Skip to main content

मराठी लोकांचे हिंदी बोलणे

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 12/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :) आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते. Milano मध्ये जे हॉटेल बुक केले होते तेथे जवळपास बर्याच गल्ल्या /बोळी होत्या.फिरून फिरून आम्ही दोनदा एकाच ठिकाणी आलो.आमचे अहो तेवढ्यात बोलले कितनी बोळी हैं यहा,बोळीबोळी मे से आणे जाने मे तकलीफ होती हय, त्या परिस्थितीत २ मिनिटे सगळेच ब्लांक झाले आता काय करायचं आणि नंतर पूर्ण ट्रीप संपे पर्यंत बोळीबोळी वरून चिडवत राहिले . *blush* ;) :D *lol* तुम्हीही असे काही किस्से असले तर जरूर शेअर करा.आपण सगळे हसुया. :) इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही. एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे .अवांतर मला लिहिण्याचा अनुभव आजीबात नाही तेंव्हा काही चुकल्यास आपण सांभाळून घ्यालच(न घेऊन जाणार कुठे.) ;) :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31472
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

चला मी बोनी करून देतो तुमच्या धाग्याला :P काही दिवसांपूर्वीचा सकाळचा प्रसंग आई: मोसी तीन दिन से कचरा "नेल्या" क्यु नई? घंटा गाडी तर आके गय ना, डबा वैसैच बाहेर पड्या था कचरावाली : ऑ? नेल्या? ...... मी : अरे मोसी नयी हे वह :P

In reply to by स्पा

चला मी बोनी करून देतो तुमच्या धाग्याला Blum ३>>> धन्यवाद आता हाप शेंचुरी होयील अशी आशा आहे. ;) *beee* बाकी बोनी जोरदार झाली आहे. :) *clapping*

१ मुक्तपीठीय २. फॉरीनला-ईटलीला-मिलानला फिरून आल्याची झैरात

In reply to by दिव्यश्री

आम्ही कोण हरकत घेणारे? मिपापेक्षा मुक्तपीठ सारख्या ठिकाणी झैरात दणक्यात झाली असती. एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात?????? (प्रश्नचिन्हांची संख्या बरोबर आहे काय?)

आमच्या शेजारच्या काकू दारावर आलेल्या मच्छीवाल्याला ; "भैया ताटली पुसके दिया है...उसको मच्छी का हात लावून बरबरटो मत" ;) :P

मय क्या बोल रहा हय, तु क्या बोल रहा हय, क्या नया हय नया हय वो...डालू क्या पेपर डोकेमे... सौजन्यः टाईमपास मराठी चित्रपट.

In reply to by शिद

असल मे॑ आपने लिखा हुआ यह टाईमपास का स्॑वाद असली हि॑दी भाषा मे नही॑ है| उपर्युक्त वाक्य ज्यादातर हैदराबादी भाषा मे बोले जाते है| शुध्द खडी बोली हि॑दी भाषा बहोत अलग है| सब अलग अलग जगह बोली जानेवाली हि॑दी भाषा को ईकठ्ठ कर ईसे मिश्र हि॑दी बनाया गया है| जिसमे॑ हैदराबादी, बिहारी और उर्दु भाषा के शब्द मिलाये॑ गये है| ईसी वजह से यह मिश्र हि॑दी भाषा हसी लायक बन गयी है॑|

गाडी सावलीमे लगा. भय्या, भेळ मे लिम्बु पिळा क्या?? पहले पाणी मे शिरा, थोडा पोहा और फिर बुडा ..

मी एका दुकानात विचारले, "वो चित्रकलाकी वही है क्या तुम्हारे दुकान मे?" तो सिंधी डोळ्यातून पाणी येस्तोवर खिदळला होता. तेरी शेरडी मेरे परडेमे आकर कायको वरडी?

In reply to by यसवायजी

>>> तेरी शेरडी मेरे परडेमे आकर कायको वरडी? हे काय नि 'धावते धावते आया आन धपकन पड्या' काय ही आमच्याकडच्या मुस्लिम (बागवान) लोकांची (बहुतेक कोकणात सुद्धा असंच बोलतात) नॉर्मल भाषा आहे. क्या रे सलिम? काय ऐसा वरडता है?

