Skip to main content

संस्कृती

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/03/2018 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर! खास येथे मिसळपाव वाचकांसाठी देत आहे!) टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर!

"चव नै न ढंव नै सोंगाडी"

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 06/03/2018 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चव नै न ढंव नै सोंगाडी" - २०१६च्या युनिक फिचर्सच्या 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली अस्मादिकांची अहिराणी कथा ******** शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां. पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड.

मराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 05/03/2018 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
धुयानी होयी नि धुयवड लोकेसहो! धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस. मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये. आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे इशेष शे. म्हंजे पाहा, हाई माशाना काटा र्हास ना तसा धुयाना मझार पारोया रोड जास. त्याले लागून काटकोनमा पह्यली गल्ली, २री गल्ली(तेली गल्ली) ४थी, ५वी, ६वी, ७वी गल्ली शेतस. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजेत. सहावी गल्लीना एक साईडले माधवपुरा. बठठा.... काय म्हंतस त्याले संवेदनशील भाग बरं!! गल्लींन एक टोकले सुभाषनगर. म्हणजे जुन धुळे. जुन धुयामा खुनी मस्जिद.

मराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध

लेखक मनो यांनी रविवार, 04/03/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, मराठी दिन २०१८ च्या निमित्ताने. (टीप: या लेखातील बरीच माहिती मी डॉ.

कायद्याचा मार्च खोळंबणारा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 03/03/2018 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
कायदा बर्‍याच वेळा मदतीस येतो, तसा कधी असून नसल्यासारखा वावरतो. दोष राज्य कायद्याचे असण्याचा नाही तर त्यातील उणीवा वेळीच दुरुस्त्या न करणार्‍या आणि अंमलबजावणी न करणार्‍या माणसांचा असतो. आज ईशान्य राज्यातील इतर दोन राज्यांसोबत मेघालयाच्या विधानसभा निवडणूकीचेही निकाल आले. मेघालयात भाजपास दोनच जागांवर समाधान मानावे लागले तरी मतदानाची टक्केवारी नव्हत्यात जमा होती तिथून १० टक्क्या पर्यंत गेली. छोटे पक्ष साथ देतील त्यांचे सरकार येईल ते कदाचित काँग्रेसचे असेल किंवा लोकसभेचे माजी खासदार ख्रिस्तवासी पि. ए. संगमांच्या मुलांच्या पार्टीचे असेल.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 01/03/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २ भाग १ संस्कृत सुभाषितांच्या क्षेत्रात निश्चित उगम सांगता येईल असे थोडेच आहे. बहुतेक नीतिपर, व्यवहारज्ञान सांगणारे आणि बोलणार्‍यांच्या मुखामध्ये प्रत्यही असणारे असे श्लोक कोणातरी (आता अज्ञात) कवीची रचना असते. एकदा ती सर्वमान्य झाली की ती सुभाषितांच्या एका संग्रहातून दुसर्‍यात अशी फिरू लागते. ह्यातल्या बहुतेक संग्रहांचे पौर्वापर्य ठरविणे दुस्तर असते आणि मूळचा कोण आणि नक्कल कोणती हेहि ठरवता येत नाही. एक वचन लोकप्रिय झाले की ते वापरून दुसरा कोणी कवि त्याच्याभोवती नवा श्लोक निर्माण करतो.

मराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
अहिराणी भाषेचा गोडवा लोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे.

मराठी दिन २०१८: समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... (उखाणे)

लेखक नूतन यांनी बुधवार, 28/02/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता....

कथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना. उखाण्यात पतीचं नाव घेण्याची सुरुवात सहसा मुलीच्या लग्नापासून होते. (अर्थात नाव घेण्यात पुरुषांचाही समावेश असतोच).

माय गे माय...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 27/02/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली. डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं. गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले. पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली, "एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "
काव्यरस

मराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 27/02/2018 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
'आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा.' आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते.