मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पाटी

उदय सप्रे · · जनातलं, मनातलं
परवाच पुण्यात जाऊन आलो आणि वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला लागून एक पाटी लिहिली होती : वहातुकीचे नियम पाळा (स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली :) इकडे यायचे टाळा ! ---------------पुणे वहातुक नियामक मंडळ---------- भन्नाट "डोकॅलिटी" पुणेकरांची !

वाचने 4370 वाचनखूण प्रतिक्रिया 8

विसोबा खेचर Mon, 07/07/2008 - 13:01
वहातुकीचे नियम पाळा (स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली इकडे यायचे टाळा ! सह्ही! :) आपला, (मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत सजा झालेला) तात्या.

अनिल हटेला Mon, 07/07/2008 - 13:19
जबरदस्त डोक वापरलये!!!!!!!!!!!!! आपण पण फॅण आहे असल्या अफलातून पाट्याचा..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

गणा मास्तर Tue, 07/08/2008 - 10:23
हो मी वाचली आहे ही पाटी. अजुन एक पाटी एका डॉक्टरांची होती. मनपाभवनकडुन बालगंधर्व रंगमंदीराकडे जाताना उजव्या बाजुला आहे " यक्रुत आणि काळीज यांचे तज्ञ"

आर्य Tue, 07/08/2008 - 14:20
पुणेरी पाट्या भन्नाट असतात ! NIBM, कोंढव्या जवळील ऐका रिक्षाच्या मागे पाटी होती पत्ता विचारल्यास रिक्षाचे भाडे द्यावे लागेल ! आपला (आर्य)

आंबोळी Tue, 07/08/2008 - 16:54
चुकून पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पार्टी असे वाचले .... आणि काही तरी जोरदार वृत्तांत असेल असे वाटले.