Skip to main content

वाङ्मय

शब्दांच्या पलिकडले !

लेखक स्पंदना यांनी रविवार, 06/03/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा! बरचस सांगता येत नाही! बरचस बोलताही येत नाही ! ना डोळ्यातून डोकावण्याची मुभा असते या 'बरचस' ला! पण हे ' बरचस ' तुटत ही नाही, मिटत ही नाही ! मंडळी कल्पना करा, पन्नास वर्षापुर्वी गुंतलेल्या दोन जीवांची! बरचस जीवन उंबर्‍याच्या आत व्यतित करणार्‍या तुमच्या माझ्या आज्जीच्या वेळच्या काळाची! कुठ काहिस वादळ उठल , पण त्या वादळाला बाहेर येण्याची मुभा नसल्यान मनाच्या आतच; त्यान तांडव मांडल्यान व्याकुळ 'ती 'अन व्याकुळ 'तो'!

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 22/02/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.

कुर्‍हाडीचा दांडा

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 21/02/2011 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्‍हाडीचा दांडा काही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली. "महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे." खरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले नाही किंवा ऐकल्यावर माझ्या मनाच्या कोणत्याच कोपर्‍यात तीळभरही सहानुभूती निर्माण झाली नाही, उलट ही बातमी मला आनंदच(असूरी?) देऊन गेली.

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज यांनी शनिवार, 19/02/2011 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.

गंध मायेचे..

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 10/02/2011 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी! गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने
काव्यरस