अहल्या व शूर्पणखा खरेच अन्यायग्रस्त स्त्रीया ?
लेखनप्रकार
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ?
"अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत. माझे महाभारतावरील मत हे "शरद याचे, त्याचे घरातील वातावरण शिक्षण, वाचन, पुण्यातील वास्तव्य" अशा बर्याच गोष्टींवर आधारलेले मे २०१५ चे मत असते. उद्या ते तसे असेलच असे अजिबात नाही. म्हणून मी माझे मत देऊं नयेच कां ? तसे अजिबात नाही अह्ल्या व शूर्पणखा यांच्या बाबतीत रामायणात पुरुषी वर्चस्वाची झाक दिसते कां एवढ्यापुरते मर्यादित.
अहल्या :
(१) ब्रह्मदेवाने विश्वातील स्रर्व सौंदर्य गोळा करून अह्ल्या निर्माण केली व ती गौतमाच्या आश्रमात "ठेव" म्हणून ठेवली. सर्व लोकपाल जिच्या प्राप्तीकरता धडपडत होते तिच्या, त्या अहल्येच्या, मोहांत गौतम पडला नाही म्हणून ब्रह्मदेवाने स्वत: त्यांचे लग्न लावून दिले. गौतम कोणत्याही अप्सरेच्या मोहात पडणारा लंपट नव्हता.
(२) अहल्येचा "ज्येष्ठ" पुत्र शतानंद हा जनकाचा पुरोहित होता. म्हणजे अह्ल्या अनेक पुत्र असलेली "लेकुरवाळी" होती.
(३) तपोनिष्ट व इंद्रियदमन करणार्या नवर्याला, काही मुले झाल्यावर, अहल्येने फसवले आहे. त्याबद्दल तिला चूक न वाटता आनंदच वाटतो व इंद्राने गौतमाच्या कोपापासून आपणास वाचवावे असेही ती म्हणते.
(४) कोणत्याही काळात, अगदी आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. यात पुरुष संस्कृतीच्या वरचष्म्याचा प्रश्न उद्भवत नाही.
(५) गौतमाने "तपाने शुद्ध झाल्यावर, माझ्याबरोबर नांदशील" असे सांगण्याचा मोठेपणा दाखविला आहे. शतानंदानेही "मातेचे दुराचरण आपण रामाला सांगितले ना व रामदर्शन झाल्यावर माझ्या मातेचा माझ्या पित्याशी समागम झाला ना ?" असे विश्वामित्राला विचारले आहे. आजच्या काळातही असा मनाचा मोठेपणा पहावयास मिळतो कां ?
(६) आता पुरुषांना अशा प्रसंगी काय शिक्षा झाली ? असा प्रश्न विचारला आहे. प्रथम रावणाचे उदाहरण घ्या. त्रैलोकातील सुंदर स्त्रीयांवर बलात्कार करणे हा उद्योग. एकदा एक अप्सरा कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी संकेत करून त्याच्याकडे निघाली असतांना रावणाच्या नजरेस पडली. तिने त्याला विनवणी केली की मी तुझ्या पुतण्याकडे पूर्वसंकेताने जात आहे, मला सोड. त्याने ऐकले नाही. नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली.
रावणासारख्या क्रूरकर्म्याचे सोडा. माझ्या वाचनात ऋषींचे असे वर्तन दोनतीन ठिकाणीच आले. एक विश्वामित्र व अप्सरा. या ठिकाणी अप्सरा त्यांना मोह पाडण्यासाठी योजल्या आहेत.. त्याला बळी पडल्याने फार दोष देण्याचे कारण नाही. दुसरे उदाहरण पराशर-सत्यवती. पराशर सत्यवतीवर मोहित झाल्यावर त्याने तिला उत्तम वर देऊन वश केले आहे. अंधार निर्माण करून तिचा संकोच नाहिसा केला, तिच्या अंगाचा माशांचा वास घालवून तिला सुगंधी केले व प्रसुत झाल्यावर परत कन्यावत्वही दिले. इथेही बलात्कार नाही. एखादे उदाहरण रहिले असेल तर श्री. वल्ली सांगतीलच.
आता शूर्पणखेचा विचार करूं
शूर्पणखा ही रावणाची बहीण. तिचे लग्न मधु नावाच्या एका दानव राजाशी झाले. रावणाने त्रैलोक जिंकण्याच्या नादात मधूवर स्वारी केली व युद्धात त्याला मारून टाकले. मग या विधवा बहीणीची कटकट लंकेत नको म्हणून तिला दंडकारण्य़ात पाठवून दिले व तेथे खर नावाच्या एका राक्षस सेनापतीला, हा त्याचा भाऊ, तिच्या दिमतीस दिले. तेथे शूर्पणखा स्वच्छंदपणे विहरत असे.
राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात रहावयास आल्यावर ही सहज त्यांच्या आश्रमापाशी आली. रामाला पाहिल्यावर ती कामातूर होऊन त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याची चौकशी केली. आदीकवी वाल्मीकि काय म्हणतात ते बघा .."विक्राळ मुख, मोठे पोट, विरूप नेत्र, ताम्रवर्ण केस, कुरूप मुद्रा, भयंकर स्वर, उग्र स्वभाव, वृद्ध वय, कुटिल भाषण, अतिशय दुष्ट वर्तन्यांनी युक्त असलेली ती राक्षसी कामाधिन होऊन उत्कृष्ट मुख, कृश उदर, विशाल नयन, सुंदर केस ,सुरूप मुद्रा, मंजुळ स्वर, सौम्य स्वभाव, तरुण वय, सरल भाषण, न्यायाला धरून असलेले वर्तन असलेल्या रामाला म्हणाली "तूं कोण ?, येथे कशाला आला आहेस ?" सरळ स्वभावाच्या रामाने तिला उत्तर दिले की " दशरथ राजाच्या आज्ञेवरून मी राम, हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता..वनात राहण्यासाठी आलो आहोत." तो नंतर तिला "तूं कोण ?" असेही विचारतो. इथपर्यंत सगळे सौजन्याने चालले होते.
यावर शूर्पणखा त्याला उत्तर देते " मी इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी, शूर्पणखा नावाची, रावणाची बहीण आहे. तू माझा चिरकाल भर्ता हो. सीतेचा तुला काय उपयोग ? ही विरूप, दुराचारी, पोट खपाटीला गेलेली मनुष्य जातीची भार्या व तुझा भाऊ यांना मी भक्षण करून टाकीन व नंतर विषयोपभोगाची इच्छा धरून आपण संचार करू." मग राम न रागावता थट्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला, " बाई ग , माझा विवाह झाला आहे. सवतीचे जीवन तुजसारखीला बेकारच. तेव्हा तू माझ्या ऐवजी लक्ष्मणाशीच विवाह कर." रामाला सोडून शूर्पणखा लक्ष्मणाला म्हणाली " माझ्या सारखी श्रेष्ठ स्त्री तुझ्या रूपाला योग्य भार्या आहे." मग लक्ष्मण म्हणतो " मी तर दास. माझ्या ऐवजी हा रामच तुला योग्य.. तुझ्या सारख्या सुंदर स्त्रीला सोडून हा कशाला या कुरूप मानवी स्त्री बरोबर संसार करेल?" मूर्ख शूर्पणखेला ते पटले व ती रामाला म्हणाली " या तुझ्या भार्येवरील प्रेमाने तू माझा अव्हेर करत आहेस. तिला मी तुझ्या समक्ष भक्षण करून टाकीन व मग तू सवत नाहिशी झालेल्या माझ्याबरोबर संचार कर." असे म्हणून ती सीतेला खावयास तिच्या अंगावर धावून गेली. मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही.
वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही.
शरद
वाचने
15052
वाचनखूण
प्रतिक्रिया
73
अमान्य
मुळात रामायण हा आर्य आणि
In reply to मुळात रामायण हा आर्य आणि by चुकलामाकला
संस्कृती
In reply to संस्कृती by तुषार काळभोर
असेही चालेल
In reply to मुळात रामायण हा आर्य आणि by चुकलामाकला
आर्य अनार्यात सुंदर कोण होते ?
In reply to मुळात रामायण हा आर्य आणि by चुकलामाकला
संस्क्रूती मधील स्क्रु टंकणे
In reply to संस्क्रूती मधील स्क्रु टंकणे by पिवळा डांबिस
:):)
In reply to :):) by चुकलामाकला
गैरसमज
In reply to मुळात रामायण हा आर्य आणि by चुकलामाकला
आर्य आणि अनार्य संघर्ष- हे
In reply to आर्य आणि अनार्य संघर्ष- हे by विवेकपटाईत
कफ्यूजन
In reply to कफ्यूजन by आनंदी गोपाळ
????
In reply to ???? by बॅटमॅन
कंस आणि रामामध्ये गोंधळ
In reply to कंस आणि रामामध्ये गोंधळ by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी ;)
रामाचेही चुकलेच
In reply to रामाचेही चुकलेच by तिमा
गोष्ट कुठे
शुर्पणखा
In reply to शुर्पणखा by मृत्युन्जय
त्राटिका वध
In reply to शुर्पणखा by मृत्युन्जय
मग रामाने लक्ष्मणाला सांगितले
नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे
आजच्या my choice काळातही, हे
माझ्या मनात कायम एक शंका आहे
In reply to माझ्या मनात कायम एक शंका आहे by 'पिंक' पॅंथर्न
पण या सर्व भौगोलिक
In reply to पण या सर्व भौगोलिक by सतिश गावडे
धागे वाचले. छान माहिती. आता
In reply to धागे वाचले. छान माहिती. आता by 'पिंक' पॅंथर्न
काव्य साहित्य आहे त्याला तेच ठेवावे, उगाच त्याचा ओढून ताणून
In reply to काव्य साहित्य आहे त्याला तेच ठेवावे, उगाच त्याचा ओढून ताणून by पगला गजोधर
येस्स!!
