Skip to main content

संस्कृती

देवा तुझ्या द्वारी आलो

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 31/12/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ - कंपनीतील गणपती मंदिर. वेळ : संध्याकाळचे ७. ०० वा. दिनांक २९ डिसेंबर २००९ साधारण ७०-८० जणांचा ग्रुप कंपनीतील सांस्कृतीक मंडळाने आयोजीत केलेल्या ' सिध्दिविनायक पदयात्रेला' जाण्यासाठी जमला होता. यापुर्वी चार वेळा असा उपक्रम मंडळाने यशस्वी पार पाडला होता. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पदयात्रेत जात असल्याने एक उत्सुकता निर्माण झाली होती. कंपनीच्या आवारातील गणपतीच्या मंदिरात आरती करुन दिंडीला सुरवात झाली. ' गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया ! उंदीर मामा की जय !!!! ' चा जयघोष सुरु झाला . आणि सुरु झाली रात्रीची भटकंती.

सांता क्लॉज

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/12/2009 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
सांता क्लॉज नाताळ मधे खुप मजा असायची रात्री मोजा लावायाचो अन सकाळी उठल्यावर मज्जाच मज्जा सांता चॉकलेट्स,खाउ, खेळणी द्यायचा खुप मजा यायची, मग बाबांना विचारायाचो..... बाबा सांगाना, कुणी दिला हा खाऊ? खेळणी? सांता आला होता, तुला आवडतात म्हणुन दिलि.....बाबा मग मला का नाहि जाग केले?..... सांता म्हणाला त्याला झोपु द्या...बाबा म्हणाले. सांता कधिच भेटला नाहि एका नाताळला मोजा लावला अन हसत बसलो... काय रे लबाडा का हसतोस?

हिषेब्...जमा खर्चाचा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 16/12/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष संपत आले की प्रत्येक वर्षी हेच फीलिंग येते. कोनीतरी अगदी जवळचे दुरावणार असल्यासारखे राहून राहून वाटत असते. डिसेंबर चा पहिला पंध्रवडा या हुरहुरीत जातो अन दुसरा येतो कधी अन जातो कधी तेच कळत नाही इतक्या भर्रकन संपलेला असतो. या सरत्या वर्षात काय मिळवले काय गमावले याचा कधीतरी लेखाजोखा मांडुयात. नक्की काय अनुभव पदरी पडले ते पहाण्यात.प्रत्येक वर्षाखेरीला हा विचार मनात अख्खा महिनभर वारंवार डोकावत असतो. आणि आपण एखाद्या बेसावध क्षणी झोपायच्या तयारीत असताना हा विचार एकदम तोंड वर काढतो. झोपेची आराधना वगैरे करावे लागत नाही. विचारांची गाडी सुरू होते. आठवणींची स्टेशने मागे मागे जायला सुरुवात होते.

भाशन. यत्ता चवतीतल

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 15/12/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
जरा मोकला झाल्तो तर कालपास्न ईचार करीत व्हतो .क लीवाच बर ?पन डोस्क्यान कई येचना. रिंग रिंग रिंग रिंग रिंग .... मोबाईल वाजतवता. 'ह्या~लू ! बोल्तो कोन ?' 'बाला आर मना नाय वलीकलास ? मी चंद्या, बारके पाड्यानचा. ' झारकन डोस्क्यान वायर घुस्ली. 'हा बोल आर हायस कुट तू ? ' .........धा मिन्टानी फोन खाली ठ्येवला न डायरेक मना मत्मा गांधीच आटवले बोल. चवतीत आसताना शिक्शन ईंन्स्पेक्टर समोर भाडखाउनं मत्मा गांधी वर भाशन दिल्लवत. ज्याआयला भाशन आयकता आयकता ईंन्स्पेक्टर झीट येऊन खाली परलावता. ईयत्ता चवतीचा वर्ग.

घ्या..... केळी..........

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 15/12/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत बरेचदा शब्दार्थामुळे काय च्या काय अनर्थ होतात. पण केवळ एखादा शब्दार्थ संप मोडून काढू शकतो हा अनुभव मात्र न भूतो भविष्यति. सामान्यतः एखाद्याला नारळ देणे या वाक्प्रचाराचा अर्थ निरोप देणे काढून टाकणे असा होतो. हात हलवत जाणे म्हणजे रिकाम्या हाताने परत येणे/पाठवणे असा होतो. वाटाण्याच्या अक्षता कोणी पाहिल्यात कोण जाणे पण मराठी भाषेत त्या बरेच महत्वाचे स्थान मिळवुन आहेत. नारळ ,वाटाणे, चणे ,अक्षता, हळद फुटाणे वगैरे कठीण पदार्थ सुद्धा वाक्प्रचारात आले की अनर्थ घडवतात. मिरच्या या वाक्प्रचारातही तिखटपणा सोडत नाहीत. फक्त त्या तोंडाऐवजी नाकाला झोंबतात.

उपसंहार

लेखक दमनक यांनी शुक्रवार, 11/12/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बातम्या. काल बजाज स्कूटरच्या निधनाची आणि आज दिपुंच्या. एका युगाचा अंत झाला अनेक अर्थांनी. बजाज स्कूटरीला भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक मानले गेले, तसे दिपु हे भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक असे म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. रूढार्थाने दिपु हे 'एनिथिंग बट मिडलक्लास'. विश्वभान, कालभान आणि या सर्वांच्या साक्षीने आत्मभान असलेला साहित्यिक. विसाव्या शतकातला 'फार महत्त्वाचा कवी'. या माणसाला मध्यमवर्गीय विचारसरणीत बसवणे शक्यच नाही. विचारसरणी ही मोठी मजेशीर गोष्ट आहे, नाही का ? जर एक विचारसरणी 'पुढे' गेली काय किंवा 'मागे' आली काय...

बुधवारची कविता : (खवट)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 10/12/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो. आमची प्रेरणा ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता सोबत होते तिची नि माझी पेग काही जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता चुकून जुळती कधीमधी मते आपली आठवही त्याचा न उरावा..
काव्यरस

अजून एक क्रियाशील आदर्श

लेखक विकास यांनी रविवार, 06/12/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.