ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात
ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात
कथन – विवेक चौधरी, जळगाव. (नेपाळ यात्रेतील ओकसरांचे सहकारी)
23-26 मार्च 2015 मधे भृगुसंहितेच्या शोधात ओक सरांचे व माझे गमन झाले. त्याचा संक्षिप्त अहवाल आपल्याला अन्यत्र वाचायला मिळेल. त्या प्रवासात ज्या अदभूत घटना घडल्या त्यातील एक होती ती पशुपतीनाथाच्या मंदिरपरिसरात अचानक उद्भवलेले ऑटोरायटिंग...! टीप - आमच्या यात्रेनंतर 25 एप्रिल 2015ला नेपाळमधे धरणीकंप झाला होता. त्याचे असे झाले की आम्ही आमची नेपाळयात्रा संपवून काठमांडौच्या त्रिभुवन विमानतळाकडे जात असताना पशुपती नाथाचे मंदिर लागते तेथे दर्शन घ्यावे असा आमच्या नेपाळ यात्रेतील सनातन संस्थेच्या काठमांडौमधील सानू थापा नामक साधिकेने बेत ठरवला होता. त्यानुसार आम्ही मंदिरातील विविध देवतांचे दर्शन घेऊन पुढे सरकत होतो. या मंदिराच्या शिवांची पिंड नेहमीसारखी नाही ती एक तर खूप उंच आहे शिवाय त्याच्या पिंडीच्या दंडावर चार दिशांच्या व उर्ध्व दिशेला एक आकृती आहे. तिचे दर्शन घेऊन एका यज्ञकुंडापाशी धुनी पेटलेल्या ठिकाणी एक साधू ओणवा पहुडला होता तिथे आम्ही गेलो. तर त्याने तत्परतेने उठून आम्हाला कपाळाला विभूती लावली. जणू तो आमची वाट पहात असावा! ओकसरांची भावदशा पालटली व आम्ही त्यांच्यासह तिथेच एका हिरव्या जाजमावर मांडी घालून बसलो आणि मी ज्या अनुभवाची वाट पहात होतो ते घडले. सर मला म्हणाले, ‘कागद आहे का?’ मी तत्परतेने डायरीतील पाने फाडून त्यांच्या हातात सरकवली व त्यांची हालचाल निहाळत राहिलो. सरांचे पेन डायरीतील पानाच्या सुरवातीला टेकले. थोड्या अवकाशानंतर ते हलायला लागले. गोलगोल फिरत राहिले. व तो गोल मोठा होत होत गेला अन अचानक पेन पुढे सरकले. आणि ॐ ने सुरवात होऊन नमः शिवाय असा मजकूर येऊ लागला. पुढल्या ओळीत ‘अद्यकाले प्रथम दर्शनाय परांन्त त्वाम अहम दर्शनम देश्यामि’ अशी अक्षरे अवतरित होताना पाहून मला खात्रीने वाटले की हे ऑटोरायटिंग चालू आहे. ते सानू थापांना सांगावे, म्हणजे त्यांनाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळेल पण त्या ध्यानावस्थेत गेल्या होत्या. नंतर सावकाश ते लेखन चालू राहिले. ओक सरांचे मराठीतील हस्तलेखन कसे दिसते याची कल्पना मला आहे पण जे लेखन सावकाश चालले होते ते शब्द टप्पोरे व त्यांच्या नेहमीच्या वळणापेक्षा नक्कीच वेगळे होते. एकदम बराच गोंगाट जवळ यायला लागला. एक बाई जोरजोरात ओरडून, असा दंगा करायला लागली की तिच्या आवाजांचा कर्कशपणाने सर्वांची मानसिक शांतता बिघडली. मी सरांकडे यावर काय प्रतिक्रिया होतेय ते पहात होतो. लेखन थांबल्यासारखे वाटले.... ते खरोखरच थबकले .... त्यांचे पुढील शब्द प्रतिक्रियात्मक होते की... अति दूषणाम.... न चलितः जणु असे सुचवत होते की नाडी ग्रंथावरील अशी ओरड हळू हळू कमी होत होत संपुन जाईल जशी त्या कर्कश आवाजाच्या बाईचा दंगा हळू हळू दूर होत संपला होता. या वाक्यानंतर आशीर्वादात्मक हातात दोन फुलाचे दांडी जागा सोडून पेन पुढे सरकले वाटले आता काय लिहिले जाणार? पाहतो तो ते साकार व्हायला लागले, पशुपती नाथांच्या मंदिरातील पिंडीचे प्रतीकात्मक चित्र...