In reply to पण या सर्व भौगोलिक by सतिश गावडे
छान. थोडक्यात, इराण हा परत
अहिल्या
In reply to अहिल्या by मृत्युन्जय
हो. इंद्रियदमन करणार्याने
In reply to हो. इंद्रियदमन करणार्याने by स्पंदना
आपल्याकडे होतं हे...
In reply to आपल्याकडे होतं हे... by स्वप्नांची राणी
शुध्ध य्झ पणा आहे तो
ते शंभर शकले प्रकरण मागाहून
सर्वश्री या उपाधीने
हा
In reply to हा by स्पंदना
स्त्रीला जर काम भावना झाली तर
In reply to स्त्रीला जर काम भावना झाली तर by नगरीनिरंजन
अहो,
In reply to अहो, by आनंदी गोपाळ
-१
In reply to -१ by बॅटमॅन
शोध
In reply to शोध by तिमा
हा हा हा ;)
माहिती आहे
In reply to माहिती आहे by पैसा
मुळात अहिल्या म्हणजे काय
In reply to मुळात अहिल्या म्हणजे काय by नगरीनिरंजन
माझा मुद्दा तो नाही
In reply to माझा मुद्दा तो नाही by पैसा
बरोबर आहे. तिने त्याग करायला
In reply to बरोबर आहे. तिने त्याग करायला by नगरीनिरंजन
हाहा!
In reply to हाहा! by पैसा
हम्म! अहिल्येला फार कडक
In reply to हम्म! अहिल्येला फार कडक by नगरीनिरंजन
:)
In reply to :) by पैसा
मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः
In reply to मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः by मनीषा
:)
In reply to :) by पैसा
दोन अनाहिता सुखसंवाद करत
In reply to दोन अनाहिता सुखसंवाद करत by चुकलामाकला
अस वाटतयं वानखेडे वर
In reply to अस वाटतयं वानखेडे वर by स्पा
फुल फेका फेकी
फुल फेका फेकीराम ! राम !! राम !!! +DIn reply to अस वाटतयं वानखेडे वर by स्पा
अस वाटतयं वानखेडे वर
In reply to अस वाटतयं वानखेडे वर by स्पा
अगदी अगदी...वसिम अक्रम अंडर
In reply to अस वाटतयं वानखेडे वर by स्पा
म्हणजे लोकांच्या घरात काय काय
In reply to अस वाटतयं वानखेडे वर by स्पा
का ब्वा
In reply to :) by पैसा
कथा इथेच पुन्हा एकदा वाचा. :)
In reply to कथा इथेच पुन्हा एकदा वाचा. :) by मनीषा
कथा, परत एकदां
In reply to कथा, परत एकदां by शरद
धन्यवाद सर!
In reply to धन्यवाद सर! by मनीषा
ओ तै
In reply to ओ तै by पैसा
पैसा ताई अर्धवट वाचन माझं की
In reply to पैसा ताई अर्धवट वाचन माझं की by मनीषा
अर्थ स्पष्ट आहे
In reply to माझा मुद्दा तो नाही by पैसा
मग हाच नियम गौतम ॠषींनाही
In reply to मग हाच नियम गौतम ॠषींनाही by मनीषा
भारतीय संस्कृती महान आहे.
In reply to भारतीय संस्कृती महान आहे. by काळा पहाड
भारतीय संस्कृतीचा काय संबंध
In reply to भारतीय संस्कृतीचा काय संबंध by मनीषा
मग "भारतीय संस्कृती" नावाची
In reply to मग "भारतीय संस्कृती" नावाची by काळा पहाड
:-). बरोबर. संस्कृतीत असं
ओह, असं सगळं झालं म्हणता....
In reply to ओह, असं सगळं झालं म्हणता.... by स्पा
(No subject)
In reply to ओह, असं सगळं झालं म्हणता.... by स्पा
स्पावड्या तू म्हणजे एकदम
In reply to स्पावड्या तू म्हणजे एकदम by सुबोध खरे
चड्डी नाही वल्कले.
वाल्मीकि-व्यास
In reply to वाल्मीकि-व्यास by अवतार
ओठांवर जिजाऊ, झाशीची राणी आणि
ओठांवर जिजाऊ, झाशीची राणी आणि पोटात मात्र "राम"राज्य, हे वागनं बरं न्हवं !!
>>> जोरदार टाळ्या!!!हा चित्रपट पहाच
प्रतिसाद वाचून बरेच मनोरंजन