In reply to by प्यारे१

हो. डबरेमे पड्या टाईप. जवळचा एक मित्र बागवान असल्याने त्याच्या घरी गेलो की तशीच बोलायचा प्रयत्न करतो. (फज्जरा-फजर, पव्वां पडतूं, सालको नही गईस आज?, यो भिंत जादा जाडी है जी.) फक्त एक सुधारणा- आमच्याकडच्या नाही हो काका.. आपल्याकडच्या. :)

In reply to by यसवायजी

तेरा गाँव कौनसा? मै वाई सातारा का हय. (ते 'आमच्याकडच्या' उगाच्च कुणाच्या शेपटावर पाय नको म्हणून सांभाळून लिहीलेलं)

माझी मामी दुधवाल्याशी कायम हिंदीत बोलायची. एकदा तिने दुधवाल्याला सांगितलं, भय्या आज दुध "अर्धा" लिटर ही दो कल का "शिल्लक" है. मी आणि माझी मामेबहीण इतके हसलो होतो हे ऐकून, पुढे बरेच वर्ष मामी च्या या वाक्याची नक्कल करायचो आम्ही.

मी परवा आमच्या हामेरिकेतुन आलेल्या एका लीड सोबत बोलताना ... "and we can find that design margin by the formaula... formula...अं.. नही क्या वो.. using UT वाला..." तो खुप वेळ समजुन घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत होता..!! शेवटी मी २ मिन गप्प बसले.. म्हणलं थांबा.. मला जरा वाक्य बनवु द्या म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचय.. कॉन्फरन्स कॉल मध्ये काहीतरी सांगायच्या नादात मी खुपदा चायनिज लोकांना हिंदी (मराठी टोन मधुन..) + इंग्लिश मध्ये काहीतरी सांगते.. आणि मग सॉरी सॉरी म्हणत बसते.. एखादी गोष्ट समजावुन सांगायच्या गडबडीत आपण मातृभाषेवर घसरणं एकवेळ ठिके.. पण अमराठी माणसाला काही कळत नसेल (मग तो भारतीय असो वा चायनीज )मी ताबडतोब हिंदीवर येते..

एकदा आमचे वडील फोनवर तावाताव्ने कुणाला तरी सांगत होत.. "तबसे मैने मनाशी पक्की "खुणगाठ" बांधली"... समोरच्याला काय समजलं देव जाणे!!

माझा महाराष्ट्रीयन तेलगु मित्रः कल गच्ची मे क्रीकेट खेलते खेलते गिरा (डोक्याकडे हात दाखवुन) ये देख कितना बडा टेंगुल आया है.

  • घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!
  • इतना महाग कैसे रे तेरे यहा?? वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है!!
  • केस एकदम बारीक कापो हा!!
  • खाओ पोटभर खाओ, लाजो मत..
  • रडो मत.. कुछ नही होगा..