उंच पिंड बुडख्यात चौकोनी वरच्याभागी चारी दिशांना शिवांचे मुखवटे आणि शिरोभाग गोलाकाराऐवजी चपटा व त्यावर काही आकृती असा मोहरा असलेले चित्र साकार होता होता, ॐ असे लिहून जरा मोठ्या आकारात शङ्कर शुभाशीषः असे लिहून एक सरळ रेषा येऊन सरांच्या हातातून पेन सटकले. जणू काही गळून पडले. मी ते न्याहाळत असताना माझे लक्ष सानूंकडे गेले. त्या ध्यानसाधनेत इतक्या मग्न होत्या की मगाशी कर्कश्य आवाजाचे त्यांच्यावर काही आघात झाले नसावेत असे वाटले! नंतर सर तर नॉर्मल झालेले वाटले. पण सानूंना डोळे उघडायला पुढे 5 -7 मिनिटे लागली. फारच छान साधनेत आनंद मिळाला असे त्यांनी शांत आवाजात म्हटले. (तिथे फोटो काढायला सक्त मनाई आहे. मी तरीही हिय्या करून ओक सरांचा फोटो काढायला लागलो तर लगेच कोणीतरी फटकारले, ‘ फोटो लेना बंद करो’ कोणी म्हटले तरीही त्या धांदलीत क्लिक झाला) या लेखनाचा सार अर्थ सरांना जो वाटला तो त्यांनी आमच्याशी बोलताना म्हटले की असे संस्कृत मधून प्रथमच लेखन घडले. ते व्याकरणदृष्ट्या किती शुद्ध आहे याची कल्पना नाही. ‘शङ्कर’ असा उल्लेख आला तेंव्हा त्यांना वाटले की ते आदि शंकराचार्य असावेत. नंतर आम्ही शंकराचार्यांनी स्थापलेल्या पीठाच्या परिसरातील आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शन झाले. मग पक्के झाले की हे लेखन कोण करवते आहे ते. लेखनाचा सार अर्थ - आत्ता पशुपतीनाथाचे प्रथम दर्शन झाल्यावर तुला मी (आदिशंकराचार्य) दर्शन देईन. यानंतर भृगुंचे विराट दर्शन करावे. (दि. 27 ते 29 मार्च या काळात आमच्याकडून भृगु संहितच्या वाचकांच्याशी झालेल्या प्रदीर्घ संवादातून ते भृगु संहितेचे विराट दर्शन झाले.) दीनानाथ म्हणजे (भगवान) रामचंद्रांचे दर्शन झाल्यावर तुझ्या मनातील उद्देश फलित होईल. (ते दर्शन नंतर, 28 मार्चच्या रामनवमीला अनायास घडले.) आता (यापुढेही) अगस्त्यादि अन्य महर्षींचे आशीर्वाद तुम्हाला मिळोत. तुझ्यासाठी जे लोक (नाडी) ग्रंथांच्याप्रती श्रद्धाभावाने मदत करतात अशांच्या मनोकामना पुर्ण होवोत. तुझा महर्षींच्या साहित्यसाधनेप्रती श्रद्धाभाव वर्धित होत जाईल.... खंड पडल्यानंतरचे लेखन.... (आत्ता जसे) अती दूषणे देणे ऐकायला येतयेत क्षीण झाले तसे कालांतराने नाडीग्रंथाना नावे ठेवणाऱ्यांचा कोलाहल क्षीण होत शांत होईल. लेखन असे होते – ॐ नमः शिवाय अद्य काले प्रथमः दर्शनाय परान्त त्वाम अहम् दर्शनम् देश्यामि । उपरांन्ते भृगु विराट दर्शनम् करिष्ये। दीनानाथ दर्शनम् त्वाम मतितः उद्देश्यो फलितस्मि। अथ अगस्त्यादि अन्य महर्षिणाम् आशीर्वादः पान्तु। त्वम् सहितः लोकेण मनोकामनाम फलितः। त्वाम् महर्षीणाम् साहित्य साधना प्रति श्रद्धाभाव वर्धिष्णु..... गताः ।........... अति दूषणाम् चलितः काले काले शान्त करिष्यामिः। ॐ शङ्करम् शुभाशीषः
आशीर्वादात्मक हस्तमुद्रा असून त्यानंतर पशुपतीनाथाच्या शिवपिंडीची आकृती.
समाप्त.
