Skip to main content

संस्कृती

स्वच्छता आणि आपली मानसिकता

लेखक वडापाव यांनी सोमवार, 04/08/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 03/08/2014 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/28048 >>> आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला..उखाणा" अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही ............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!! असा टाइम'बॉम्ब उडवतो... मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो! ============== होम म्हटला की मग तो वास्तूशांतिचा असो, किंवा हा विवाहहोम असो.

...........काय बोलू.........

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/07/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते. असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच... एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते.

बो, बॉब आणि आयफोन

लेखक हेमंत बेंडाळे यांनी शुक्रवार, 18/07/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस: फेब्रुवारी २०१० २रा आठवडा (नक्की दिवस आठवत नाहीये पण सुट्टी होती त्यानंतर ) स्थळ: Superior ,CO वेळ: असेल रात्री ७, ८ वाजेची मी आणि माझा सहकारी योगेंद्र बस मधून उतरून lawn तुडवत शोर्टकट मारत माझ्या अपार्टमेंट वर चाललो होतो अचानक मला माझ्या पायाखाली काहीतरी तुडवल्यसारखे वाटले बर्फ होता पण त्याखाली काहीतरी होतं थोडा अंधार होता तिथे जे काही होता ते उचलला आणि पुढं जाऊन बघतो तर काय मी पायाखाली चक्क आयफोन तुडवत होतो. बापा जन्मात कधी आयफोन बघितला नवता आणि तो पायाखाली. मला वाटला गेला आता तो, पण बनावट चांगली आहे म्हणावा नाहीतर काय ७० किलो चा भर सहन केला त्याने आणि तरी चालू होता.

मंत्रयोग - जपयोग

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 17/07/2014 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे.

कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/07/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते.

वारी

लेखक आनंदमयी यांनी शनिवार, 05/07/2014 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासांतून वाहे सावळा मुरारी.. पायी चाले वारी पंढरीची|| सावळ्या डोहात सावळा तरंग भक्तिरूपी दंग वारकरी|| बंधने जुनी का भासती विजोड देहा लागे ओढ विठ्ठलाची..|| अधिरश्या जिवा पावलांची साथ वसे अंतरात भक्तियोग || पाहता लोचनी विठ्ठल सावळा तप्त जीव भोळा श्रांत होई || विष्णुरूपी लीन होवून मरावे अंतास उरावे विष्णूरूप || अदिती जोशी
काव्यरस

न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

लेखक पुस्तकमित्र यांनी शुक्रवार, 04/07/2014 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.

ओकांची ठकी - एका काव्य कट्ट्याचा अहवाल

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 24/06/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, एका रविवारी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर स्थानापन्न झाल्यावर जालावर शब्दरुपाने भेटणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. जुजबी गप्पा नंतर राजने आयोजित काव्यस्पर्धेबाबत आणि आगामी काळात मराठी व अन्य भाषेतील साहित्य प्रकाशनाच्या साकार होऊ घातलेल्या त्यांच्या कल्पना सांगितल्या.