  • मराठी माणसांनी मराठी संकेतस्थळावर मराठी माणसाची टर उडवावी आणि ती देखिल हिंदी नीट येत नाही म्हणुन? का हो? ही असली हौस केवळ मराठी माणसांनाच असावी असे वाटु लागले आहे. मी तामिळ माणसाचे कन्नड (हिंदी दूर राहिले) वा बंगाली माणणसांचे पंजाबी यावर त्या त्या भाषांमधील संकेतस्थळांवर/ भाषिकांमध्ये अशी त्या त्या भाषिकांची टर उडविल्याचे ऐकले नाही. एकाहुन अधिक भाषा येणे उत्तमच, पण मराठी माण्साला हिंदी आलीच पाहिजे आणि उत्तम आली पाहिजे व न आल्यास त्याची टवाळी व्हावी असे का? जुजबी, कामापुरती हिंदी आली तरी ठिक आहे. हा न्यूनगंड म्हणायचा की दिल्लीत बसून महाराष्ट्रावर राज्य करण्याच्या उत्तरेकडील राजकिय महत्वाकांक्षेस तुमचा भाषिक पाठिंबा? आपले सत्ताधारी दिल्लीश्वरांना विचारल्याखेरीज काहीही करत नाहीत तसे काही आहे काय? दैनंदिन जीवनात कामापुरती हिंदी आली म्हणजे झाले. अन्य बहुतेक राज्यांमध्ये त्या त्या राज्यांमधील भाषेचा मान राखला जातो व वापरही केला जातो. चेन्नै, बंगलोर, कोलकाता, अहमदाबाद वगैरे कुठल्याही शहरात एखाद्या स्थनिक भाषिकाला हिंदी येत नाही म्हणुन तिथल्या एखाद्या व्यक्तिपुढे टिका करा, तुम्हाला एकच उत्तर मिळेल - 'नसेल येत हिंदी, ती आमची मातृभाषा नाही त्यामुळे यात नवल करण्यासारखे काय आहे?' मराठी माणुस जेव्हा नोकरी- व्यवसायानिमित्त अन्य ठिकाणी जातो तेव्हा दिर्घ रहिवासानंतर तो तिथली भाषा शिकुन घेतो. मात्र इथे दहा वीस वर्षे वा पिढ्यानपिढ्या राहुनही मराठी धड न येणार्‍यांची संख्या कमी नाही. मराठी माणसाने मराठी संकेतस्थळावर मराठी माणसाची एखादी अन्य भाषा नीट न येण्यावरुन टिंगलटवाळी उडवावी हे मराठीचे दुर्दैव आहे. विनोदनिर्मितीसाठी दुसरा विषय नसावा? माझे विचार संकुचित वाटल्यास मिपा व्यवस्थापनाने हा धागा अवश्य उडवावा, मात्र पटल्यास असे मराठीचा अपमान करणारे धागे न काढण्याविषयी सदस्यांना आवाहन करावे. आपली भाषा असो वा आपले आई-वडील; जर आपण मान राखला नाही तर इतर राखतील ही अपेक्षा व्यर्थ आहे.

    In reply to by सर्वसाक्षी

    अहो सर्वसक्षी...तुम्हाला या पूर्ण लिखाणात मराठी टर उडवली आहे असे वाटते आहे पण ते तसे नाही. मी आधीच "इथे कोणाला दुखायचं नाही, कोणत्याही भाषेचा ,व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नाही.एक मजा म्हणून लिहिले आहे आणि सगळ्यांना विनंती आहे कि या लिखाणाकडे मजा म्हणूनच पाहावे." हे सांगितले आहे. मुळामध्ये मराठी लोक हिंदी बोलताना चुकतात आणि त्या चुकी मधून विनोद निर्मिती होते. आणि हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे न? मग मातृभाषा आणि राष्ट्रभाषा या दोन्ही व्यवस्थित बोलत यायला पाहिजे ना? तुम्हाला फक्त चुकीची बाजू दिसली आहे असे मला वाटते.माझा उद्देश तसा नव्हता / नाही. माझे विचार संकुचित वाटल्यास मिपा व्यवस्थापनाने हा धागा अवश्य उडवावा, मात्र पटल्यास असे मराठीचा अपमान करणारे धागे न काढण्याविषयी सदस्यांना आवाहन करावे. आपली भाषा असो वा आपले आई-वडील; जर आपण मान राखला नाही तर इतर राखतील ही अपेक्षा व्यर्थ आहे. >>> हा धागा मी काढला आहे तो तुम्ही उडवा असे का सांगता? आणि जर तस असत ना तर मीच सांगितलं असत धागा उडवायला.मी फक्त माझे आई वडील आणि भाषा यांचाच नाही तर सगळ्यांचा मान ठेवते नेहमीच मग ती व्यक्ती असो अथवा भाषा किंवा प्राणी. असो तुमच्या मताचा आदर आहेच. इथून पुढे काळजी घेयीन

    In reply to by दिव्यश्री

    हिंदी राष्ट्रभाषा नाही. बाकी चालूदेत. सर्वसाक्षींना काय म्हणायचे आहे हे लक्षात येते आहे पण हा धागा म्हणजे चार दोस्तांनी आपापसात एकमेकांच्या टोप्या उडवाव्यात, स्वतःचे फजितीचे किस्से सांगावेत आणि हसावे टाईप आहे असे वाटते..
    हा धागा मी काढला आहे तो तुम्ही उडवा असे का सांगता? आणि जर तस असत ना तर मीच सांगितलं असत धागा उडवायला
    दिव्यश्री, एकदम तलवार उपसू नका :) जरा हलक्याने घ्या..

