Skip to main content

संस्कृती

दिवाळी २००९

लेखक गणपा यांनी मंगळवार, 20/10/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना दुखःवाटल्याने कमी होतं आणि आनंद वाटल्याने वाढतो.

दिवाळी किल्ला - किल्ले सिंधुदुर्ग !!

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 20/10/2009 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी म्हणले की लहानमुलांना फटाके, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ याचबरोबर उत्सूकता असते ती किल्ला बनवण्याची. आजच्या फ्लॅट संस्कृतीतही आपल्याकडे मातीचे किल्ले तयार केले जात आहेत हे विशेष. काही ठिकाणी ( पुणे , मुंबईकडे ) तयार किल्ले विकत घेण्याकडे कल ( काही अपवाद वगळता) वाढायला लागला आहे. जागेची उपलब्धता हे त्यामगचे मुख्य कारण असावे. पण तरीही तयार किल्ले बनवण्यातली मजा काही वेगळीच.दिवाळीत सांगलीला गेलो असता माझ्या भाच्यांनी ( चि. आदित्य ओगले, चि. श्रीराम ओगले) केलेला हा सिंधुदुर्ग किल्ला.

दिल्लीची रखुमाई......सोनिया.....माझी माऊली.....

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 19/10/2009 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल एक स्पष्टीकरण.... प्रथम माझ्या मिपाच्या वाचकांना, लेखकांना, प्रशासकांना, (आणि अवांतर मिपाकरांना) दिवाळीच्या शुभेच्छा! आणि काकांच्या लाडक्या तात्याला तर खास दिवाळीनिमित्त गोड गोड पापा!!!! :) आम्ही हे लिहित आहो हे याचं कारण आमचा सटकलेला मेंदू आणि दिवाळीच्या सुट्टी यामुळे हाताशी असलेला वेळ.... सोनिया विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही. आम्ही कॉन्ग्रेस किंवा भाजप पार्टीचे नाही, किंबहुना अंमळ भांडवलशाहीच आहोत!!!! उद्या सोनियाचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार.

आमच्या बखरीतून...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 18/10/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
... आमचा जन्मसिद्ध हक्क ! `अध्यक्ष महाशय, पुज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थीमित्रांनो,... स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून ब्रिटिश सरकारला हादरवून सोडणाया नरकेसरी लोकमान्य टिळकांचा जन्म, ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात सुंदर कमळ उगवावे त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली या गावी झाला... त्यांच्या वडिलांचे नाव'... ... डोळे मिटून आणि मुठी घट्ट आवळून मागेपुढे झुलत मी टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या कोकणातल्या गावातल्या शाळेत भाषणाला सुरुवात केली आणि `टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला' या वाक्याशी येताच माझी गाडी गडबडली...

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

जालिय लेखनाची दखल...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 17/10/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरजालावर बरीच मराठी संस्थळं भरभराटीला येत आहेत, मराठी युनिकोडसुविधेमुळे मराठी टंकन सुलभ झाले आणि ब्लॉग्जचे पेव फुटले... त्यामुळे ज्या लोकांनी आयुष्यात आपण कधी लिहू असे कल्पिलेही नसेल असे लोक लिहू लागले, मराठी वाचन कमी झाले म्हणता म्हणता या नवीन तंत्राविष्कारामुळे मराठी वाचनच नव्हे तर लेखनही वाढते आहे. एकूणातच... एक नवीन जग आकारास येत आहे. आणि आपण आजचे नेटकर या विश्वाचे सुरूवातीचे दिवस आणि वाढ अगदी पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत. तर जालिय दिवस असे सुखासमाधानात जात असताना, साधारण तीनेक आठवड्यांपूर्वी अचानक रामदासांचा व्यनि आला. एखाद्या सदस्याचे सगळे लेखन बघायचे असेल तर काय करायचे?

पीर पराई...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 16/10/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
गुणीदास पं जगन्नाथबुवा पुरोहित. हिंदुस्थानी गायकीतलं, आग्रा गायकीतलं, बंदिशीच्या दुनीयेतलं, तबलावादनातलं एक मोठं नांव. पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, मणिक वर्मा, पं रामभाऊ मराठे, पं भाई गायतोंडे यांसारख्या दिग्गजांना घडवणारे जगन्नाथबुवा! कठोर परिश्रम करून गाण्यावर हुकुमत मिळवलेले जगन्नाथबुवा! 'हम्म!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/10/2009 03:53 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांना, आपल्या कुटूंबीयांना, मित्रपरीवाराला आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो या सदिच्छा!

परिवर्तन!!!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 13/10/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्ता, कुठे बेपत्ता झालास? बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही! भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू, व्होड्का मिळेलच तिथे; नाही तर ओल्ड मंक सांगू, अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ, आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र, प्रश्नांचा नाही तुटवडा, हवे तर बेळगाव मांडू, मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ, डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! सेझ, खासगीकरण, उदारीकरणाचा समतेत पाय, राज्याच्या घसरलेल्या नंबरावर नाही कोणताच
काव्यरस