Skip to main content

संस्कृती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 21/05/2015 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि त्याची सुरवात ह्या आजच्या दिवसापासून केली पाहिजे. फक्त आजच्या दिवसापासून..कारण तोच आज ठामपणे आपल्या हातात आहे! पुढे चालू... =============================== तेंव्हा हिला हिच्या आईकडे सोडून आलो..तो आलो खरा. पण इकडे आल्यानंतर कामात अज्जिबात म्हणजे अज्जिबात लक्ष लागे ना. शिवाय त्यांच्याकडे असलेला तो टेलिफोन म्हणजे ..ते मॉडेल जितकं जुनं होतं..त्याहुनहि तिथे मिळणारी फोनसेवा जुनाट दर्जाची होती.

पानिपत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 20/05/2015 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.

कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 19/05/2015 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाचून त्याचं क्रोधाग्नीने काळीज पेटून उठतंय फास्ट समजूच शकत नाही तो, नराधमांची मानसिकता म्हणतो सरकारने करावी, स्त्राटेजी कायद्याची कठोर जास्त पर नही जानता वो, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट …. चरफडून मग तो म्हणतो, कारे महान कल्चरला बोल लावतो ? तुला माहित्येका, बलात्कार भारतापेक्षा इंडियात होतात जास्त तंग कमी कपडे जीन्स, उशिरापर्यंत बाहेर फिरणे हेची कारणे यामागील वास्ट चुकीचे बोल तुझे की, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….
काव्यरस

पुस्तकातील चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 17/05/2015 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते. या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हेन्री जस्टिस फोर्ड Henry Justice Ford (1860–1941) हे ब्रिटिश चित्रकार सुमारे 1880 आणि 1890 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होते. यांची काही चित्र: १.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 16/05/2015 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. असो! इथे आमचा पार्ट संपतो. आणि यजमानांकडला आजच्या काळात निरनिराळ्या पद्धतीनी साजरा होणारा मंगळागौर जागविणे हा पार्ट सुरु होतो. पूजा संपते आणि कहाणी वगैरे वाचून या सगळ्या मुलि ,पुन्हा तेथून आपापल्या नोकरी व्यवसायांना पळतात,आणि आंम्ही पुढच्या यजमानदारी मार्गस्थ होतो. पुढे चालू... ====================================== हा आमचा पार्टच असा आहे पुरोहितांचा. यजमानांचा पार्ट सुरु व्हायच्या आधी संपणारा. आणि संसारात चाललेल्या पार्टांना धंद्यापाठी धावताना दुर्लक्ष करायला लावणारा.

खड्डा आणि मी

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 08/05/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 04/05/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मग देवळातून बाहेर आल्यावर बाकिच्या पुरोहितां बरोबर 'एकंदर दिवस कसा-गेला?' याची एक लहानशी ठरलेली चर्चा झडते..आणि घोड्याला टाच मारल्यासारखी गाड्यांना किका मारून..आमचं हे काहिसं आनंदी झालेलं देहाचं गाठोडं घराची वाट धरतं! ........ पुढे चालू... ============================= मग येतो श्रावणामधला ठरला मंगळवार .. हल्ली हे शिवंमंगलागौरी व्रत ,व्रत म्हणून कोणी करत असलं नसलं..तरी त्यात मिळणारी एंजॉयमेंट राहिलेली आणि काळानुसार अगदी वाढलेली सुद्धा असल्यानी, कमी अधिक प्रमाणात का होइ ना?

शंकर अभ्यंकर यांचे ओवीबद्ध रामायण

लेखक श्रीनिवास टिळक यांनी रविवार, 03/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
शंकर अभ्यंकर हे सध्या वाल्मीकि रामायणावर 'शंकर रामायण' या नावाचा एक टीकाग्रंथ लिहित आहेत आणि त्याच्या जवळ जवळ १५,००० ओव्या लिहून झाल्या आहेत. मंगलाचरणच एक हजार ओव्यांचे आहे आणि त्यात हे 'शंकर रामायण' कशासाठी आणि आधीची रामायणे कोणती याचा सविस्तर उहापोह आहे. मिपाकरांच्या सोयीसाठी त्यातील काही ओव्या खाली उधृत करीत आहे. अधिक माहितीसाठी अभ्यंकरांच्या आदित्य प्रतिष्ठान चा २०१४ चा आदित्य दीप हा दिवाळी अंक पहावा (4/15 वेदांतनगरी सोसायटी कर्वेनगर पुणे ४११०५२). माझी खात्री आहे कि गदिमांच्या गीत रामायणाप्रमाणेच हे 'ओवी रामायण' सुद्धा मराठी मनाचा आणि ह्रदयाचा ठाव घेईल.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

मिस्टिसिझम - एक चिंतन - २

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 01/05/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्टिसिझम - एक चिंतन - १ --------------------------------------------------------------------------------------------------- चित्रगुप्त काकांच्या या लेखात मिस्टिक अनुभवाचे वर्णन छान आले आहे. --------------------------------------------------------------------------------------------------- आधी म्हण्टल्याप्रमाणे 'मिस्टिसिझम' या शब्दाच्या व्युत्पत्तीमधून आपल्या हाती फारसं काही लागत नाही पण येवढं नक्की की या शब्दाचे सामान्यतः दोन अर्थ लागतात.