    In reply to by यशोधरा

    यशोधरा ताई तुम्हाला बरोबर समजल आहे मला काय म्हणायचं आहे ते. माझ्या मनात एकदाही शंका आली नाही कि या लेखावर असे काही प्रतिसाद येतील .पण खरच नवीन सदस्यांना समजून घेण्यास जरा त्रास होतो असे मी बर्याच वेळा पहिले आहे.जरी मला १ वर्ष ३ महिने झाले तरी मी नवीन आहे असे वाटते कारण मी वाचते जास्त लिहिते कमी. या ना त्या कारणाने वादच होताना पाहिले आहे बरेचदा.ज्यांच्या कडे वाद घालण्याची कला आहे ते वाद घालतात बाकीचे सोडून देतात. एकदम तलवार उपसू नका Smile जरा हलक्याने घ्या.. >>> मी अगदी प्रामाणिकपणे लिहिले आहे जर खर तसं काही असेल आणि धागा उडवला तरी चालेल. फक्त माझ्या लिखाणाचा भलताच अर्थ काढून तो उडवा असे सांगणे मला पटणार नाही.बाकी मी हलकेच घेतले आहे. :)

    In reply to by दिव्यश्री

    दिव्यश्री, वाद हे तितक्यापुरतेच असतात, विषयांपुरतेच आणि मतभेदांपुरतेच. तेच धरुन इथे कोणी सहसा बसत नाही. हळूहळू तुम्हीही रुळाल. :)

    In reply to by यशोधरा

    "वाद हे तितक्यापुरतेच असतात, विषयांपुरतेच आणि मतभेदांपुरतेच. तेच धरुन इथे कोणी सहसा बसत नाही." + १

    In reply to by दिव्यश्री

    मला 'माझा प्रतिसाद' असे म्हणायचे होते, अनवधानाने 'धागा' असे लिहिले गेले. इतरांच्या लेखनाचे काय करायचे ते संपादक/ प्रशासकांना ठरवु द्या, तो त्यांचा अधिकार आहे आणि ते ज्ञानी व समर्थ आहेत, मी माझ्या धाग्या पुरते लिहिले आहे ('माझे विचार' असा उल्लेख केला आहे, लेखिकेचे विचार असा नव्हे). २) हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे मा. संपादकांनी निदर्शनास आणुन दिले आहेच. ३) मराठीची टवाळी ही अगदी विनेदनिर्मितीसाठी केली असली तरी किमान मराठी माणसानी नराठी संकेतस्थळावर करु नये या मतावर मी ठाम आहे. ४) मताचा आदर केल्याबद्दल आभारी आहे.

    In reply to by सर्वसाक्षी

    http://en.wikipedia.org/wiki/Languages_of_India येथे हिन्दीला ऑफिशियल भाषा लिहिले आहे. ३) मराठीची टवाळी ही अगदी विनेदनिर्मितीसाठी केली असली तरी किमान मराठी माणसानी नराठी संकेतस्थळावर करु नये या मतावर मी ठाम आहे.>>>अजुनहि मी सान्गते कि भाषेची टवाळी करुन विनोद निर्मीती करणे हा उद्देश नाहि.दोन भाषा एकत्र केल्या तर काय होते आणी त्यातुन विनोद निर्माण होऊ शकतो .प्रत्येक वेळेस प्रत्येक जण जाणूनबुजून करतो असे नाही खुलाशाबद्दल धन्यवाद

