Skip to main content

संस्कृती

पाणीपुरी

लेखक भोचक यांनी मंगळवार, 22/09/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती. पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत.

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

सोंगट्या, कवड्या, गंजिफा आणि सारीपाट

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 17/09/2009 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
म्हैसूरजवळच्या एका संग्रहालयातील ही छायाचित्रे. माझ्या मित्राकडे सापडली. मी यातील अनेक गोष्टी प्रथमच बघितल्या होत्या. कदाचित तुमची ही पहिलीच वेळ असेल म्हणून शेअर करतोय :) मोबाईल कॅमेर्‍याने काढल्यामुळे दर्जा मर्यादित आहे. सांभाळून घ्या.

चवीने खाणार त्याला...

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 16/09/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात.

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/09/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थ्ळ - वैकुंठ शीन - हातात 'मादक आणी जहाल'चा मग सहजच घेऊन महालात श्री विष्णू पहुडले आहेत ६० इंची एल्सीडीवर प्रोग्रॅम सुरु आहे जोरजोरात हसण्याचे आवाज येताहेत! (महालात प्रवेश करत) नारद : "नारायण, नारायण!" विष्णूंचं लक्ष नाही असं पाहून पुन्हा एकदा मोठ्याने "नाऽऽरायण! नाऽऽरायण!!" टीवीवरची नजर ढळू न देता विष्णू एका हातानेच थांबायची खूण करतात! एवढ्यात कार्यक्रमाचे प्रायोजक 'मिपाकर स्वयंभोचक संघाची' अ‍ॅड सुरु होते आणी विष्णू टीवी म्यूट करतात. "हा हा हा! मेलो मेलो!! कॉकटेल उडाली ..ठ्यॉ!! बसा बसा मुनिवर!!" "काय हे देवा?

कुरुंदवाडचा अनोखा गणेशोत्सव..!

लेखक सुहास यांनी बुधवार, 09/09/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दंगलींच्या आगीत सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरे होरपळत असताना कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाबद्द्लची दूरदर्शनवरची बातमी आठवली. मिरजेपासून २०-२५ किमी अंतरावर असलेल्या या गावात गेली ६० वर्षे पाच मशिदींमध्ये गणपती बसवला जातो. इतकेच नव्हे तर मुस्लिमांचे जे सण (मोहरम, रमजान ईद) या काळात येतात ते या मंडळांतर्फे साजरे केले जातात. इथल्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूच जास्त जात असतील..! आंतरजालावर चित्रफित शोधली, पण मिळाली नाही..

कोलाज

लेखक जयवी यांनी मंगळवार, 08/09/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
हे मी केलेलं गणपतीचं कोलाज :)

गौराई आली माझ्या घरा...

लेखक नाटक्या यांनी मंगळवार, 08/09/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
गौराई कोणाच्या पावलाने आली? 'गौराई सोन्याच्या पावलांनी आली..". गौराई कोणाच्या पावलांनी आली? "गौराई मोतियाच्या पावलांनी आली.." अशा गजरात, चांदीच्या ताटात गौराईचे आमच्या घरात आगमन झाले. गौराई घरी येणार म्हणून आम्ही आरास केली होती. घरात करंज्या/पापड्या करून ठेवले होते. दारात सुबक रांगोळी काढली होती, दाराला तोरण लावलं होतं. दारात लक्ष्मीची पावलं हळदी-कुंकवाने काढली होती. अमेरिकेत घरात सगळीकडे कार्पेट असल्यामुळे घरात मात्र पावलं काढता आली नाहीत. कुळाचाराप्रमाणे चांदीच्या ताटातून गौरीचे मुखवटे घेऊन सौ. घरात आली. दारात हळदी-कुंकू/अक्षता वाहून ओवाळलं. दुधाने पाद्यपुजा केली, भाकर-तुकडा ओवाळून टाकला.

रांगोळी

लेखक जयवी यांनी रविवार, 06/09/2009 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझ्या बाप्पा समोरची रांगोळी ! आजकाल साचे मिळत असल्यामुळे रांगोळी काढणं खूपच सोप्पं झालंय.