Skip to main content

"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"

"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"

Published on 12/02/2014 - 17:35 प्रकाशित मुखपृष्ठ
"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच" (व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) भांड्याला भांडे लागणारच शब्दाने शब्द वाढणारच ती त्याचे म्हणणे खोडनारच तो एक शीवी हासडून बोलणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||1|| वातावरण शांत होते न होते तेवढ्यात …… … तीचे ओठात पुटपुटने होणारच परत ह्याचा पारा चढणारच मग काचेचा ग्लास कोणी फोडणारच भरल्या घरात हे असे घडणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||2|| मग ती थोडी पडती बाजू घेते न घेते तेवढ्यात ...... तो मागचे उकरून काढणारच नुसता जीव तोडून भांडणारच आगदी स्वतःच्याच लग्नाची जुनी पत्रीका फाडणाराच नवऱ्याचा अहंभाव पुढे मांडनारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||3|| मग ती काही न बोलता स्वयंपाकघरात कणीक मळत बसते तेवढ्यात तिचे मुसमुसून हुंदके होणारच मग हा चोरून तीच्याकडे पाहणारच थोडे त्यालाही वाईट वाटणारच तोही एक आवंढा घोटणाराच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||4|| आता दोघेही शांत , शब्दही शांत… अगदी अनोळख्यासारखे… तेवढ्यात तो हळूच तिच्याकडे जाणारच लाडिक मीठीत घेणारच तीही …. माफी मागणारच भरल्या घरात हे अस घडणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||5||
लेखनविषय:

याद्या 7338
प्रतिक्रिया 12

तीही …. माफी मागणारच- *aggressive* >:o >:O >+O >:o >+o :-@ :angry:काही चुकल्या सारख वाटत (लग्नाचा २५ हून जास्त वर्षांचा अनुभव) . बाकी मस्त

In reply to by विवेकपटाईत

तीही …. माफी मागणारच- काही चुकल्या सारख वाटत (लग्नाचा २५ हून जास्त वर्षांचा अनुभव) . >>> बाकी जोडी तुझी माझी हा कार्यक्रम जरूर पाहावा (महाग्रूंचा असला तरी ) ;) :)

तुम्ही कविता लिहणारच आम्ही ती वाचणारच वाचून प्रतिक्रिया देणारच अहो कवी भॉ हे "च" खूपच झालेच की हो...

तो एक शीवी हासडून बोलणारच हीच खरेच कविकल्पनाच आहे...........च !