    In reply to by दिव्यश्री

    हिन्दीला ऑफिशियल भाषा लिहिले आहे.
    भारतीय घटनेत हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा ऑफिशियल कम्युनिकेशन लँग्वेज अमंग स्टेट्स असे लिहीलेले राष्ट्रभाषा ( नॅशनल लँग्वेज ) असे म्हंटलेले नाहीय्ये. मुळात हिंदी ही एक सरमिसळ झालेली भाषा आहे. हिंदीत कोणतीही प्रमाण भाषा नाही. राजस्थानी ( मारवाडी) हरयाणवी भोजपुरी ,अवधी ,लखनवी, उर्दू ,हैद्राबादची दक्कनी , अंगीका इत्यादी बर्‍याच बोलीभाषांना हिंदीने गिळंकृत केले आहे. आपण मराठीचा आग्रह ठेवला नाही तर मराठीही तशीच नामशेष होण्याचा धोका आहे. आपल्यावर आप्न हिंदी लादण्याला विरोधच करायला हवा. राजठाकरेनी मराठीचा आग्र्ह धरला तर ते वाईट मात्र ते दक्षीणेच्या लोकानी केली की ते मात्र भाषेची अस्मिता.

    In reply to by विजुभाऊ

    हिंदी ही राष्ट्रभाषा नसून केंद्र सरकारची अधिकृत भाषा आहे हे मान्य. पण,
    मुळात हिंदी ही एक सरमिसळ झालेली भाषा आहे. हिंदीत कोणतीही प्रमाण भाषा नाही.
    उगाच? 'मानक हिंदी' कधी काही ऐकले नाहीत काय?

    In reply to by मिहिर

    मानक हिंदी ही संस्कृतप्रचूर भाषा आहे. रोजच्या वापरातल्या हिंदीत अनेक उर्दू, फारसी शब्दांचा वापर होतो. फक्त सरकारी कागदपत्रांमध्ये ह्या 'मानक हिंदी'चा वापर होतो, जी पचायला लै जड जाते. ;-) माझ्या अल्पमाहितीनुसार हिंदीऐवजी "हिंदुस्थानी" भाषा जी उत्तर भारतात जास्त वापरली जाते ती अधिकृत भाषा असावी, हा मुद्दा संविधान-समितीत विचाराधीन होता. मात्र त्यातील व्याकरण-नियमांच्या अभावामुळेच हिंदीला "अधिकृत भाषे"चा दर्जा मिळाला. बाकी, बहुतांश नागपुरकरांना हिंदी बोलायला अवघड जात नाही, हे जाता जाता नमूद करतो..

    In reply to by चिगो

    ते भाषावार प्रांतरचना प्रकरण जरा त्रासदायकच आहे. काय तर म्हणे विविधता टिकवून एकता. बेळगावात हाणामार्‍या, तामिळ लोक हिन्दी नको म्हणून सगळ्याला डाम्बर फासतात नि केरळी लोकांना बाहेर जग आहे हेच ठाऊक नाही. कशी व्हायची एकता? बाकी नागपूरात महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासून/ महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधीपासून मराठीबरोबर हिन्दी बोलली जात होती ना?

    In reply to by प्यारे१

    बाकी नागपूरात महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासून/ महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधीपासून मराठीबरोबर हिन्दी बोलली जात होती ना? नाहीतं काय, भाऊ.. मध्यप्रांत आणि वर्‍हाड (सीपी अँड बेरार) ची राजधानी व्हती ना नागपूर. इंग्रजायनंच ईधान-भवन बांधलं ना थितं.. म्हणूनशान हिंदी आंदीपासूनच म्हाईत व्हती नागपूरवाल्याहले.. ;-)

    In reply to by प्यारे१

    केरळी लोकांना बाहेर जग आहे हेच ठाऊक नाही
    औं! असं म्हणतात की नील आर्मस्ट्राँगचे यान चंद्रावर उतरताना पंक्चर झालं होतं. तिथे दुकान थाटलेल्या एका केरळीय "पंचर"वाल्याने ते दुरुस्त केलं!!

