील संपलेला चहा हे जीवनातल्या संपत आलेल्या पळांचे/घटकांचे प्रतिक आहे.
पेल्यात तळाशी राहिलेला चहा हेच दर्शवतो कि अजून काहि क्षण शिल्लक आहेत. (जान अभी बाकि है मेरे दोस्त!!!)
चहा मधील गोडवा हा जीवनातल्या सुखद आणि आनंदि क्षणांचे द्योतक आहे तर चहा पावडरितला कडवट पणा अप्रिय घटना अधोरेखित करतो.
पेल्या बरोबर बशी नाहि म्हणजे जीवनातल्या अंतिम क्षणी जीवनसाथीचा अभाव.
(छे! कंटाळा आला)
हा हा
In reply to जीवनाचे अंतिम सत्य by मध्यमवर्गीय
>>पेल्या बरोबर बशी नाहि म्हणजे जीवनातल्या अंतिम क्षणी जीवनसाथीचा अभाव.
रसग्रहण आवडले.. तुम्ही रसग्रहण करा आम्ही कॉफी ग्रहण करतो :)
--लिखाळ.
आभार
मंडळी,
आपण या कॉफिच्या कपाकडे पाहिलेत आणि तो आपल्याला आवडला याचा आनंद वाटला :).
खरेतर व्यंगचित्रामध्ये जसे थोडिशी अतिशयोक्त्ती करुन विनोद निर्माण करतात तसाच विनोद 'चित्रे टाकणे' या प्रकावर करायचा हा प्रयत्न होता. आपण सर्व तो खेळीमेळीने घ्याल अशी खात्री होती आणि ती सार्थ ठरली. खेळीमेळीच्या प्रतिसादासाठी सर्वांचे आभार.
-- लिखाळ.
फोटो
फोटो तितका काही इंट्रेस्टींग नाहि :)
बाकी फोटो बद्दलची माहिती, फोटो संगणकावर नेल्यानंतर, प्रॉपर्टीस मध्ये कळेल.
--
ध्रुव