बाई माझी कंबर लचकली..
- Read more about बाई माझी कंबर लचकली..
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या
"चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे."
काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.)
"गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?"
"कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?