ओक सर गेली कित्येक वर्षे ऑटो रायटींग करतात. पुर्वी ते शिकवतही असत परंतु आता त्यांना ऑटोरायटींगमधून आलेल्या आदेशा अनुसार ते सध्या थांबवले आहे. त्यांच्या या ब्लॉगवर काही अधिक माहिती मिळते. त्यांचे अन्य 14- 15 ब्लॉग या वेब साईटवरून पाहता येतात. त्यातील काही मी ही अद्याप पाहिलेले नाहीत. प्रतिक्रिया
In reply to राग मानू नका, पण ही शुद्ध by एस
In reply to राग मानू नका, पण ही शुद्ध by एस
In reply to माझ्या परीक्षेचे पेपर कोणीतरी by आदूबाळ
In reply to सी.ए.चे पेपर शुद्ध संस्कृतमधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ऑटोरायटींगमध्ये "स्पिरिट" by सतिश गावडे
In reply to वर गेल्यावर खंपल्सरी संस्कृत by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to पाणिनी व्याकरणकार होते. by सतिश गावडे
In reply to स्वारी स्वारी. कौटिल्याचे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to विनोद बाजूला, यावर एक पुस्तक by सतिश गावडे
मात्र ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?मी यावर थोडेसे वाचले होते. मन "ट्रान्स"मध्ये गेल्यावर "अनकॉन्शियस" विचार आपोआप लिहिले जातात अशी काहिशी संकल्पना आहेत ती. जे ही संकल्पना मानतात त्यांच्या मते "आत्मा" येऊन त्यांच्याकडून लिहून घेतो. पूर्वी काही मनोविश्लेषक हा प्रकार मनोविष्लेषणासाठी वापरायचे. मात्र याला काहीही वैज्ञानिक आधार नाही.
In reply to मात्र ऑटो रायटिंग आणि ते by सतिश गावडे
In reply to प्लँचेट? by पैसा
In reply to पैसाकका, तू गांधीजींना by कवितानागेश
In reply to प्लँचेट? by पैसा
In reply to ऑटो रिटर्न by विकास
ऑटो रायटिंग आणि ते करतात/शिकवतात यात विरोधाभास वाटत नाही का?सुंदर रेसिपी बनवणे व इतराना ती कशी करायची हे शिकवणे असा काही प्रकार आहे कि काय? वरील प्रतिसादातून हे प्रकरण नक्की काय असावे असा अंदाज हसत खेळत बांधला जात आहे... ऑटोरायटींग सुरू करताना ओक सरांचा विषय "ऑटोरायटिंग म्हणजे काय?" हाच आहे त्यामुळे साहजिक अनेक संकल्पनांवर त्यातून प्रकाश पडतो. ऑटोरायटिंग कोण करतो? ते प्रत्येकाला करता येईल का? ऑटोरायटिंग करताना हस्ताक्षरात फरक पडतो का? कोणत्या भाषेत ते होते? कार्ल, अवतार मेहेरबाबा वगैरे त्यात कोण कोण व कसे सामिल होते? त्याचे फायदे काय? ऑटोरायटिंग हे भविष्य कथनाचे माध्यम आहे काय? वगैरे वगैरे... सरांच्या ब्लॉगवरून ही माहिती मिळते. वेबसाईट व ब्लॉगची लिंक धाग्यात सादर केली आहे. या ब्लॉगवरील माहिती बरेच दिवसात पुढे सरकली नाही असे दिसते कदाचित उत्सुकता वाटणाऱ्यांनी तिथे विचारणा केल्या तर आणखी माहिती सरांकडून मिळू शकेल...
In reply to ऑटोरायटिंग काय प्रकार आहे...? by योगविवेक
In reply to बादरायण संबंध... by विशाखा पाटील
In reply to काहीच समजले नाही by स्पा
In reply to अच्चा अचं जालं तल ! =)) by प्रसाद गोडबोले
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to यमक ? ते विसरलास मेल्या? by सूड
In reply to अर्र हो की! धन्यवाद! by बॅटमॅन
In reply to मामा गागा नाय हो...लेडी गागा. by स्वप्नांची राणी
In reply to हा स्पिरिट अंगी संचारल्याचा by सतिश गावडे
In reply to मामा गागा नाय हो...लेडी गागा. by स्वप्नांची राणी
In reply to अर्र हो की! धन्यवाद! by बॅटमॅन
In reply to टॅक्सी रायटींग बद्दल कोठे by स्पा
In reply to माझा इथला एक प्रतिसाद by सतिश गावडे
In reply to प्रतिसाद उडवला ही अंधश्रद्धा आहे by पैसा
In reply to गल्ली चुकलीच. by सतिश गावडे
In reply to इतकं 'स्पिरिट' अंगात 'घेणे' by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इतकं 'स्पिरिट' अंगात 'घेणे' by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझे प्रतिसाद हे इतरांना by सतिश गावडे
In reply to आयडीचे स्पिरिट? by पैसा
In reply to मला एक प्रश्न आहे? आयडीचा by सूड
In reply to मला एक प्रश्न आहे? आयडीचा by सूड
In reply to ब्लॅक होल थिअरीचा इथे काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to आयडीचे स्पिरिट? by पैसा
In reply to बोलविता धनी असा एक वाक्प्रचार by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ते "लिहविता पेनी" असं अधिक by सतिश गावडे
In reply to सुरस अन चमत्कारीक ! by चौथा कोनाडा
In reply to खंडोबाचं लगिन झालं म्हनं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to वाईच थांब...आत्ताशी दुस्रे by टवाळ कार्टा
शङ्करम् शुभाशीषःनीट वाचलंत तर ते 'शडःकरम' आहे. विसर्ग कसा दिलंनीत?
राग मानू नका, पण ही शुद्ध