Skip to main content

संस्कृती

सहस्रचंद्रदर्शन

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
खरडवहीतल्या देवाणघेवाणीतून हा विषय निघाला. पूर्वी माझ्या ब्लॉगवर याबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे नवीन काही न टाकता तीच माहिती इथे सर्वांच्या सोयीसाठी देत आहे - हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे.

गीर्वाणवाणी आणि भाषा इंडोनेशिया (आज अनेक नवीन शब्द घातले आहेत)

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 07/10/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनेक नवीन शब्द घालून हा लेख मी मुळाक्षरांनुसार पुनर्रचित करून (in alphabetical order) पुन्हा लिहिला आहे. जे नवीन शब्द आहेत ते ठळक अक्षरात आहेत. वाचा तर..... -------------------------------------------------- मी जेंव्हा इंडोनेशियाला आलो तेंव्हां येथील एकंदरीत संस्कृतीवरील हिंदु धर्माची छाप व यांच्या भाषेतली संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल पाहून थक्क झालो.

जननायक प्रभू राम अभ्युदय कादंबरीचे महानायक

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/10/2009 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले.

औषधाचे दुकान

लेखक नंदू यांनी रविवार, 04/10/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सिंगापुरातील एक चिनी स्टाईलचे औषधाचे दुकान ;)

गांधी जयंती निमित्तच्या ड्रायडेचा तीव्र निषेध!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 02/10/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज गांधी जयंती. या निमित्ताने आजच्या दिवशी देशात लादल्या गेलेल्या ड्रायडेचा (दारुबंदी) मी तीव्र निषेध करतो.. ज्या गांधींनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, आणि कुठकुठल्या फ्रीडमस्चा वगैरे पुरस्कार केला असे ऐकून आहे, त्या गांधींच्या जयंतीच्या दिवशी देशातला एक फार मोठा कष्टकरी वर्ग विनाकारण बेरोजगार राहणार हा विरोधाभास चीड आणणारा आहे.. मद्यविक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि त्यांची रोजीरोटी चालते.

आम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहोत

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 01/10/2009 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
" मिपा"वरील सभासद मित्रांनो, हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो. एक-एक करत खूप जणांनी खूप आस्थेने माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षित असल्याबद्दलची चौकशी केली व त्याने मी भारवून गेलो आहे. प्रत्येकाला आतापर्यंत वैयक्तिक उत्तरेही पाठविली, पण शेवटी असं जाहीररीत्या कळवायचं ठरविलं! हा धरणीकंप सुमात्रा बेटाच्या पश्चिमेला "पाडांग"जवळ झाला. रिश्टर स्केलवर ७.९ म्हणजे चांगलाच मोठा होता. जीवित-वित्तहानी खूपच झालेली दिसतेय.

आत्माराम की जय

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 30/09/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंड्ळी, हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्‍या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही..

दसर्‍याच्या शुभेच्छा!!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 28/09/2009 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपापरिवाराला आमच्या दसर्‍याच्या शुभेच्छा!!! DSC_0261_353 आपट्याचं पान तर रेखीव असतंच पण फुलंसुद्धा अगदी आकर्षक असतात... DSC_0262_354

बदल

लेखक प्रभो यांनी रविवार, 27/09/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच घरी आलो दसर्‍यासाठी.

शतघौतघृत

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 25/09/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
शतघौतघृत हा विलक्षण प्रकार गायीचे दुध वापरुन बनवलेल्या तुपापासून करतात. प्रक्रिया:
  • जेव्हढे तूप घ्याल त्याच्या शंभरपट पाणी घ्या.
  • ते पाणी एका पातेल्यात घेऊन त्यात तूप घाला व शंभर वेळा ते पाणी डावी-उजवी कडे फिरवा.
  • शंभरवेळा झाले की पाणी फेकून द्या.
  • असे शंभर वेळा करा.
= १०० * १००
  • असे सिद्ध धूतलेले तूप जखमेवर वापरुन पहा. चूटकीसरशी जखम भरुन येते.
  • ओठ फाटत असल्यास ओठांना लावा व चमत्कार पहा.
  • चेहऱ्याला लावा आणि पहा कशी कांती चमकदार होते ते.