Skip to main content

संस्कृती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 24/06/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. असं म्हणून काका त्या आनंदाश्रूंसह बाजेवरून उठून माझ्यापाशी आला... आणि माझ्या पाठीवर थोपटत लहान मुलासारखं मला झोपवून..,शांत मनानी स्वतःही निद्रीस्त झाला. पुढे चालू... ========================== काका बरोबरच्या त्या संवादी रात्रीनंतर काहि दिवस तिकडे काहि इकडे असं करत केंव्हा गेले ते कळलं नाही. आणि शेवटी आमच्या घरी तो बारश्याचा समारंभ अगदी अस्सल कोकणी श्टाइलने पार पडला. मग एकच मोठ्ठा पाळणा की दोन वेगळे स्वतंत्र? समारंभ मोठ्ठा करायचा की साधा? अश्या अनेक चर्चा उपचर्चा झाल्या.

हे हृदय कसे बापाचे......!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/06/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

लेणी

लेखक शरद यांनी शुक्रवार, 12/06/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. शशिकांत ओक यांनी पाताळेश्वरवरील लेखात बर्‍याच गोष्टींचा उहापोह केला आहे. त्यातील एक भाग म्हणजे "लेणी" या विषयावर मागितलेली माहिती. दुसरा बौद्ध धर्माचा भारतातील र्‍हास.. आज लेण्यांबद्दल थोडी माहिती बघू. मी भारतातील मंदिरे या लेखमालेत "गिरिशिल्पे" या नावाखाली लेण्यांवर एक लेख लिहला होता. त्याची लिन्क http://www.misalpav.com/node/16437 या लेखात आपल्याला लेण्यांविषयी बरीच माहिती मिळेल. त्या ठिकाणी लेणी ही मंदिरांचा एक प्रकार म्हणून पाहिली होती. आज श्री.

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच - इमानदार सत्यवादी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 11/06/2015 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात ध्यानमग्न अवस्थेत होते. त्यांच्या डोळे उघडण्याची वाट पाहत त्यांच्या पुढ्यात बसलो होतो. अचानक स्वामीजींनी डोळे उघडले. क्षण ही न गमावता मी लगेच प्रश्न विचारला, स्वामीजी एक शंका आहे. आजकाल इंद्रप्रस्थि जे काही चालले आहे, ते बघून सत्यवादी इमानदार या शब्दांबाबत शंका उपस्थित झाली आहे. स्वामीजींच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, इमानदार व्यक्ती हा सत्यवादी असतो, सत्यवादी हा इमानदार असतो. इमानदार सत्यवादी कधीच खोटे बोलत नाही. संभ्रमात पडलेल्या अज्ञानी मानवांना हे कळणे कठीणच आहे.

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

निकाल (शतशब्दकथा )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/06/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

कॉमेडी ऐसपैस

लेखक तिमा यांनी गुरुवार, 21/05/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
" तर आता पहा, नवराबायकोतील हा धम्माल संवाद!!" एक तोकड्या कपड्यांतली वाळकी मुलगी, तिच्या कमावलेल्या आवाजात सांगत असते. तिच्या शब्दाशब्दाला मागचा वाद्यवृंद ठणाणत असतो. एक अत्यंत जाडी,बेढब पण साडी नेसलेली बाई स्टेजवर प्रवेश करते. आताशा, स्टेजवर प्रत्येक पात्राने नाचत नाचत आणि वाजत गाजतच प्रवेश करायचा असतो. तसा डिफॉल्ट प्रोग्रॅमच आहे ना! शिवाय प्रत्यक्ष काही वाक्य उच्चारण्याच्या आधीच नुसत्या आगाऊ देहबोलीवरच प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे हंशे वसूल करायचे असतात. तर ही बे.बा.(बेढब बाई) स्टेजवर एक राऊंड मारतीये तोच तिचा अत्यंत अंगविक्षेपी काटकुळा नवराही(का.