वाङ्मय
मरण!
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत
शेतकरी साहित्यही पुढे यावे
सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मराठी शेतकरी साहित्य संमेलन
कहे कबीरा (२)- सुनता है गुरु ग्यानी !!
सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।
नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?
बघ तर तुला काय सांगतो हा आवाज?
ज्या ढगांचा हा आवाज आहे त्यांच्या पलीकडे पाणी आहे. आणि त्या बिंदूच्या आधीही 'नाद' ऐकू येतो. साधनेत सर्वप्रथम 'अनहत नाद' च ऐकू येतो आणि मग बिंदू दिसतात.
मी अश्व!!
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित!
वेग अफाट
शक्ती अचाट
अंगी डौल
मोल अमोल
निष्ठा घोर
इतिहास थोर
करारी बाणा
सखा महाराणा
बनता दळ
सैन्या बळ
आजीचे कथन
पऱ्यांचे वाहन
नीज गहाण
वया परिमाण
लौकिकी मती
प्राणी जगती
अडीच पावली
चौसष्ठ आलयी
पौरुष नामांकन
दिव्य आभूषण
मिळता सात
तिमिरा मात
ऋणी विश्व
मी अश्व!!
- संदीप चांदणे
काव्यरस
मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी
कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे.
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
१.
तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते.
रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.
झब्बूशाहची पोरगी - खलिल जिब्रान
झब्बूशाहची पोरगी - खलील जिब्रान
सिंहासनावर झोपलेल्या म्हातार्या राणीच्या आजूबाजूस चार गुलाम पंखा हलवत होते.
बोबडी कविता!
बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये अंगठा धरून
हसतंय हळू खुदूखुदू!
इवल्याशा बोटांच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं बाबाला गुदूगुदू!
बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबड्या बोलांच गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!
- संदीप चांदणे
काव्यरस
मिसळपाव