    In reply to by सर्वसाक्षी

    घरातल्या-घरात आपण आपल्या माणसांची चेष्टा करतोच की. चारचौघात नाही केली पाहिजे हे मान्य. मिपाकर आपलेच आहेत हो. हलकेच घ्या.
    मराठी माणसाने मराठी संकेतस्थळावर मराठी माणसाची एखादी अन्य भाषा नीट न येण्यावरुन टिंगलटवाळी उडवावी हे मराठीचे दुर्दैव आहे
    याला टिंगलटवाळी म्हणताय?? मी फक्त 'करमणूक' आणी 'सुधारणेला जागा आहे' म्हणतोय. बाकी कुणीतरी म्हटलंय- Blessed is the man who can laugh at himself, he will never cease to be amused

    In reply to by सर्वसाक्षी

    सर्वसाक्षींशी पूर्ण सहमत. पंजाबी लोक पंजाबी ढंगात हिंदी बोलतात. तेंव्ह्या ते कौतुकाचे ठरते. मराठी लोक हिंदी बोलतात हेच महत्वाचे आहे. खरेतर हिंदी ही आपल्या सर्वाम्वर लादली गेलेली भाषा आहे . ते देखील उत्तर भारतीयांमुळे. त्यानी महाराष्ट्रात आल्यावर मराठीत बोलायचे बाजूलाच राहिले ते आपल्यालाच हिंदीत बोला असा माजुरीपणा करतात. कोणी माझ्याशी हिंदीत बोलला तर मी तर बहुतेकदा मराठीतच बोलतो. तेंव्हा त्याना कळते. त्याना मराठी कळत नसेल तर गुजराथी कोकणी किंवा इंग्रजीत बोलतो. माझ्या घरी येता तेंव्हा माझ्या घराती संस्कृतीचा मान ठेवायलाच हवा. अन त्यासाठी मीच आग्रही असायला हवे

    In reply to by रेवती

    तसं नाही. हम इथेच बठलेले हय ! असे हवे तसेच, एक एक को लक्षामें ठेवेंगा अवर बादमे उसका बदला घेयेंगे.

    In reply to by इरसाल

    हम इथेच बठलेले हय ! असे हवे तसेच, एक एक को लक्षामें ठेवेंगा अवर बादमे उसका बदला घेयेंगे.>>> अरे बापरे... असं पण आहे का?

    In reply to by दिव्यश्री

    म्हणजे तुम्हाला, हमरान आयले नि नम्रान बैठले हे पण माहित नसणार. वर...... ताड्या आज मुर्ग्या(कोबड्या) नय लाया क्या गाव मे लगन हय ना !

    माझं हिंदी ऐकून बर्‍याचदा हिंदीभाषिकच "आम्हाला मराठी व्यवस्थित समजतं" असं गुमान कबूल करतात आणि "मराठीतच बोल" वगैरे सांगतात!

    मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदी भाषिकांनी मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले आहे हे मला मान्य आहे. आणि ते साफ चूक आहे हेही. मराठी ही हिंदीच्याच तोडीची भाषा आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे महाराष्ट्रात हिंदीपेक्षा मराठी जास्त महत्त्वाची आहे. (हा माझा डिसक्लेमर!) पण ह्या गंमतशीर वाटणार्‍या चुका का होतात? मला वाटते मराठी माणसाच्या कानावर हिंदी भाषा वारंवार पडत असते. सिनेमे, सिनेसंगीत, सिरियल, टीव्हीवरील अन्य बातम्या वगैरे कार्यक्रम ह्या माध्यमातून जी हिंदी कानावर पडते त्यामुळे आपल्याला हिंदी उत्तम येते असा बहुतेक लोकांचा गैरसमज व्हायला मदत होत असावी. कानावर पडलेले समजणे आणि उत्तम हिंदी बोलता येणे यात मोठा फरक आहे तो या दोन भाषेतील साधर्म्यामुळे पटकन लक्षात येत नाही. आणि त्यामुळे अशी गडबड होत असावी. आता एक संवाद. एक मराठी आजीबाई उत्तरेत कुठेतरी यात्रेबित्रेला जातात. उन्हाळ्याचे दिवस असतात. एक गाडीवाला ताक विकत असतो. ते विकत घेऊन, पिऊन झाल्यावर विचारतात "भय्या, तकियेमे अल्ला नही था क्या?" (अर्थात ताकात आले घातले नव्हते का?). भय्या अवाक!

