वाङ्मय
छत्रपती शिवाजी महाराज आणि कविराज भूषण
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
साधारण ५-६ वर्षापूर्वी रायगडला आमच्या ग्रुप ने भेट दिली होती. त्या भेटीमध्ये कविराज भूषण यांचे छंद आणि त्यातील लय यांच्या प्रेमात पडलो.
परत आल्यावर भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात 'शिवाबावणी' आणि 'शिवराज भूषण' चा शोध घेतला आणि बरेचसे छंद लिहून काढले.
आज शिवजयंती निमित्त त्यातील काही इथे देण्याचा प्रयत्न करेन. या कवितेतील बऱ्याच शब्दांचा अर्थ मला माहिती नाही कारण त्या भाषेशी माझी इतकी जवळीक नाही. परंतु, कवितांचा साधारण अर्थ या निमित्ताने सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन.
१.
ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल.
खुशबू (भाग २)
भाग १
घरात अठरा विश्वे दारिद्र्य, आई कॅन्सरने आजारी, त्या धक्क्याने आकस्मिक गेलेले वडील, अश्या हलाखीच्या परिस्थितीत अमर उपाध्याय काय करतो ?
काहीच नाही…… करण्यासारखं फार काही नसतंच त्याच्याकडे… फक्त त्याच्या नेटवर्किंगच्या अभ्यासा… आणी विद्यापीठातल्या नोकरीखेरीज ……
--------------------------------
ऑफिसमधून लवकर निघता आल्यामुळे अमर खुश होता. मेंटली न दमता घरी येण्याचा हा अपवादात्मक दिवस. आज संध्याकाळसाठी काही स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्रीच्या जेवणासाठी त्यानं दाल-खिचडी सकाळीच करून ठेवलं होती.
खुशबू (भाग १)
'पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना जिंकणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे. माझा मुलगा पाकिस्तानविरुद्धच्या 'या' युद्धात शूर सैनिकासारखा लढला. त्यानं दाखवून दिलं की भारतीय मुसलमान हा आधी भारतीय असतो, मग मुस्लिम असतो!' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याचे अब्बाजान मोहम्मद तौसिफ यांचे. गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेला विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारताने मोठ्या फरकानं जिंकला.-----पेपरातली ही बातमी वाचता वाचता, खुशबूचे मन भूतकाळात मागे गेलं.
हर्षयुक्त उमापती
आज महाशिवरात्री
शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा
लोकप्रिय अभंग आहे -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन
करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज
वर्णन करतात -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे.
नरहरी सोनार हरीचा दास
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया).
त्यांना भावपूर्ण आदरांजली.
वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय
करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत
होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा
व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते.
वाड्.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो.
यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या
दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.
कथाश्री २०१४
कथाश्री २०१४ हा दिवाळी अंक गरज या विषयाला वाहिलेला आहे.
या विषयाला अनुसरून उचित लेख आहेतच्,शिवाय मंगला खाडीलकरांनी घेतलेल्या तीन मुलाखती वाचनीय आहेत.
- कुमार सप्तर्षी यांची मुलाखत त्यांची राजकीय जडण घडण , सामाजीक भान आणि वैचारीक स्पष्टता अगदी तपशीलवार उलगडली जाते. आजच्या राजकीय प्रगल्भतेच्या (दिवाळखोरीच्या) पार्श्वभूमीवर त्यांची पक्षविरहीत मते नक्कीच विचारात पाडतात
- दुसरी मुलाखत ही विनय सहस्त्रबुद्धे यांची "रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी" च्या वाटचालीबद्दल आणि योगदानाबद्दल आहे.
‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१
(पुस्तक-परिचय )
शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख.
..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत.
या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील.
१. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात.
२.
कृष्णमयी मीरा !!!
संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे अनेक संत महात्मे होवून गेले. या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे. पण मराठी भाषेच्या पलिकडे जावुन जर पाहिले तर इतर भाषांतही त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे. मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत वा मीरेची पदे असोत. या सगळ्यांनीच भारतीय भक्ती साहित्याला एका विलक्षण उंचीवर नेवुन ठेवलेले आहे. मला स्वतःला मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई यांच्याबद्दल एक विलक्षण आकर्षण आहे.
मिसळपाव