Skip to main content

संस्कृती

ह्या कॅन्सरवर इलाज आहे का?

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 18/03/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो.

गुढीपाडवा आणि तरुणाई...

लेखक bharatm यांनी बुधवार, 18/03/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा आणि तरुणाई... हवी-हवीशी वाटणारी थंडी मावळत आलेली असते आणि धगधगता उन्हाळा होळीचे रंग उधळून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी चक्क निसर्गालाच खुणावत असतो. हिंदू कालगणनेनुसार चैत्र मास आपल्या सोबत नवे वर्ष घेऊन येतो. नवी स्वप्ने, नव्या आशा-आकांक्षा याबरोबरच नवं काहीतरी करण्याचा उत्साह, एखादी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा. अशा या मंगलदिनी आपल्या संकल्पकार्याचा शुभारंभ करायला मिळणे ही प्रत्येकासाठीच आनंदाची आणि समाधानाची बाब असते. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३६ (विवाह विशेष...-३..अंतिम.)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 18/03/2015 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. " बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????" पुढे चालू... ================================= हा सर्व संवाद माझ्या मनात अमृतासारखा झिरपत होता..आणि मी त्याच चिंतनमय अवस्थेत कधी शांत झोपि गेलो,ते कळलंही नाही. .............................................. कोकणात पहाटे एखादं लग्नघरच काय?..परंतू सर्व गाव, आजंही तसं लवकरच उठत असतं.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३५ (विवाह विशेष...-२)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/03/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मागुन येऊन मग मला अचानक काकूनीच जागं केलन. "अरे आत्मू..आता जरा ध्यानातून बाहेर ये...आणि तुझ्यासाठी जे ध्यान तिकडे आत डोळे-लावून बसलय ना? त्याच्यासाठीच्या तयारीला लाग..जा .. आवरायला घे त्या शेजारच्या घरात जाऊन... जा!" असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन... पुढे चालू... ============================ वस्तुतः आमची मित्रमंडळी आणि मी स्वतः देखिल,या आदल्या दिवशी वांङनिश्चय वगैरे करण्याच्या विरोधी होतो.

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव अंतिम भाग ३ – सुखांत ...

लेखक हेमन्त वाघे यांनी शनिवार, 14/03/2015 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन्ही भाग इकडे वाचा. भाग १ http://www.misalpav.com/node/30677 भाग २ http://www.misalpav.com/node/30702 “ वोडका???” .............” रम ???!!!” ............. “दारु ???????/!!” ती भयानक किंचाळली ! काही सेकंद सगळे सुन्न न्न न्न न्न ......................... ( हा स्पेशल इफेक्ट ......) मग तो कॅप्टन मराठीत म्हणाला “ mam ते cocktail आहे ना त्यात आम्ही गेस्ट च्या पसंतीचे ड्रिंक देतो .म्हणून तुमचा choice विचारला. “ तो विलक्षण शांत पणे म्हणाला. मला त्याचे कौतुक वाटले. “ ड्रिंक .....

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३४ (विवाह विशेष...)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 11/03/2015 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. अरे व्हायचं काय आणखिन आता त्यात?...तिच्या आई बापास सगळे बोललो नीट.आणि पुढल्या पौर्णिमेच्या मुहुर्ताला 'बैठकिचे' - सगळे ठरवुन आलो...आता दे बरं मला टाळी!" पुढे चालू... ================================== आणि मग,झाली...अखेर ती बैठक की कायशी म्हणतात ज्याला जुन्या श्टाइल मधे.., ती बैठक झाली. फक्त उलट आश्चर्य म्हणजे, बाबां ऐवजी आज्जीच आमच्या विवाहास 'कमी वय' म्हणून 'अजुन चांगली(?) दो.......न वर्ष जाऊ देत,मग करा लग्न' असा आक्षेप घेत होती. पण शेवटी काकानी आज्जीला. "आगो मायो माझे...

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग २ - विचारमंथन

लेखक हेमन्त वाघे यांनी मंगळवार, 10/03/2015 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग इकडे वाचा. http://www.misalpav.com/node/30677 विचारमंथन ह्या भागाला मी विचारमंथन म्हणतो कारण यात अनेक विचार आहेत –बहुतेक माझ्या डोक्यातले आणि काही मला “वाटलेले “ आणि हे करायला फारसा वेळ नव्हता . कारण आम्ही बोलत होतो –माझ्या आणि तिच्या कामाबद्दल , घरच्या बद्दल ... त्यामुळे मी काय मागवावे असा प्रश्न पडला. आता माझा मेंदू overclocking mode मध्ये सुरु झाला. जसे कि इंसेप्षन चित्रपटातील स्वप्न .

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2015 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो. मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर??? पुढे चालू... ================================ त्या कार्यक्रमा नंतर घरी आलो खरा.पण खरा कुठे??? खरा तिकडेच राहिलो होतो. मन थार्‍यावर रहात नव्हतं. सरळ जाऊन आईला विचारावं,तर तिचा गैरसमज होइल की काय? ही भिती.

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव भाग १

लेखक हेमन्त वाघे यांनी सोमवार, 09/03/2015 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
इथे अनेकजण आपले “कांदे पोह्यांचे “ अनुभव सांगताना बघून मला हि २००३-२००४ सालाची आठवण झाली ..... मुली बघण्याचे काही अजब , काही विचित्र आणि काही ठीक अनुभव घेत होतो. कितीही शिकलो असलो तरी तिशीपर्यंत आल्याने स्वताची लग्न बाजारातली किंमत हि कळत होतीच. त्यात अजस्त्र देह आणि थोडी कमी उंची (५’९.५” ) आणि काळा वर्ण नसलेल्या सौंदर्यात भरच घालत होता !! माझे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालू होते – म्हणजे मुली घरी येणे / जाणे . “सर्वांनी “ बाहेर भेटणे आणि मला सर्वात आवडायचे ते म्हणजे बाहेर फक्त दोघानीच भेटणे त्यात येक मेकाला समझता तरी येते.