    In reply to by हुप्प्या

    =)) माझ्या आज्जीला पण हिंदी भाषा येत नव्हती .. पण तिला वाटायचं सगळ्या भाजी/फेरीवाल्यांना फक्त हिंदीच कळतं ..

    In reply to by हुप्प्या

    तकियेमे अल्ला नही था क्या?"
    ठ्ठो!!!! :)

    In reply to by हुप्प्या

    हा तक्केमे अल्ला विनोद मीही ऐकला होता. ;) माझ्या भावाला हिंदी विषयाच्या बाईंनी 'हम दिवाली मनाते है' अशा विषयावरचा निबंध दिवाळी सुट्टीचा अभ्यास म्हणून लिहून आणायला सांगितला होता तर भावाच्या मित्राने (भावाने नव्हे!) 'हम सब दिवालीमें खुदकुशी मनाते है|' असे लिहून नेल्याने बाईंनी ती मोठी चूक दाखवली. ते याने घरी येऊन सांगितले (स्वत:च्या) त्यावर त्याच्या आजीने अर्थ विचारला व् "काय तरी मेलं अभद्र ल्ह्यायचं" म्हणून धपाटा घातला.

    In reply to by हुप्प्या

    तकियेमे अल्ला. हाय रे कर्मा!

    दिव्यश्रीजी, तुमने एकदम मस्त धागा काढ्या हय. हमको इसमें मराठीका किंवा मराठी माणूसका कोई अपमान या दुर्दैव वैग्रे वाटता नही. मराठी माणुसने यह धागेके बारेमें जरा थोडी विनोदबुद्धी (मराठीमें सेन्स ओफ ह्यूमर बोलते हय उस्को!!)दाखवणेका जरूरत हय. अपने स्वतः को थोडा हासनेमें कुछी वाईट नही. नही तो 'चिडका बिब्बा' बोलते हय. :) बाकी ये भाषा और उच्चारका घपला मराठी लोगाच करते है ऐसा नही. पब्लिकने थोडा रसेल पीटर्स् का कॉमेडी यू ट्युबपर है वो देखना मंगताय! हमारा तो हासहासके पोट दुखताय!!! लगे रहो, मराठीभाय!!! :)

    In reply to by पिवळा डांबिस

    हांगाश्शी! ऐश्याच बोलनेकु मंगताय. उगा फज्जर फज्जर को बटर डुबाके खानेका और मसत रैनेका. क्या म्हनताय?

    माझा एक मित्र चिमणीच्या घरट्याला हिंदीत बोलताना "चीडीयाघर" म्हणाला होता.

    In reply to by आनन्दिता

    @ आनन्दिता काय लिहीलय ग हे ? नुसती हसतीये हापिसात आल्यापासुन :) (गड्बडा लोळ्णारी स्माईली कशी घेतात ? ) आमच्याकडे आई अन आज्जी अशी करमणुक करत असतात वरचेवर . आजी : "आज हमारे इधर करंगळी के धार एवढा पाणी आया हमकोच भरनेको नही मिला " आई : " ए साडीवाले भैय्या ,तुम कल दोपर मे आव , दोपर मे हम निवांत रेहते हे " @ दिव्यश्री तै मस्त धागा काढलायेस ह.ह्.पु.वा. :)

    एक मराठी भौसाएब लग्नातल्या पंगतीचं वर्णन हिंदीत करताना म्हणाला.. ह्मारे यहा पहिले नवरा नवरीको घास खिलाता है =)) आता हा विनोद आइनस्टाईन, विवेकानंद, वॉरन बफेट नावाने जसं काय वाटेल ते खपवल्या जातं त्यातला होता काय कल्पना नाहि.